Saturday, Dec 10th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी वर्षभरात 68 एचआयव्हीबाधित रुग्णांचा मृत्यू

वर्षभरात 68 एचआयव्हीबाधित रुग्णांचा मृत्यू

Print
सकाळ वृत्तसेवा
0६ सप्टेबर २०११
अकोला, भारत
अकोला - जिल्ह्यात एचआयव्हीबाधित सहा हजार 558 रुग्ण असून, गेल्या वर्षभरात एड्‌सबाधित 68 जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली.

शासनाने या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मात्र, जिल्ह्यातील एड्‌सबाधितांची संख्या लक्षात घेता एड्‌स नियंत्रणाच्या योजनांची अधिक जोमाने अंमलबजावणी करणे आवश्‍यक झाले आहे.

जिल्ह्यात 2002 पासून एड्‌स नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आली असून, आतापर्यंत सहा हजार 558 एड्‌सबाधित रुग्ण आढळले आहेत. गत ऑगस्ट महिन्यात 69 एड्‌सबाधित रुग्णांची नोंदणी झाली असून, त्यामध्ये 28 पुरुष, 34 महिला, पाच नवजात मुले तर दोन नवजात मुलींचा समावेश असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनईकर यांनी सांगितले. जिल्ह्यात एड्‌स नियंत्रण व उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात 34 ऐच्छिक समुपदेशन व चाचणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तर, जिल्ह्यातील 100 गावांमध्ये लिंक वर्कर्स स्किम योजनेअंतर्गत 40 लिंक वर्कर्सच्या माध्यमातून एड्‌स नियंत्रण, उपचार, मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत 21 हजार 640 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 42 एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती महिला आढळल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एड्‌स नियंत्रणासाठी शासनातर्फे विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मात्र, युवावर्गात होत असलेले असुरक्षित शारीरिक संबंध, एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंधांमुळे एड्‌सबांधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, ऑगस्ट महिन्यात आढळलेल्या एड्‌सबाधितांमध्ये 90 टक्के 25 ते 35 वयोगटातील युवक-युवती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एड्‌सबाधित 908 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात 68 जणांना मृत्यूने कवटाळले आहे.

या रोगाच्या नियंत्रणासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सहकार्य आवश्‍यक असून, त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन जनईकर यांनी केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya