Thursday, Dec 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी १० एचआयव्हीबाधित जोडपी 'रेशीमगाठी'त गुंफणार

१० एचआयव्हीबाधित जोडपी 'रेशीमगाठी'त गुंफणार

Print
लोकमत
०२ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

पुणे, दि. १ (प्रतिनिधी) : 'एचआयव्ही बाधित' या नुसत्या कल्पनेनेही हादरून जाणाऱ्या समाजव्यवस्थेत अशा लोकांशी रक्ताचे नाते असणारेही जिथे दूर पळतात. तेथे अशा लोकांचे लग्न होणे किवा ते करण्यासाठी प्रयत्न करणे ही बाबच अविश्वसनीय आहे. मात्र, काही सामाजिक संस्था आणि समाजसेवी विचारांच्या लोकांच्या प्रयत्नातून या 'कम्युनिटी'चे लोक एकत्र आले आणि त्यांच्याही आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार असून, बदलत्या समाज रचनेचे द्योतक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

आरोग्य डॉट कॉम, वेक अप पुणे, दीपगृह, पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम यांनी संयुक्तपणे एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी इंदूर, हैदराबाद, रांची, गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, धुळे, कोल्हापूर येथून सुमारे १२३ पुरुष आणि ४२ स्त्तियांची उपस्थित होती. मेळाव्यातून १० जोडप्यांनी लग्न करण्याचे जाहीर केले आहे. लग्न ठरलेली ४ जोडपी पुण्यातील असून, उर्वरित ६ जण गुजरात व गोवा येथील आहेत. यावेळी वधू-वरांसोबत आलेल्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आले. तर एआरटीचे दुष्परिणाम, हेपॅटायटीस ए आणि बीसाठीचे लसीकरण, फॅमिली प्लॅनिग, एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने आहार कोणत्या प्रकारचा घ्यावा, काय काळजी घ्यावी, अशा अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.

या वेळी आरोग्य डॉट कॉमचे संचालक आनंद शिदे, दीपगृह सोसायटीचे प्रमुख अविनाश चक्रनारायण, पॉझिटिव्ह साथी डॉट कॉमचे प्रमुख अनिल वळीव, पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ.राजेंद्र जगताप, फिजिशियन डॉ.विजय वारड आदी उपस्थित होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya