Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

Coping with Challenges in Pediatric HIV Care

Print PDF
विद्या कुलकर्णी
Happier moments, Savita with her elder daughter Happier moments, Savita with her elder daughter
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सविता रहाते. (नाव बदलले आहे.) सविता २९ वर्षांची स्त्री आहे. तिच्या दोन छोट्या मुली हेच तिचे सर्वस्व आहे. सविता म्हणते, "ह्या दोन मुलींमुळे मला जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे, एक कारण मिळाले आहे." सविताला असे वाटण्याचे कारणच प्रबळ आहे. कारण सविता स्वत: एच.आय.व्ही. च्या एका मोठ्या धुमश्चक्रीतून जाऊन आलेली आहे.

दुसर्‍यावेळी गरोदर असताना सविताला एच.आय.व्ही.ची लागण झाली. तो पर्यन्त तिने कधीच एच.आय.व्ही. बद्दल ऐकले सुद्धा नव्हते. त्यामुळे तिला भीती वाटली की पोटातल्या बाळाला खूप काही भयंकर होणार आहे. पण आश्चर्य म्हणजे सविताच्या बाळाला काहीही झाले नाही. उलट तिची मुलगी खूपच सुदृढ अशी जन्माला आली. ह्याचे मुख्य कारण म्हणजे सविताने गरोदरपणातच PPTCT (prevention of parent to child transmission) चे व्यवस्थित उपचार सांगली येथील हॉस्पिटल मध्ये घेतले होते.

Counseling sessions ensure self-help Counseling sessions ensure self–help
सांगलीतील स्वयंसेवी संस्था - येरला प्रोजेक्ट सोसायटीच्या मदतीने सविताला ताबडतोब योग्य ते उपचार सुरू करता आले. सविताला स्वत:ला आणि तिच्या थोरल्या तीन वर्षाच्या मुलीलाही उपचार सुरू झाले. तेथे झालेल्या समूपदेशनाचा तेव्हा तर उपयोग झालाच, पण मुलींना वाढवताना स्वत:ला संभाळत जगतानासुद्धा त्या समूपदेशनाचा उपयोग होईल ह्याची तिला खात्री वाटली. जगण्यासाठी एक नवे बळ आले. नवी उमेद आली.

योग्य वेळी योग्य आधार मिळाला तर सविताच्या मुलींप्रमाणे इतर अनेक एच.आय.व्ही सहीत जगणार्‍या मुलांना समूपदेशनाने एक चांगला आधार मिळेल अशी खात्री वाटते. सांगली जिल्ह्यातील अनेक संस्था एकत्र येऊन लहानमुलांसाठीचे एच.आय.व्ही. विषयक काम Pediatric HIV care करू लागल्या आहेत. "दिशा" (District Integrated Strategic HIV/AIDS Action) ह्या संस्थेने आखणी केलेल्या कामानुसार तेथे एच.आय.व्ही. चे काम केले जाते. त्या कामाला लन्ग=एन

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya