Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

कारणे

  • संसर्ग झालेले रक्त.
  • संसर्ग झालेल्या सुया.
  • एकापेक्षा अधिक व्यक्तींशी शरीरसंबंध.
  • संसर्ग झालेल्या आईपासून गर्भावस्थेत असलेल्या बाळाला.
  • संसर्ग झालेल्या सुयांचा वापर करून शिरेमध्ये घेता येण्यासारख्या मादक द्रव्यांमुळे.
  • “एच्‌.आय्‌.व्ही.” जंतूंचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रक्त, वीर्य, योनीस्त्राव इत्यादी मधून “एच्‌.आय्‌.व्ही.” जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
जर “एच्‌.आय्‌.व्ही.” जंतुंचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रक्त किंवा अशाप्रकारचा स्त्राव ह्यांचा तुमच्या रक्ताशी संबंध आला तर, तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो. निरोध न वापरता, “एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्ग झालेल्या पुरूषाने, शरीरसंबंध केल्यास, शरीरसंबंध करतांना योनीमार्गाला झालेल्या किरकोळ खरचटण्यामधून व निर्माण होणार्‍या स्त्रावामधून “एच्‌.आय्‌.व्ही.” जंतूंचा जोडीदाराच्या शरीरात शिरकाव होतो. ह्या जंतूंचे स्वरूप इतके सूक्ष्म असते की, हे आपल्या लक्षात येऊ शकत नाही.

स्त्रिच्या योनीमार्गातून केलेला शरीरसंबंध व गुद्‌द्वारांमधून केलेला शरीरसंबंध ह्यातील दुसर्‍या प्रकारातून होणार्‍या संसर्गाचे प्रमाण हे खूप अधिक असते.

“एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्ग झालेल्या स्त्रिशी निरोध न वापरता पुरूषाने शरीरसंबंध ठेवल्यास इंद्रियाला होणार्‍या किरकोळ खरचटण्यामुळे किंवा स्त्रावांच्या एकत्रित येण्यामुळे पुरूषाला संसर्ग होऊ शकतो. शरीरसंबंध करतांना कोणत्याही कारणाने रक्तस्त्राव झाल्यास किंवा स्त्रिची मासिक पाळी चालू असतांना अशा प्रकारचा संबंध ठेवल्यास, तसेच गुद्‌द्वारामधून केलेल्या संभोगामध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे, संसर्ग होण्याची भिती जास्त दाट असते.

संसर्ग होण्याची प्रक्रिया
“एड्स” होण्यासाठी कारणीभूत असलेले जंतू, व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिबंधक यंत्रणेवर थेट हल्ला चढवतात. आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींच्या प्रुष्ठभागावर असलेल्या सीडी ह्या अणूंवर थेट हल्ला चढवतात. व त्यावर आपले आवरण निर्माण करतात.

थोडक्यात सांगायचं म्हणजे, “एड्स” होण्यासाठी कारणीभूत असलेल्या जंतूंच्या बाहेरच्या बाजूस, प्रोटीन्स व ग्लायकोप्रोटीन्स यांचे संरक्षणात्मक कवच असते व आतील भागात उत्पत्तीवाढ कारणीभुत असलेली अशी गुणसूत्रांची माहिती साठविलेली असते. जंतूंची वाढ होण्यासाठी आवश्यक ते माध्यम म्हणून यजमान पेशींचा

वापर केला जातो. त्यामुळे रोगजंतूंना स्वतःहून काही करायचे नसते व हे जंतू यजमान पेशींच्या मानाने (उदा. टी-सेल) आकारमानामध्ये खूप लहान असतात. “एड्स” होण्यासाठी कारणीभूत असलेल्या जंतूंच्या अंतर्भागात असलेल्या प्रोटीन कवचापेक्षा, यजमान पेशींच्या केंद्रस्थानी जवळ जवळ १,००,००० पट इतकी उत्पादन क्षमतेसंबंधात माहिती असते. तरीसुध्दा एकदा संसर्ग झाल्यावर, यजमान पेशी जंतूंचे आक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने काहीही करू शकत नाहीत.

हा संसर्ग पुढीलप्रकारे होतो
“हेल्पर टी सेल”च्या बाह्य आवरणावर असलेल्या सीडी ४ नावाच्या खास “प्रोटीन”वर जंतू आपला मुक्‍काम करतात. ह्यामुळे यजमान पेशी व नवीन आलेल्या रोगजंतूंच्या पेशी, ह्या एकजीव होतात. अशापध्दतीने, गुणसूत्रांविषयीची साठविलेली माहिती ही, हल्ला करणार्‍या रोगजंतूंच्या पेशीमध्ये एकवटली जाते. शरीरातील पेशींची गुणसूत्रविषयक माहिती “डी.एन्‌.ए” (डिऑक्सी-रिबोन्युक्लिक ऍसीड) घटकांने दर्शविली जाते. तर, ह्या जंतूंची गुणसूत्रविषयक माहिती बरोबर उलट पध्दतीने म्हणजे “आर्‌.एन्‌.ए” (रिबोन्युक्लिक ऍसीड) घटकांने दर्शविली जाते. हे करण्यासाठी आवश्यक ते घटक, यजमान पेशींकडूनच घेतले जातात. फक्त, अतिशय किरकोळ प्रमाणात जंतूंपेशींनी आपल्या बरोबर “हेल्पर प्रोटीन” आणलेले असतात.

आता “डी.एन्‌.ए” पेशी होण्यायोग्य झालेला असतो व तो केंद्रामध्ये विलीन होतो. ही सर्व क्रिया संसर्ग झाल्यापासून जेमतेम अर्ध्या दिवसात होते. शरीरात प्रवेश करणारा परका “डी.एन्‌.ए” घटक, शरीरात असणार्‍या यजमान “डी.एन्‌.ए” मध्ये प्रवेश करून बसतो आणि तो मुळपेशींची नक्‍कल करण्यास सुरूवात करतो. “एड्स” च्या सुरूवातीला संसर्गजंतूंचा “डी.एन्‌.ए” नवीन “आर्‌.एन्‌.ए” अणूंची नक्‍कल करण्यास सुरूवात करतो व हे कसे घडते हे अजून उमगलेले नाही. जमा होणारे “आर्‌.एन्‌.ए” पेशीच्या “सिटोप्लाझम्‌”कडे मार्गस्थ होतात व तिथे स्वतःची प्रोटीन्स तयार करायला लागतात.

नवीन “आर्‌.एन्‌.ए” यजमान पेशींच्या साधनांपासून, “एड्स”चे नवीन नवीन जंतू तयार करायला सुरूवात करतात (संरक्षक कवच, “हेल्पर व “अँकर प्रोटीन्स”) ह्या सर्वांची नक्‍कल करण्याचे काम पूर्ण झाल्यावर अशाप्रकारचे हजारो बुडबुडे तयार होतात व “सेलमेंब्रेन”च्या पृष्ठभागांशी एकरूप होतात. सरतेशेवटी “आर्‌.एन्‌.ए” गुणसूत्रांची माहिती बुडबुड्यामध्ये एकत्रीत केली जाते आणि पेशीच्या ह्या भागाचे “मेंब्रेन” उलटपालट होतात व नवीन जंतू पेशीमधून बाहेर पडतात. अर्थात “एड्स”चे नवीन जंतू मूळ यजमान पेशी अशक्त करतात व सरतेशेवटी यजमान पेशी मरते. अशारीतीने, संरक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळते व “एड्स”चा प्रादुर्भाव होतो. जगभरातील मिळून, १९९६ साली २८ दशलक्ष एवढ्या लोकांना “एच्‌.आय्‌.व्ही.” रोगजंतूंचा संसर्ग झालेला होता.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya