Thursday, Dec 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी सिंधुदुर्गात वर्षभरात "एड्‌स'चे 1221 रुग्ण

सिंधुदुर्गात वर्षभरात "एड्‌स'चे 1221 रुग्ण

Print
सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
सिंधुदुर्गनगरी, भारत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात 1221 एड्‌सचे रुग्ण आढळले. राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त गुरुवारी (ता. 12) जिल्हास्तरावर युवकांसाठी एचआयव्ही एड्‌सबाबत मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन केले आहे. 12 ते 19 या सप्ताहामध्ये आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन एड्‌सविषयी माहिती करून घ्यावी. चाचणीही करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत याचे आयोजन केले आहे. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयसिंग दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. कुलकर्णी, माहिती अधिकारी सदाशिव कांबळे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. एन. डी. खोत, डॉ. ननावरे आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. खोत म्हणाले, ""या सप्ताहानिमित्त 12 ला रॅली होईल. जिल्ह्यात एक युवक मेळावा होईल. या उपक्रमात महाविद्यालयीन युवक-युवती तसेच इतर युवक-युवतींचा सहभाग राहील. एचआयव्ही चाचणी करण्याची आवश्‍यकता या विषयावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानमाला होईल. युवक-युवतींना एड्‌सविषयी मार्गदर्शन आणि पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व कार्यप्रणालीविषयी युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येकाने एचआयव्ही चाचणी करावी की नाही, या विषयावर वादविवाद स्पर्धा, परिसंवाद आदी उपक्रम घेतले जातील.''

ते म्हणाले, ""जिल्ह्यात 2002 पासून आतापर्यंत एकूण 1221 एड्‌सचे रुग्ण आढळले. जुलैपर्यंत 118 रुग्ण आढळले आहेत. एड्‌सविषयी गंभीरता लक्षात घेऊन युवा पिढीमध्ये याबाबत जनजागृती होणे आवश्‍यक आहे. एड्‌सबाबतची भयानता लक्षात घेता याच्याविरोधी लढा देण्याच्या दृष्टीने समाजातील कलंक व भेदभावाची भावना कायमस्वरूपी निपटून टाकण्यासाठी युवा शक्तीचा उपयोग व्हावा. यासाठी युवा पिढीला याबाबत माहिती देण्याची गरज आहे. या कार्यक्रमात युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एड्‌सची माहिती करून घ्यावी.''

जिल्ह्यात मलेरियाचे 125 रुग्ण
जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूची साथ नसली, तरी मलेरियाचे 125 रुग्ण आढळले. मलेरियाचे जुलैमध्ये 32 रुग्ण शासकीय यंत्रणेला तपासणीत आढळले. खासगी डॉक्‍टरांच्या तपासणीत 93 रुग्ण आढळले. गणेशोत्सव कालावधीत मुंबई, पुणेसारख्या ठिकाणांवरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांमुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखा साथरोग फैलावण्याची भीती लक्षात घेऊन 11 पासून जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानक, एसटीस्थानक या ठिकाणी आठ पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya