Saturday, Dec 03rd

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी संपत्तीच्या लालसेने आईला दिले 'एचआयव्ही'चे इंजेक्‍शन

संपत्तीच्या लालसेने आईला दिले 'एचआयव्ही'चे इंजेक्‍शन

Print
सकाळ वृत्तसेवा
०५ ऑक्टोबर २०१०
हैदराबाद, भारत

संपत्तीच्या हव्यासापोटी मुलींनी जन्मदात्या आईला 'एचआयव्ही'बाधित रक्ताचे इंजेक्‍शन देण्याचा खळबळजनक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. या कृत्यानंतर दोन्ही संशयित मुली फरारी असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गुंटूर जिल्ह्यातील ब्रोडीपेठ भागात राहणारे राचकोंडा भारती (वय 65) आणि राचकोंडा रंगाराव (70) या दांपत्याला दोन मुली आहेत. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी अशी त्यांची नावे असून, काही वर्षांपूर्वीच त्यांचे विवाह झाले आहेत. दुर्गादेवी गृहिणी; तर कामेश्‍वरी एका सरकारी रुग्णालयात परिचारिका आहे. जमीनदार असलेल्या राचकोंडा दांपत्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता असून, काही तोळे सोने आणि रोख रक्कम आहे. ही संपत्ती मिळविण्यासाठी दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांचा काही महिन्यांपासून छळ सुरू केला होता.

मालमत्ता दोघींच्या नावावर करण्याचा तगादा दुर्गादेवी आणि कामेश्‍वरीने लावला होता. अनेकदा त्यांच्यात भांडणेही झाली होती. सोने आणि पैशांमध्ये वाटा देण्याचीही दोन्ही मुलींची मागणी होती. "आमच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती तुम्हालाच मिळणार आहे, तोपर्यंत तरी थांबा' असे राचकोंडा दांपत्य त्यांना वारंवार सांगत होते. तीन महिन्यांपूर्वी भारती यांना ताप भरला होता. उपचार करण्याच्या निमित्ताने कामेश्‍वरी आणि दुर्गादेवी यांनी "एचआयव्ही'बाधित रक्ताचे "इंजेक्‍शन' त्यांना दिले. "इंजेक्‍शन' लाल रंगाचे असल्याने भारती यांना संशयही आला होता. मात्र, अशक्तपणा कमी होण्यासाठी त्यात औषध सोडल्याचे त्यांना सांगण्यात आले.

तीन महिन्यांत भारती यांना अधिकच अशक्‍त वाटू लागल्याने गेल्या आठवड्यात त्यांच्या "एचआयव्ही' चाचण्या करण्यात आल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. हा प्रकार समजल्यानंतर रंगाराव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी या दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. कामश्‍वेरीचे कृत्य समजल्यानंतर तिचे पती दुर्गाराव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा महिन्यांतील दुसरी घटना
यापूर्वी आंध्र प्रदेशातील एका वैद्यकीय प्रतिनिधीने हुंड्यासाठी पत्नीला "एचआयव्ही' विषाणूचे "इंजेक्‍शन' दिले होते. रघुनाथ राव असे त्याचे नाव होते. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya