Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता लैंगिक शिक्षण

लैंगिक शिक्षण

Print PDF
संभोग करण्याआधी किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याआधी काही गोष्टींची माहिती असणे किंवा त्यातील ठळक बाबी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. या वास्तविक गोष्टींचे ज्ञान असल्याने पुढील फायदे होऊ शकतात.
 • महत्त्वाच्या क्षणी योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो.
 • यामुळे आपण आपले स्वतःचे व आपल्या जोडीदाराचे धोकादायक परिणामांपासून चांगल्याप्रकारे रक्षण करु शकतो.
चला आपल्या शरीररचनेबाबत जाणून घेऊया, थोडे संभोग व लैंगिकतेविषयी चर्चा करुया.
 • योनी व लिंगाच्यामार्फत होणारा संभोग
 • गुदद्वार व लिंग यांच्या मार्फत होणारा संभोग
 • मुखमैथून
 • हस्तमैथून
 • चुंबन
योनीमार्फत होणार्‍या संभोगाचे स्पष्टीकरण
या संभोगक्रियेत पुरुषाचे लिंग योनीमार्गात प्रवेश करते.

Female Reproductive System
Female Reproductive System

Male Reproductive system
Male Reproductive system
संभाव्य धोका
कंडोमच्या वापराशिवाय लिंगाद्वारे केलेला कोणताही संभोग हा असुरक्षितच असतो. या लैंगिकक्रियेत संसर्गजन्य रोगांची (STI) जोडीदारापासून लागण होण्याचा धोका उद्‍भवू शकतो.

जर संभोगक्रियेतील पुरुषाला HIV चा संसर्ग झालेला असेल तर संभोगादरम्यान स्थलांतरीत होणार्‍या वीर्यातही या संसर्गाचे विषाणू असतात. हे विषाणू स्त्रीच्या योनीमार्गातील रक्तात मिसळले गेल्याने तिलाही या HIV चा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्याच प्रमाणे HIV चा संसर्ग असणार्‍या स्त्रीने कंडोमच्या वापराशिवाय संभोगक्रिया केल्यास पुरुषालाही HIV चा संसर्ग होण्याची शक्यता असते. याचाच अर्थ संभोगक्रियेत एकमेकांच्या रक्ताचा संपर्क होत असल्यास संसर्ग होण्याची शक्यता अधिक प्रमाणाने वाढत असते.

असुरक्षित संभोगामुळे HIV शिवाय पुढील समस्या ओढावू शकतात.
गॉनोरिया, क्लायडीया, लैंगिक हार्पिस, वॉर्टस, कावीळ इत्यादी. असुरक्षित संभोगामुळे स्त्रीयांना योनीमार्गात गुप्तरोग होण्याची शक्यता अधिक असते.

Vaginal sex
स्वतःचे रक्षण स्वतःच करा.
HIV किंवा STI सारख्या विकारांची लागण होण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नित्यनेमाने कंडोमचा वापर करावा.

गुदद्वारामार्फत होणार्‍या संभोगाचे स्पष्टीकरण
लिंगाने दुसर्‍या व्यक्तीच्या गुदद्वारात प्रवेश करुन केलेली संभोगक्रिया म्हणजेच गुदद्वार संभोग होय.

आजतागायत असे मानले जात होते की फक्त नपुंसक व्यक्तीमधेच अशा स्वरुपाची संभोगक्रिया घडते. पण एकंदरीत आकडेवारी किंवा सरासरी पाहता पुरुष व स्त्री यांच्यात होणार्‍या संभोगक्रियेचेही प्रमाण नपुंसक व्यक्तीच्या प्रमाणाइतकेच असते.

संभाव्य धोका
तुलनात्मक दृष्ट्या गुदद्वाराची कातडी ही अधिक पातळ व संवेदनशील स्वरुपाची असते. यामुळेच त्या थराला तडे जाण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यताही अधिक असते. इतर संभोगक्रियांपेक्षा याच संभोगक्रियेमुळे संसर्गजन्य विकारांची लागण होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे दिसून येते. तसेच या संभोगक्रियेमुळे HIV चा व कावीळीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमालीचे आहे.

स्वतःचे रक्षण स्वतःच करावे
’के-वाय’ जेलीसारख्या तरल पदार्थांचे अच्छादन असलेले कंडोम वापरावेत. असे तरल व चिकट पदार्थ विषाणूंच्या संसर्गापासून आपले रक्षण करतात. तसेच अशा कंडोमच्या वापरामुळे संभोगक्रियेतील घर्षणामुळे होणारी त्वचेची लाही उद्भवत नाही. अशा संभोगक्रियांसाठी विशेषप्रकारच्या कंडोमची निर्मिती करण्यात आलेली आहे.

मुखमैथून क्रियेचे स्पष्टीकरण
मुखमैथूनाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात
  Oral Sex Explained
 • पुरुषाचे लिंग चाटणे अथवा चोखणे (फेलाटीयो). सर्वसाधारणतः ही क्रिया इतर संभोगक्रियेप्रमानेच असते परंतु या क्रियेत योनी ऎवजी जोडीदाराच्या तोंडाचा उपयोग केला जातो.
 • योनीमार्गात जिभा घालणे अथवा योनी चाटणे (क्युलिंजस).
संभाव्य धोका
या संभोगक्रियेतील दोन्हीप्रकारातील व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता समान स्वरुपाची असते.

या संभोग क्रियीमुळे उद्भवणार्‍या विकारात हर्पिस प्रकार १ व हर्पिस प्रकार २ उद्भवण्याची शक्यता असते. पहिल्या प्रकारात तोंडाला व्रण येतात तर दुसर्‍या प्रकारात लिंगावर अथवा योनीमार्गात संसर्ग होत असतो. मुखमैथूनामुळे प्रामुख्याने जिभ व ओठ यांना संसर्गाचा धोका अधिक असतो.

या संभोगप्रकारात HIV चा संसर्ग होण्याची शक्यता काहीश्या कमी प्रमाणातली असते. हा संसर्ग तोंडात वीर्याचा किंवा रक्ताचा अंश राहील्याने होत असतो. मुखमैथून करणार्‍या व्यक्तीच्या तोंडात व्रण किंवा अल्सर असतील तर हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

HIVचा संसर्ग नसलेली पुरुष किंवा स्त्री जर HIV चा संसर्ग असलेल्या पुरुष किंवा स्त्रीची योनी, योनीमार्ग किंवा लिंग मुखमैथूनासाठी वापरत असेल तर संसर्ग नसलेल्या व्यक्तीस संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. परंतु जर हीच क्रिया विरुद्ध होत असल्यास संसर्ग नसणार्‍या व्यक्तीस संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते.

स्वतःचे रक्षण करणे
कंडोमचा वापर केल्याने विकारांची व HIV ची लागण होण्याचा धोका कमी होतो. यासाठीच विविध स्वादरस असलेले कंडोम बाजारात उपलब्ध असतात. अशा कंडोमचा वापरामुळे कोणताही अडथळा निर्माण होत नाही व तशाच स्वरुपाची आनंदप्राप्ती होत असते.

रिम्मींग या संभोगप्रकाराचे स्पष्टीकरण
रिम्मींग म्हणजे जोडीदाराचे गुदद्वार व गुदामार्ग चाटणे अथवा चुंबन घेणे.

संभाव्य धोका
जरी विष्ठेमधे HIV चे विषाणू नसले तरी त्यात इतर विकारांचे विषाणू मोठ्याप्रमाणात अस्तित्वात असतात.

स्वतःचे रक्षण करणे
संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संभोगाआधी गुदद्वाराची व संभोगानंतर चांगल्याप्रकारे स्वच्छता ठेवणे हिताचे ठरते. संभोगादरम्यान विष्ठा तोंडात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

Masturbation - Its not just a man’s game Masturbation – Its not just a man’s game
हस्तमैथून: हे फक्त पुरुषांपुरती मर्यादित नसते. आपल्या जननेंद्रियांना आपल्या हाताच्या मदतीने, लिंग किंवा योनीला झटके देऊन उत्तेजित करणे म्हणजेच हस्तमैथून. यात स्त्रीया हाताची बोटे योनीमार्गात प्रवेश करवून उत्तेजना मिळवतात.

एकामेकांच्या जननेंद्रियांना उत्तेजित करुन संगनमताने हस्तमैथून करता येते.

असूरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे संसर्ग (STI)
 • असा संसर्ग जो संसर्ग असलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध आल्यामुळे उद्भवतो किंवा
 • असा संसर्ग जो संसर्ग असलेल्या मातेपासून बाळाला होतो.
 • अशा वेळेस दोन्ही जोडीदारांना उपचारांची गरज असते.
 • STI संसर्ग असलेल्या व्यक्तींना HIV किंवा BBVs
संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
 • सर्वसाधारण STI चा संसर्ग असल्यास इलाज शक्य आहे व तो बरा होऊ शकतो.
 • STI योग्य उपचारांशिवाय बरा होणे अशक्य आहे.
सेक्शूअली ट्रांसमिटेड इंफेक्शन्स (STI) म्हणजेच लैगिक संबंधामुळे परस्परात होणारे संसर्ग होय.
STI ची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
 • असुरक्षित योनीमार्फत संभोग
 • असुरक्षित गुदद्वाराचा वापर करून केला जाणारा संभोग.
 • असुरक्षित मुखमैथून
 • त्वचेचा त्वचेशी थेट संपर्क
STI ची लक्षणे
 • बर्‍याच लोकांना अशा स्थितीत अस्वस्थता जाणवते किंवा ताप येतो.
 • वेदनायुक्त जखमा व त्या जखमांना खाज येणे. त्वचा जाड होत जाणे.
 • अल्सर येणे व तीव्र स्वरुपाच्या वेदना होणे.
समस्या व उपचार:
समस्या: अशा विषाणूंची लागण झाल्यास ते विषाणू त्वचेमधे खोलवर जाऊन बसतात व ते कायमस्वरुपाचे बनत जातात. इलाज करुनही वारंवार उद्भवतात.
उपचार: शक्य आहेत. (ऍसिक्लोविर: कधीही बरा न होणारा आहे)
कायमस्वरुपी इलाज: नाही
योनी अथवा गुदद्वार यांना झालेल्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास...
दुसरी पातळी: चट्टे येणे, फ्लू सारखी लक्षणे, गुप्तांगांना सुज येणे, मेंदुपर्यंत संसर्ग इत्यादी.

समस्या व उपचार
समस्या: त्वचा, हाड व हृदयविकार
 • मेंदुचे विकार
 • डिमेंशीया
 • उपचार न केल्यास अंधत्व
उपचार: शक्य (रोग प्रतिबंधके वापरल्यास). लैगिक तपासणी आवश्यक.
कायमस्वरुपी इलाज: शक्य

गोनॉर्र्होया म्हणजे काय?
Gonorrhoea
उत्तर: असा संसर्ग जो योनी, घसा, गुदा यातील विषाणूंमुळे होतो.

हे कसे दिसते?
उत्तर: सफेद अथवा हिरव्या रंगाचा स्त्राव योनी अथवा लिंगामार्फत होतो.

हे कश्यामुळे उद्भवते?
उत्तर: याचा संसर्ग असलेल्या व्यक्तीशी लैगिक संबंध आल्यामुळे उद्भवतो.

यासाठी कोणती दक्षता घ्यावी?
उत्तर: कंडोमच्या वापरामुळे हा संसर्ग टाळता येतो.

क्लामिडिया म्हणजे काय?
Chlamydia
उत्तर: असा संसर्ग जो योनी, घसा, गुदा यातील विषाणूंमुळे होतो.

हे कसे दिसते?
उत्तर: स्त्रीयांमधे याची लक्षणे शक्यतो दिसून येत नाहीत. योनी अथवा लिंगामार्फत सफेद स्त्राव होतो. मुत्रविसर्जन क्रियेत वेदना निर्माण होतात. ओटीपोटात कळा येतात.

हा संसर्ग कसा उद्भवतो?
उत्तर: याचा संसर्ग असलेल्या व्यक्तीशी लैगिक संबंध आल्यामुळे उद्भवतो.

यासाठी कोणती दक्षता घ्यावी?
उत्तर: कंडोमच्या वापरामुळे हा संसर्ग टाळता येतो.

Spermicide Diaphragm Cervical Cap Female Condom
Spermicide Diaphragm Cervical Cap Female Condom
Intra-Uterine Systems Oral Contraceptives Condom Tubal Ligation, Vasectomy
Intra–Uterine Systems Oral Contraceptives Condom Tubal Ligation, Vasectomy

एच.आय.व्ही.
भारतात ८५% HIV चा संसर्ग हा असुरक्षित संभोगामुळे उद्भवतो. आजही हा आजार कलंकित असा आजार मानला जातो. जागरुकता नसन्याच्या कारणाने लोक HIV याविषयी बोलण्यास तयार नसतात.

तीन प्रकारच्या असुरक्षित संभोगामुळे HIV चा प्रसार होतो.
 • गुदद्वार
 • योनीमार्फत
 • तोंडावाटे (या प्रकारात धोका अत्यंत कमी स्वरुपाचा असतो.)
नियमित कंडोमचा वापर हाच HIV चा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. कंडोमच्या वापरामुळे गर्भधारणा व घातक संसर्गही टाळता येतो. गुदद्वार, योनीमार्फत किंवा तोंडावाटे केलेल्या संभोगासाठी निरोधचा वापर शक्य असतो.

STI चा संसर्ग असल्यास HIV चा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. फक्त STI पासूनच नाही तर HIV पासूनही स्वतःचा बचाव करणे महत्त्वाचे आहे.

कोणताही धोका पत्करु नका: महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या व स्वतःचे रक्षण स्वतःच करा.

गर्भनिरोधके
गर्भधारणा किंवा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा वापर करता येतो.
कंडोम हा एकमेव असा उपाय आहे जो गर्भधारणेची शक्यता व HIV चा संसर्ग टाळतो.

कंडोमचा वापर कसा करावा
How to use a Condom
How to use a Condom
कंडोमच्या पाकीटातून कंडोम बाहेर काढताना विशेष काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम पाकीटाचा कोपरा कापून उघडावा हे करण्याआधी पाकीटातील कंडोम एका बाजुस करुन घ्यावा. कोपरा उघडल्यानंतर आपल्या बोटांच्या सहाय्याने निरोध अलगदपणे पाकीटाबाहेर काढावा. कंडोम सुस्थितीत आहे किंवा नाही हे नीट तपासून घ्यावे. वापराआधी किंवा खरेदी करतानाच त्या कंडोमच्या पाकीटावर असलेली वापराची अंतिम तारिख नीट तपासून घ्यावी.

गुंडाळलेल्या स्थितीत असलेल्या कंडोमचा मध्य भाग ताठरलेल्या लिंगाच्या वरच्या बाजूस ठेवावे. कंडोमचा मध्यभाग १ ते अर्धा इंच खेचून मोकळी जागा तयार करावी जेणे करुन कंडोमातील त्या मोकळ्या जागेत वीर्य साठेल. जर जमत असेल तर लिंगाची कातडी पूर्णपणे खेचून मागच्या बाजुस घ्यावी. त्यानंतर कंडोमची प्रत्येक घडी उलगडत निरोध पूर्ण लिंगावर चढवावे. लिंगाच्या मूळापर्यंतचा भाग कंडोमने अच्छादला जाईल अशारितीने निरोध खाली सकवत जावे. कंडोमच्या वरच्या बाजूस असलेली मोकळी जागा आपल्या बोटात धरुन दाबावी जेणे करुन आतील मोकळ्या जागेतील हवा निघून जाईल. हे हवेचे बुडबूडे तसेच राहील्यास संभोगक्रिये दरम्यान होणार्‍या घर्षणामुळे कंडोम फाटण्याची शक्यता अधिक असते. जर आपणास संभोगक्रियेत अधिक तरल व तैलयुक्त पदार्थ वापरायचे असतील तर असे पदार्थ कंडोमच्या बाहेरील बाजूस लावावेत.

दंत रक्षक कसे वापरावेत
Condom vending machine
मुखमैथून करताना योनी व तोड यांचा थेट संपर्क येत असतो. अशावेळी दंत रक्षकाचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी वेबसाईट्स/स्त्रोत
• Terrance Higgins Trust – www.tht.org.uk
www.avert.org
• Sexuality and U – www.sexualityandu.ca
• Condom Essential Wear – www.condomessentialwear.co.uk

अधिक माहितीसाठी भारत व पुण्यातील HIV हे पान पहा किंवा www.wakeuppune.org

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya