Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स एड्स म्हणजे काय? एच.आय.व्ही. संसर्गासहीत जगताना

एच.आय.व्ही. संसर्गासहीत जगताना

Print PDF
एच.आय.व्ही चा विषाणू हा प्रतिकार शक्तीवर हल्ला करतो. एच.आय.व्ही चे विषाणू शरिरात सर्वत्र लपुन रहातात पांढर्‍या रक्त पेशी मधल्या सि.डी. ४ ह्या रक्तपेशी मध्ये ते जास्त प्रमाणात आढळुण येतात. प्रत्यक्ष सि.डी. ४ पेशीत शिरुन हे विषाणू त्या पेशींच्या न्युक्लीअस मध्ये आसरा घेतात. शरिराची रोग प्रतिकारक शक्ती त्या लपलेल्या विषाणूंचा नाश करु शकत नाही. आणि कालांतराने ही लागण सि.डी. ४ पेशीतुन रक्तात पसरते, या वेळात ती व्यक्ती एच.आय.व्ही पॉझीटीव्ह असते त्या व्यक्तीने जर दुषीत रक्त दुसर्‍या व्यक्तीला दिले तर ति व्यक्ती प्रसार व लागण दुसर्‍या निरोगी व्यक्तीला करु शकते. एच.आय.व्ही पॉझीटीव्ह स्त्री जर गर्भवती झाली तर तिच्या बाळाला एच.आय.व्ही ची लागण होण्याची शक्यता असते.
  • हा विषाणु लैंगिक स्त्रावात जास्त प्रमाणात सापडतो. दुषित रक्तातुन तो पसरण्याची शक्यता जवळ पास ९५ % असते.
  • स्त्रीकडुन पुरषाला लागण होण्याचे प्रमाण कमी असते.
  • एच.आय.व्ही चा विषाणु शरिरात शिरला कि बर्‍याच केसेस मध्ये व्यक्तिला काहीच त्रास होत नाही.
  • पहिली अनेक वर्षे जी व्यक्ती एच.आय.व्ही. सहीत जगत असते ती एड्सने आजारी नसते.
  • निरोगी व्यक्तीच्या शरिरात सि.डी.४ पेशी १००० ते १२०० प्रति सी.सी. असतात.
  • हळूहळू दर वर्षी सि.डी. ४ पेशींचे प्रमाण १०० ते २०० अशा कमी होतात.
  • जशी जशी रोगप्रतिकारक सि.डी.४ पेशींची संख्या कमी होत जाते ती व्यक्ती दुर्बल होत जाते.
  • नागिण, टीबी सारखे संसर्गजन्य आजार आधी होतात व सि.डी. ४ पेशींचे प्रमाण हे १२०० वरुन २०० वर येते.( जे ८ ते १० वर्षात होते.) आणि त्या व्यक्तिची रोगप्रतिकारक शक्ती कोणत्याही रोगास प्रतिकार करु शकत नाही.
  • एच.आय.व्ही पॉझीटीव्ह ते एड्स ह्या मधील अंतर हे बरेच असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya