Friday, Dec 09th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी मुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले

मुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले

Print
चिपळूण - राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र गेल्या 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्हीची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) घेतला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे, तर सांगलीतील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त केले जात आहे.

राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी)च्या अहवालात राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे नमूद केले आहे. राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्ही बाधितांची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले 7.7 टक्‍यांहून हे प्रमाणे 6.1 टक्‍यांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण 1.6 टक्‍यांनी घटले आहे. यामध्ये आणखी बदल करण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करावी लागणार आहे.

पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक असलेल्या प्रमाणात घट झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. म्हणजेच पुणे 7.7 टक्‍क्‍यांवरून 7.1, तर मुंबई 9.4 टक्‍क्‍यांवरून 6.4 टक्‍यापर्यंत घटले आहे. 13.2 वरून 16.7 टक्‍क्‍यावर सांगली जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण पोहोचले आहे. या तीन वर्षामध्ये सांगलीसह आणखी नऊ जिल्ह्यांमधील एचआयव्हीचे प्रमाण घटण्याऐवजी ते वाढत गेल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये धुळे, जळगाव, सांगली, औरंगाबाद, अकोला, जानला, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे. अन्य सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीचे असलेले मूळचे प्रमाण हे या ती वर्षात खाली आले आहे.

एचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेने (नॅको) राज्यात विषाणू प्रतिबंधात्मक उपचार केंद्र (एआरटी) तपासणी व सल्ला मार्गदर्शन केंद्र, गर्भवती महिलांसाठी तपासणी याबरोबरच बाधित रुग्णांना मोफत औषधे, जनजागृतीसारख्या मोहिमा देखील राज्यात राबविण्यात येत आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: सकाळ

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya