Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही.

लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही.

Print PDF
Article Index
लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही.
page2
page3
All Pages
संभोग आणि लिंग
  • प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक वर्तन हे त्याच्या शरीररचनेवर अवलंबून असते.
  • प्रत्येक व्यक्तीची लैंगिक ओळख ही त्याच्या परंपरेच्या विचारांनुसार व वर्तनानुसार ठरत असते.
लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणारी व्यक्ती म्हणजे काय?
लिंगबदल वर्तन असणारी व्यक्ती अशी व्यक्ती असते की जो/जी आपले शाररिक रचनेतील लिंगाला अनुसरुन वर्तन न करता विरुद्ध लिंगी वर्तन करते.
असे वर्तन असणारी व्यक्ती, स्वतःला पुरुषलिंगी/ स्त्रीलिंगी किंवा आणखी तिसर्‍या लिंगाची ओळख देणारी असू शकते. ती व्यक्ती त्याच लिंगाच्या वर्तनास अनुसरुन वावरत असते किंवा विचार करत असते.

लिंग परिवर्तनात्मक वर्तनाचे स्पष्टीकरण
असे वर्तन असणार्‍या व्यक्तींमधे अनेक प्रकार आढळतात. काही व्यक्तींना शाररिक रचनेने पुरुष असूनही स्त्रीवेश परीधान करणे आवडते व हीच खरी स्वतःची ओळख असल्याचे ते मानत असतात. काही व्यक्तींच्या शरीर रचनेत जन्मतः पुरुष व स्त्री या दोघांचेही अंग असतात अशा प्रकाराला हर्माफ्रोडायटीस Hermaphrodites असे म्हणतात.

ट्रान्सेक्शूअल
ट्रान्सेक्शूअल व्यक्तींना त्यांच्या शाररिक रचनेत असलेल्या लिंगाबाबत समस्या उद्‍भवतात. त्यांना सतत असा आभास होत असतो की ते चुकीच्या शरीरात जन्माला आले आहेत. असे लोक वारंवार लिंगबदल करण्यासाठी प्रयत्नशील असतात जेणेकरुन त्यांना आपल्या ऐच्छिक शरीरासह जगता येईल.

निर्वाण समुदायातील व्यक्ती एकाअर्थी अशा प्रकाराच्या व्यक्तींचे उदाहरण आहे. या समुदायातील व्यक्तींनी चिकित्सांमार्फत आपला लिंगबदल घडवून आणलेला असतो.

ड्रॅग क्वीन- साटला कोठीस
या प्रकारातले पुरुष इतर पुरुषांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांना या कारणास्तव आकर्षित करण्यासाठी स्त्रीवेश परिधान करत असतात.

लिंग परिवर्तनात्मक वर्तनावर जगभरातील आढावा
पाश्चात्य संस्कृती: युनायटेड किंगडम आणि अमेरिका
पाश्चात्य देशातील समाजात पुरुष व स्त्री हे दोनच लिंग मानले जातात. असे असूनही या तिसर्‍या प्रकाराचा मोठ्याप्रमाणावर स्वीकार केला आहे. परंतु सर्वत्र व नियमित स्वीकृती व आदरार्थी दर्जा अद्यापही मिळालेला नाही.

ओमान: झेनिथ
झेनिथ हा मधला वर्ग म्हणजेच ना पुरुष ना स्त्री अशा स्वरुपात ग्राह्य धरला जातो. ईस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार त्यांना पुरुषांचे सर्व हक्क दिले जातात. तरीही झेनिथ ही तिसरा पंथ मानला जातो.

भारत: हिजडा/अली
भारतात हिजडा/अली यांना तृतीय पंथीय मानले जाते. ते पुरुषात अथवा स्त्रीयात गणले जात नाहीत. हे लोक जन्माने व शरीररचनेने पुरुष असतात पण ते भूमिका मात्र स्त्रीयांची बजावतात. हिजड्यांना काही हक्क प्रदान केले गेले आहेत पण ते भारतीय कायद्यातील नाहीत.

आशिया खंड आणि तृतीय पंथ
3rd Gender
तृतीय पंथाची संकल्पना आशियाखंडात सर्वसाधारण मानली जाते. यामधे भारतातील, बांगलादेशातील हिजडे व थायलंडमधील कॅथॉय सामाविष्ट आहेत.

लिंग परिवर्तनात्मक वर्तन करणारे भारतीय
हमसफर ट्रस्टने म्हणले आहे की भारतात हिजड्यांची संख्या ५ ते ६ लाख आहे.

दक्षिण भारत
3rd Gender
या ठिकाणच्या तृतीयपंथी लोकांना अली असे संबोधले जाते.
अली ही दक्षिणेतील परंपरागत चालत आलेली तृतीयपंथी जमात आहे.वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya