Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

कंडोम

Condom Condom
जर आपण किंवा आपला जोडीदार आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत असेल, नियंत्रण ठेवणे अशक्य वाटत असेल किंवा आपणास शाररिक संबंध प्रस्थापित करायचेच असतील तर कंडोम वापरणे कधीही हिताचे ठरते. लक्षात ठेवा: जरी कंडोमचा वापर योग्यरितीने केला गेला असला तरी दोन टक्के कंडोम हे सदोष असतात.

कंडोम खालील कारणासाठी उपयुक्त ठरतात.
 • गर्भावस्था किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी
 • लैंगिक विकारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी
 • HIV चा संसर्ग टाळण्यासाठी.
कंडोम वापरासाठी काही महत्वाच्या सुचना
 • कंडोमच्या पाकीटावरील वापराची अंतिम मुदत तारीख पडताळून घ्यावी.
 • अंतिम तारखेनंतरचे कंडोम हे सदोष असण्याची शक्यता अधिक असते. असे कंडोम आपले संरक्षण करु शकत नाहीत.
 • लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याआगोदरच कंडोमचा वापर करावा.
 • कंडोम शिश्नावर चढवल्यानंतर त्याच्या वरील भागात हवा राहीली नाही ना याची पडताळणी करावी.
 • जर सुंथा झालेली नसेल तर शिश्नावरील संपूर्ण कातडे मागे ओढून मगच कंडोम चढवावा. शिश्नाच्या खालील भागापर्यंत निरोध सरकवत न्यावा आणि त्यात काही प्रामाणात हवेचे अस्तित्व असल्यास ते काढून टाकावेत. कंडोम अश्या हवेमुळे व संबंध प्रस्थापित करताना होणा-या घर्षणामुळे फाटण्याची शक्यता अधिक असते.
स्त्रीयांच्या वापरासाठी कंडोम
Female Condom Female Condom
आज बाजारात स्त्रीयांनी स्वतः वापरण्याचे कंडोमही उपलब्ध असतात. ते पुरुषांच्या निरोधापेक्षा आकाराने मोठे असतात पण लांबीला सारखेच असतात. स्त्रीयांच्या वापरासाठी असलेल्या निरोधांना एका लवचिक वलयाकृती प्रवेश मार्ग असतो. हे कंडोम योनीत सरकवायचे असतात. या वलयाकृती मुखामुळे योनीमार्गाच्या सखोल भागापर्यंत संरक्षण तर मिळतेच शिवाय कंडोमही जागच्या जागीच राहतो.

स्त्रीयांच्या कंडोमच्या वापरासाठी काही महत्त्वाच्या सूचना
 • हवाबंद असलेल्या आवरणातून कंडोम हळूवारपणे बाहेर काढावा व हाताळताना दक्षता घ्यावी.
 • आतील लहान लवचिक वलयाकृती भाग हाताने घट्ट दाबून बंद करावा.
 • हा लहान वलयाकृती भाग योनीमार्गात खोलवर सरकवत न्यावा व बाहेरील वलयाकृती भाग बाहेरच असावा.
 • या बाह्य वलयाकृती भागातूनच शिश्न योनीत प्रवेश करेल याची दक्षता घ्यावी. यामुळे कंडोमही जागच्या जागीच राहण्यास मदत मिळते.
 • संबंध प्रस्थापित करुन झाल्यानंतर स्त्रीयांनी कंडोमचा बाह्य वलयाकृती भाग घट्ट दाबून बंद करुन घ्यावा. हे करताना वीर्य बाहेर किंवा योनी मार्गात पडणार नाही याची दक्षता घ्यावी व कंडोम बाहेर ओढून काढावा.
 • घर्षण टाळण्यासाठी कंडोमच्या अंतर्गत भागात ल्युब्रिकेंट म्हणजेच तरल चिकट पदार्थ लावावेत.
जर आपला जोडीदार कंडोमचा वापर करण्याचा विरोध करत असेल तर खालील प्रश्नोत्तराद्वारे आपण मनवळवणी करु शकता.

जोडीदाराने केलेला युक्तीवाद
तुझा माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे पण नकळतही संसर्ग होऊ शकतो.
कंडोमच्या वापरामुळे समाधानप्राप्ती होत नाही. कंडोमच्या वापरामुळे मी निर्धास्त असते/असतो. मी जर निश्चिंत असेन तर मी तुला अधिक आनंद देऊ शकेन.
कंडोम वापरल्यास शिश्नास ताठरता येत नाही. कंडोमच्या वापरासाठी मी मदत करते ज्यामुळे तुझी ताठरता कमी होणार नाही.
कंडोम वापरायला सांगितल्यामुळे नाते संबंध तुटण्याची भिती वाटते. जर विचारले नाही तर तुझाच आपल्या जोडीदारावर विश्वास नसल्याचे सिद्ध होईल.
कंडोम वापरल्यामुळे माझ्या भावना उद्यपित होत नाहीत. कदाचित वापरामुळे आपणास संभोगाचा अधिक काळ आनंद घेता येईल.
कंडोम वापरल्यास शिश्नास फार काळ ताठरता येत नाही. कंडोमच्या वापरासाठी मी मदत करते ज्यामुळे तुझी ताठरता टिकून राहील.
मी माझ्याबरोबर कंडोम आणलेला नाही. माझ्याकडे आहे.
कंडोमचा वापर करणे आपला जोडीदारच घेईल. आरोग्य हे आपले असते. हा आपल्या आरोग्याविषयीचा निर्णय असतो.
मी गर्भनिरोधक गोळी घेतलेली आहे त्यामुळे कंडोमची आवशक्ता नाही. तरीही मला कंडोम वापरायला आवडेल कारण या नकळत होणार्‍या रोगांपासून आपल्या दोघांचेही रक्षण होईल.
कंडोम वापरल्यामुळे माझी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा मरते. कदाचित वापरामुळे आपणास संभोगाचा अधिक काळ आनंद घेता येईल.
कंडोमच्या वापरामुळे खूप अडथळा येतो. मी मदत केली किंवा माझ्या वापरामुळे कोणताही अडथळा येणार नाही.
मला वाटते तुझे माझ्यावर प्रेमच नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे पण मला आपले दोघांचेही भविष्य धोक्यात घालायचे नाही.
मी वीर्यपतना आगोदरच शिश्न बाहेर काढून घेईन. स्त्री गर्भावस्था धारण करु शकते किंवा वेळे आगोदर वीर्यपतन झाल्यास लैंगिक रोगही होऊ शकतात.
पण मी तुझ्यावर प्रेम करतो... मग आपल्या दोघांच्याही संरक्षणासाठी सहकार्य कर.
फक्त एकदाच किंवा फक्त आत्तापुरते. "फक्त आत्तापुरतेच" हा विचार धोकादायक ठरु शकतो.

अदृष्य कंडोम
कॅनडा या देशातील लॅवेल विद्यापिठात असे ल्युब्रिकेंट संशोधित केले आहे की जे संभोगामुळे निर्माण होणा-या उष्णतेमुळे घन स्वरुप धारण करते. प्रयोगशाळेत असे दिसून आले की अशा प्रकारचे कंडोम HIV व काविळ यासारख्या रोगांपासून बचाव होऊ शकतो. घन स्वरुपातील लुब्रिकेंट हे काही काळ नंतर पातळ होऊन निघून जाते. अद्यापही प्रयोगशाळेतच त्याचे संशोधन सुरु आहे पण त्यास सर्वसामान्य वापरासाठी संमती मिळालेली नाही.

कंडोम संबंधी आणखी काही उपयुक्तता
 • दुसरे महायुद्ध, व्हिएतनामचे युद्ध व नुकत्याच इराकशी झालेल्या युद्धात अमेरिकेच्या सैन्याला लुब्रिकेंट नसलेले कंडोम बंदुकीवर वापरण्यासाठी दिले होते. या कंडोमचा वापर बंदुकांच्या पुढील भागावर केला जातो. अशा वापरामुळे बंदुकांचा पुढील भाग गंजत नाही तसेच हवेतील आद्रता, दव किंवा हवेतील प्रदुशणांपासून संरक्षण होते.
 • दुसर्‍या महायुद्धात निरोधचा आणखी एका कारणासाठी वापर केला गेला. पूर्वीच्या काळी लढावू विमानात शौचालय नव्हते त्यामुळे प्रसंगी लघवी थांबवण्यासाठी किंवा लघवीने भरलेले हे कंडोम शत्रूपक्षाच्या विभागात टाकण्यासाठी कंडोमचा वापर होत असे.
 • दारुगोळा साठवण्यासाठीही कंडोमचा वापर होत असे कारण कंडोमच्या अंतर्भागात आद्रता शिरत नाही.
 • याच युद्धाच्या काळात कठीण प्रसंगी पाणी साठवण्यासाठीही कंडोमचा वापर केला होत.
 • तस्करीसाठीही कंडोमचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो.
 • एका प्रख्यात लेखकाने समुद्राच्या खालील भागात निर्माण होणा-या ध्वनीला टिपण्यासाठी मायक्रोफोन कंडोममधे घालून ठेवले होते.
 • उत्तर अमेरिकेतील प्रवासी कॅट फिश या माश्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कंडोम घालून पाण्यातून प्रवास करत असत.
 • नाटक सिनेमामधे मारामारीचे प्रसंग खरे दाखवण्यासाठी खोटे रक्त दाखवण्यासाठी कंडोममधे लाल पाणी भरुन त्याचा वापर करतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya