Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता आय.डी.यु. आणि एच.आय.व्ही

आय.डी.यु. आणि एच.आय.व्ही

Print PDF
आय.डी.यु.- म्हणजे काय ?
Injecting Drug User Injecting Drug User Injecting Drug User
Injecting Drug User
IDU (इंजेक्टींग ड्रग युजर )
जे लोक अधिक आनंद मिळवण्याकरता नसेद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करतात, त्यांना आय.डी.यु. म्हणतात.

आय.डी.यु. आणि एच.आय.व्ही चे संक्रमण कशा प्रकारे होते ?
- इंजेक्शन व सिरींज द्वारे दुषित रक्त शरिरात प्रवेश करते.

सुई किंवा सिरींज चा एकपेक्षा जास्त वेळा वापर करण्यामुळे एच.आय.व्ही ची लागण रक्तामधुन होते.

उपकरणे शेअर करणे
Sharing drug equipment can also provide a risk of HIV transmission
Sharing drug equipment can also provide a risk of HIV transmission
जर आपण आधिच दुषित रक्त असलेल्या सिरींज,अधिच वापर केलेले पाणी, चमचा, कुकर तसेच बाकीचे उपकरणे जी ड्रग्स पाण्यामध्ये विरघळवण्याकरता किंवा ड्रग्स तयार करण्याकरता केला तर दुषित रक्ताची आपल्या शरिरात लागण होऊ शकते. तसेच एकदा वापर झालेला कापुस परत वापरणे किंवा सिगरेट फिल्टर (ज्याचा वापर ड्रग फिल्टर करण्यासाठी होतो) वापरल्यास सुई ब्लॉक होते.

एच.आय.व्ही हाच केवळ (आय.डी.यु.) करता धोका नाही
इन्जेक्टींग ड्रगचा वापर करताना लागणार्‍या उपकरणाचा पुर्नवापर करण्यामुळे होणार्‍या धोक्यांपैकी एच.आय.व्ही हा एक आहे आणि इतर धोके:
हिपेटायटिस -बी
हिपेटायटिस -सी
स्मृतीभंश, नैराश्य

खोकला, श्वासोच्छ्वासास त्रास होणे .

आय.डी.यु. - जागतीक स्वरुप
  Septicaemia
 • इंजेक्टेबल ड्रग युजर मध्ये एच.आय.व्ही ची लागण ही एक वाढणारी आरोग्य विषयक समस्या आहे.
 • १९९९ च्या अहवालानुसार आत्तापर्यंत १३६ देशांमध्ये इंजेक्टेबल ड्रग युजर आढळुन आले आणि त्यापैकी ११४ देशांमधील लोकांना एच.आय.व्ही ची लागण झाली.
 • आत्तापर्यंतच्या अनुमानानुसार १३.२ मिलियन लोक हे इंजेक्टेबल ड्रग युजर आहेत आणि त्यापैकी १० मिलियन हे विकसनशील देशांमधील आहेत.
आय.डी.यु. चे भारतामधील प्रमाण
 • भारतामध्ये आय.डी.यु च्या वापरामुळे झालेला महत्त्वपुर्ण बदल म्हणजे लोक धुम्रपान सोडुन याकडे वळाले.
 • हेरोईन, ब्राऊन शुगर, फोर्टविन, डेक्स्ट्रोप्रोक्सीव्हिन हे भारतामध्ये साधारणपणे वापरले जाणारे ड्रग्स आहेत.
 • आय.डी.यु चा वापर हा सर्व स्तरावर केला जातो.
शहर
Map of India
Map of India
जिथे एच.आय.व्ही ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे, तिथे इंजेक्टेबल ड्रग युजरचे प्रमाण जास्त आहे.जसे चेन्नई, नवी दिल्ली इत्यादि.

पुणे
नॅको ने अशातच एक उपचार विषयक कार्यक्रम आयोजीत केला होता. हे दाखवण्यासाठी तसेच पुण्यामध्ये आय.डी.यु. चे प्रमाण किती आहे ते दाखवण्यासाठी.

पुर्व-उत्तर भारत
HIV prevalence among IDU: Metro cities
HIV prevalence among IDU: Metro cities
मणीपुर आणि नागालँड मध्ये इंजेक्टेबल ड्रग युजर चे प्रमाण १.९ % ते २.७ % एवढे आहे.
इतर - नॅकोच्या सर्वेक्षणानुसार आय.डी.यु चे प्रमाण हे ग्रामीण भागातुन व छोट्या शहरांमधुन वाढत आहे.

आय.डी.यु. आणि एच.आय.व्ही
HIV prevalence among IDU: NE India
HIV prevalence among IDU: NE India
आय.डी.यु आणि एच.आय.व्ही चे संक्रमण
मणिपुर
 • १०८० पासुन मणिपुर मध्ये हेरोइन व एम्फेटामाइनच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
 • हे ड्रग अशियातील सर्वात मोठे नॅरकोटिकचे उत्पादन जेथे होते तेथुन उपलब्ध होते.
 • मणिपुर मध्ये सहजरीत्या ड्रग्सची उपलब्धता, बेरोजगारी, हिंसेचे वाढते प्रमाण यामुळे ड्रग्सच्या वापरामध्ये वाढ होते आहे.
 • एक सिरींज अनेक जणांमध्ये वापरणे यामुळे एच.आय.व्ही ची लागण होण्यामध्ये वाढ होत आहे.
 • मणिपुर मधील जवळपास १/३ व्यसनी लोक हे एच.आय.व्ही बाधीत आहेत.
वेश्या व्यवसाय आणि आय.डी.यु.
Risk Rings
इंफाल (मणिपुरची राजधानी)
 • ६९ स्त्रिया ज्या ड्रग्सचा वापर करतात त्यांची मुलाखात घेतली.
 • त्यापैकी ३८ स्त्रीया ह्या इन्जेक्टेबल ड्रग्सचा वापर करतात.
 • त्यापैकी ८०% स्त्रीया, ज्या व्यक्तीबरोबर संभोग करायचा आहे, त्याच्या तब्येतीबद्दल काहीही माहित नसलेल्या आणि कंडोम न वापरणार्‍या होत्या. आणि २/३ स्त्रीया संभोगाच्या बदल्यात ग्राहकाकडून ड्रग्स घेणार्‍या होत्या.
 • आय.डी.यु चे वापरणार्‍यांमध्ये एच.आय.व्हीची व्याप्ती ही ७५ % एवढी आहे.
दिल्ली आणि आय.डी.यु.
  Click to view large Image
  Map of Manipur
 • २००३ पासून एच.आय.व्ही. असणार्‍या आय.डी.यु वापरणार्‍या व्यक्तींची संख्या ही ७.४% वरून १४.४% वर आली.
 • तिहार जेल मधे सुद्धा आय.डी.यु वापरणार्‍यांची संख्या भरपूर दिसून आली.
कोलकता आणि आय.डी.यु
कोलकता मध्ये हिरोईन चे व्यसन करणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.
परंतु त्याची वाढती किंमत आणि उपलब्धता कमी असल्यामुळे लोक इंजेक्टिंग ड्रग्सचा वापर करु लागले. कम्युनिटीच्या अहवालानुसार ६०% लोक जे निकोटीनचा वापर करतात ते इंजेक्टिंग ड्रग्सचा वापर करतात. रस्त्यावरील ड्रग्स इंजेक्टरचा वापर करणार्‍या मध्ये ८०% लोक हे एकच सुईचा वापर करतात.

पुण्यामधे आय.डि.यु. चे रुग्ण आहेत का? - होय!
  Click to view large Image
  Map of Chennai
 • आजपर्यन्त रस्त्यावरील १०० आय.डि.यु. रुग्णांची सरकारी नोंद आहे. परंतु ही संख्या ह्यापेक्षा खूप जास्त असावी असा अंदाज आहे.
 • ह्या बद्दलचे गैरसमज आणि सामाजिक अप्रतिष्ठा ह्यामुळे आय.डी.यु. व्याधीग्रस्त मद्यमवर्गीय व्यक्ती मोकळेपणाने पुढे येऊन उपचार घेण्यास भीती बाळगतात.
धोका टाळण्यासाठे आपण काय करू शकतो?
 • HIV / AIDS जनजागृती आय.डी.यू. माहिती सहीत.
 • स्वच्छ उपकरणे वापरण्यास उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यामुळे होणारे संसर्ग बंद होतील.
 • वापरलेल्या सुया आणि इतर उपकरणे नष्ट करण्याचे शिक्षण देणे.
 • ड्रग्स व्यसनांवर फार्माकॉलॉजिकल उपचार.
 • खेड्यांपर्यन्त माहिती पोहोचविणे.
 • आय.डि.यू ह्या विषयावर एक स्व-मदत गट स्थापन करणे. ह्या गटात ह्या व्याधीतून बरे झालेल्या व्यक्ती इतरांना मदत करून मानसिक आधार देऊ शकतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya