Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एड्सचा उगम

Print PDF
एड्स हा रोग प्रथम कधी उद्भवला. त्याचा शोध कधी लागला?
Origin of HIV & AIDS Origin of HIV & AIDS
१९८१ साली अमेरिकेत लॉस अॅन्जेलिस या ठिकाणी प्रथम एड्सचे रोगी निदर्शनास आले. त्या वेळी या नवीन रोगाचं कारण कळू शकलं नाही. एड्स हे नावही त्या वेळी ठेवलं गेलं नव्हतं. पण हा रोग समलिंगी लैंगिक संबंध (Homosexuals) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये दिसून येतो, याची मात्र नोंद घेतली गेली.

याचवषीर् युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील काही ठिकाणी इण्ट्राबिनस ड्रग्जचं व्यसन करणाऱ्या लोकांमध्येही हा रोग दिसून आला. सुरुवातीला केवळ व्यसनाधीन आणि समलिंगी संबंध करणाऱ्या लोकांमध्येच हा रोग होऊ शकतो, असा गैरसमज अनेकांनी करून घेतला. पण पुढे हे स्पष्ट होत गेलं की विभिन्नलिंगी संबंध ( Heterosexual ) केल्याने ही हा रोग होऊ शकतो.

१९८३ साली पॅरिसमधल्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये या रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना शोधण्यात यश आलं. व्हायरस जातीच्या या जीवाणूंना पुढे Human immuno deficiency virus , ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सि व्हायरस म्हणजे एचआयव्ही हे नाव देण्यात आलं. या जीवाणूंमुळे रक्तातील टी हेल्पर सेल किंवा टी४ सेल या पेशी नष्ट होतात. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करता येण्याची जी क्षमता ( Immunity ) आपल्या शरीरात असते तिच्याशी या पेशींचा थेट संबंध असतो. जीवाणूंमुळे या पेशी नष्ट होऊ लागताच व्यक्तीवर मग कुठलेही जंतू आक्रमण करून रोग निर्माण करू शकतात.

Central West Africa Central West Africa
त्वचेपासून मेंदूपर्यंत, फुफ्फुसांपासून आतड्यापर्यंत सर्वच अवयव विविध रोगांनी ग्रासले जाऊन व्यक्ती असह्य यातना आणि हालअपेष्ठा सोसत मृत्यूमुखी पडते. असा अंत व्हायला मात्र जीवाणू शरीरात प्रविष्ट झाल्यापासून पाच ते दहा वर्षांचा काळ लागतो.

एड्सचे जीवाणू शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर सुरुवातीची ५ ते १० वर्षं व्यक्ती बाहेरून निरोगी आणि सर्वसामान्य दिसते. व्यक्तीला स्वत:लाही आपल्याला बाधा झाली आहे, याचा मागमूस लागत नाही. हा काळ सर्वाधिक धोकादायक म्हणावा लागेल, कारण बाह्यांगी निरोगी दिसणाऱ्या या व्यक्तीकडून मात्र या काळात इतरांना या रोगाची लागण होऊ शकते.

- डॉ. राजन भोसले (महाराष्ट्र टाइम्स)

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya