Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एच.आय.व्ही लस

लस म्हणजे काय ?
लस हा शरिरात रोगप्रतिकारक शक्ती जागृत करुन, रोग जंतुच्या संसर्गाला प्रतिबंध करणारा अथवा संसर्गाला प्रतिरोध करणारा पदार्थ आहे. मानवाच्या शरिरात उपजतच रोगप्रतिकार क्षमता असते.जेंव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, तेंव्हा तिची रोगप्रतिकारक शक्ती शरिराचे त्या जंतुसंसर्गापासुन रक्षण करण्यास शिकते. परंतु लस रोगप्रतिकारक संस्थेला संसर्ग होण्याआधिच आजारास कारणीभुत असणार्‍या जंतुना ओळखायला शिकवते, म्हणजेच शरिराला आजारांशी लढा देण्यासाठी आणि त्यांना दूर ठेवण्याचे काम लस करते.

जगात आणि भारतात लाखो लोक एच.आय.व्ही बाधित जीवन जगत आहेत. एड्स मुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षित वर्तणुक आणि सवयींमुळे एच.आय.व्ही च्या संसर्गाला प्रतिबंध करता येतो पण त्यालाही काही मर्यादा आहेत. या सर्वांच्याबरोबरच या साथीचा वाढता प्रसार थोपवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीसारखे नवे उपाय विकसित करण्याचे प्रयत्न करणे ही आवश्यक आहे. एड्स विरुध्द लस विकसीत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत. ही साथ संपवण्यासाठी आपल्याला एच.आय.व्ही चा संसर्ग व एड्सपासुन संरक्षण देऊ शकेल अशी एड्सची प्रतिबंधात्मक लस ही जगाची सर्वोत्तम आशा आहे. परंतु लोकांच्या आणि समाजाच्या मनापासुन सहभागाशिवाय हे संशोधन शक्य नाही. प्रभावी एड्सच्या लसीची प्रत्यक्षात निर्मिती होण्यासाठी वेगवेगळ्या एड्सच्या लसींच्या चाचण्या मानवामध्ये करण्याची गरज आहे.

एड्स प्रतिबंधक लस उपलब्ध आहे का ?
सध्या तरी एड्सवर परिणामकारक लस उपलब्ध नाही पण बर्‍याच प्रकारच्या एड्स विरोधी लसींवर संशोधन सुरु आहे. या चाचण्या प्रयोगशाळेत, प्राण्यांवर, माणसांवर होत आहेत.

ऍन्टीरेट्रोव्ह्यायरल उपचार पध्दती- ART Therapy
हा एक एच.आय.व्ही आणि एड्स वर करण्यात येणार्‍या उपचारांपैकी एक मुख्य उपचार आहे. ह्या उपचारामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण आयुष्य वाढवतो. ह्या उपचारांमध्ये घेण्यात येणारी ओषधे ही कायम घ्यावी लागतात. सध्या जी उपचार पद्‍धती उपलब्ध आहे त्यामूळे एच.आय.व्ही ची लागण झालेल्या व्यक्तीला आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येते.

उपचार सुरु करण्यासाठी योग्य वेळ कोणती ?
तसे काही निश्चीत सांगता येत नाही तरी देखील शेवटच्या टप्प्यात उपचार सुरु नाही करता येतात.

खालील काही गोष्टी लक्षात घेऊन उपचार सुरु करता येतात.
  • जर सि.डी.४ चाचणीनुसार टि-हेल्पर पेशी जर २०० ते ३५० च्या दरम्यान असतील तर ( per cubic millimeter )
  • तुम्हाला झालेली लागण खूप जास्त आहे की मध्यम आहे
  • तुम्हाला झालेल्या लागणीपैकी एखादी संधीसाधू आहे का? त्याने तुम्हाला खूप त्रास होत आहे का?
भारतामध्ये फक्त ७ % लोकांना ऍन्टीरेक्ट्रोव्हायरल उपचार मिळतात.

उपचार आणि चिकित्सा योजना: या उपचार पध्दतीमध्ये देण्यात येणारी ओषधे,
  • अंन्ट्रायल्टोव्हायरल
  • ऍन्टी एच.आय.व्ही ड्रग्स
  • एच.आय.व्ही. ऍन्टीव्हायरल ड्रग्स.
ऍन्टीरेक्ट्रोव्हायरल उपचार पध्दतीमध्ये कधी कधी कॉंम्बिनेशन थेरपीचा वापर करतात. यामध्ये ३ वेगवेगळ्याप्रकारची ओषधे एका वेळीच दिली जातात आणि ही थेरपी बर्‍याच वेळा उपयुक्त ठरते. या थेरपी मध्ये निरनिराळ्या प्रकारचे कॉंम्बिनेशन उपलब्ध आहेत. जवळपास २० प्रकारची ओषधे उपलब्ध आहेत. पण कोणते सवोत्तम आहे हे सांगता येणे कठीण आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या तब्येतीनुसार ओषधे लागू पडतात.

ऍन्टीरेक्ट्रोव्हायरल उपचार हे भारतामध्ये आता स्वस्त होत आहेत
आत्तापर्यंत नॅकोला ऍन्टीरेक्ट्रोव्हायरल उपचारांसाठी प्रत्येक पेशंट मागे दर वर्षाला ७००० एवढा खर्च येतो. जवळपास १.३ लाख लोक जे एच.आय.व्ही संक्रमित आहेत त्यांना सरकारच्या ऍन्टीरेक्ट्रोव्हायरल उपचार योजने मार्फत मोफत मध्ये उपचार मिळतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya