Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता वेश्या व्यवसाय आणि एच.आय.व्ही

वेश्या व्यवसाय आणि एच.आय.व्ही

Print PDF
वेश्या व्यवसाय आणि एच.आय.व्ही-भारतातील वेश्या व्यवसाय
- आजपर्यन्तच्या नोंदणीनुसार भारतात सरासरी वीस लाख व्यक्ती वेश्या व्यवसाय करतात. (परंतु ही संख्या नक्कीच ह्यापेक्षा जास्त असू शकते.)
- त्यातील ४०% महिला १८व्या वर्षापूर्वीच वेश्या व्यवसायात आलेल्या असतात.
- खूपशी तरूण मुले ह्या कामात लहानपणीच ओढली जातात.

उगम: नॅशनल कमिशन फॉर वुमेन (१९९७), द वेल्व्हेट ब्लाऊज: सेक्शुअल एक्सप्लॉईटेशन ऑफ चिल्ड्रन, दिल्ली.

वेश्या व्यवसाय आणि कायदा - एक पूर्व इतिहास
Sex work – what does it mean?
भारतावर ब्रिटिशांचा अंमल होता तेव्हा भारतात वेश्या व्यवसाया बाबतीत व्हिक्टोरियन काळातला इंग्रजांसाठीचा कायदा वापरला जायचा. वेश्या व्यवसाय हा चोरून केला जाणारा अंधारतला कारभार आणि गुन्हा मानला जायचा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बर्‍याचश्या नियमावली इंग्रजांनी ठरवून केलेल्या जश्याच्या तशा भारतीय कायद्यात घेण्यात आल्या. त्यामधे Immoral Trafficking Prevention Act (ITPA) ह्याचाही सामावेश होतो. ह्या ३७७ क्रमांकाच्या कलमामध्ये पूर्वी म्हंटले होते की वेश्या व्यवसाय आणि समलिंगी असणे हा गुन्हा आहे. परंतु जून २००९ पासून बदललेल्या कायद्यानुसार त्यास मान्यता प्राप्त झाली आहे.

Sex Work Law
- भारतामध्ये १९८६ पासून वेश्या व्यवसायास कायद्याने मान्यता प्राप्त झाली आहे. Immoral Trafficking Prevention Act (ITPA)
- ITPA च्या आधारे वेश्या व्यवसायात होणारे गुन्हे आणि गैरव्यवहार रोखले जातात.
- ITPA च्या आधारे ‘Voluntary adult sex work’ ह्या विषयावरही काम केले जाते.
- ITPA ऍक्ट नुसार एक स्त्री वेश्या व्यवसायातून पैसे कमावू शकते. फक्त हा व्यवसाय उघड्यावर होऊ नये असा नियम असतो.
- कायद्या नुसार ह्या व्यवसायात तिसर्‍या व्यक्तीने सामील होऊ नये असा नियम असतो.
- तसे पहाता कायदा वेश्या व्यवसायास मान्यता देतो परंतु त्यामुळे होणार्‍या अनेक बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते.
- एखादा चालू वेश्या व्यवसाय बंद करणे हा सुद्धा कायद्यानुसार गुन्हा आहे.
- ITPA ammendmend नुसार कोणतीही कारवाई करण्याचा पोलिसांचा अधिकार आणि कायदा ह्यात फारशी तफावत नसते.

ITPA ammendmend
ITPA Amendment
- केंद्र सरकारकडे आता ITPA ने वेश्यांकडे जाणार्‍या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
- ह्या मागील तत्त्व म्हणजे वेश्यांकडे जाणारी माणसे कमी व्हावीत आणि लैंगिकतेमुळे होणारे आजार कमी व्हावेत हाच आहे.
- आजपर्यन्त घडत गेलेल्या घटनांनुसार लपून-छपून वेश्या व्यवसाय करण्यामुळे एच.आय.व्ही.चा प्रसार खूपच होतो. त्यामुळे व्यवस्थित नोंदणीकृत व्यवसाय आणि तेथे असलेली आरोग्या बद्दलची जागृती ह्याने खूप फरक पडतो असे दिसते.
- सरकार आणि केंद्र सरकार ह्यासाठी अजून खूप काही सुधारणा घडविण्यात प्रयत्नशील आहेत.

वेश्या व्यवसाय : एक सत्यता
कामाठीपुरा, मुंबई
Kamathipura, Mumbai
Kamathipura, Mumbai
- मुंबईतील कामाठीपुरा ही अशिया खंडातील सर्वात मोठी रेडलाईट एरिया आहे.
- कामाठीपुरामधे गेल्या २०० वर्षापासून वेश्याव्यवसाय सुरू आहे.
- कामाठीपुरामधे वेश्या, पुरूष सेक्स वर्कर्स, आणि ट्रान्सजेंडर्स सर्व मिळून संख्या १५००० पेक्षा जास्त आहे.
- कामाठीपुरामधील ९०% पेक्षा जास्त सेक्स वर्कर्सना sexually transmitted infection (STI’s) ची लागण झाली आहे.
- तेथील ७०% पेक्षा जास्त जणांना एच.आय.व्ही. ची लागण होते.

अभ्यासातून असे दिसते की वेश्या व्यवसायात दोन पायर्‍यांवर कायद्याचे उल्लंघन केले जाते.
१. वेश्या व्यवसायात प्रवेश करणे
- सर्व सेक्स वर्कर्सची ह्या अभ्यासासाठी मुलाखत घेण्यात आली होती. त्या सर्व जणांनी ह्या व्यवसायात १० / १२ वर्षाचे असतानाच ह्या व्यवसायात प्रवेश केला होता.
- काही जणांचे त्यांच्या कुटुंबापासून अपहरण केले होते.
- अनेकांना पैशाची लालूच दाखवण्यात आली होती, आणि खोटे सांगून ह्या व्यवसायात गुंतवले होते.
- अनेकांनी "पैसा मिळवणे" ह्या एका कारणासाठीच ह्यात प्रवेश केला होता.
- भारतातील गुन्हेगारी हे वेश्या व्यवसायात प्रवेश करण्याचे एक खूप मोठे गंभीर कारण आहे.

२. सेक्स वर्कर म्हणून रहाणे:
- कामाठीपुरातील सेक्स वर्कर्स तिथे रहातात, व्यवसाय करतात, परंतु तेथे त्यांच्यासाठी सर्वकाळ एक असुरक्षितता असते. तेथे कधीही दंगल होऊ शकते, पोलीस येऊ शकतात, अशी खूप तर्‍हेची भीती त्यांच्यात असते.
- सेक्स वर्कर्सने यांच्या मुलाखतीमधे त्यांच्या नेहमी होणार्‍या शारिरीक आणि मानसिक छळाबद्दलही सांगतात.

मुंबई: कामाठीपुर्‍यातील गुन्हेगारी: एक सत्य.
झीनत: वय वर्ष ३०.
"लहानपणी मी एका खेड्यात रहात होते. आमच्या खेड्यात रहाणार्‍या एका माणसाने मला मुंबईत आणले. त्याने मला नोकरी देण्याचा शब्द दिला होता. पण मुंबईला आल्यावर त्याने मला एका वेश्यालयात विकले. आणि मला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करावा लागला. तो माणूस माझ्या वडिलांचा मित्र होता, आणि त्याला आमच्या घरची गरीबी माहीत होती. त्याला हे माहीत होते, की माझे लग्न जमवले तर लग्नाचा खर्च, हुंडा हे माझ्या वडिलांना मुळीच शक्य नव्हते. माझ्या वडिलांना त्याने शब्द दिला की मुंबईला घेऊन जाऊन मी तुमच्या मुलीला चांगली नोकरी देतो. पण इथे आम्हा सर्वांचीच खूप मोठी फसवणूक झाली."

सायरा: वय वर्ष २०.
"माझी मावशी एका वेश्यागृहाची मालकीण होती. मी १० वर्षांची असतानाच तिने माझ्या आई-वडिलांना सांगितले की अत्तापासून जर सायरा वेश्यागृहात काम करू लागली आणि पैसे कमवू लागली तर पूर्ण कुटुंबाची ददातच संपेल. त्यामुळे मावशी मला दहाव्या वर्षीपासूनच वेश्यागृहात घेऊन गेली आणि तिने मला कामाला लावले. १० व्या वर्षीपासून मी पैसे कमवू लागले. माझ्याबरोबर झालेला पहिला संभोग हा खूप वेदनादायी आणि दु:खकारक होता. वेश्यागृहात येणारे कस्टमर्स हे वयाने आणि मोठे असायचे. त्या वयात मला संभोग आणि बलात्कार ह्या शब्दांचे अर्थसुद्धा माहीत नव्हते. वेश्यालयात काम करू लागल्यापासून मला फक्त त्या शब्दाचा अर्थच कळला नाही, तर मी रोज रात्रभर अनेकदा ते अनुभवू लागले. प्रत्येक संभोग हा सक्तीने केला जायचा. ते झाल्यावर मी माझ्या नशिबाला दोष देत तासंतास रडायचे. पण माझी मावशी मला अजिबात बाहेर सोडायची नाही, की कोणतीही मुभा द्यायची नाही.

गुन्हेगारी / हिंसा- एक सत्य : कामाठीपुरा, मुंबई.
राणीचा अनुभव
Sex Work – Stigma
राणीचा हा अनुभव तिच्या प्रियकराबरोबरचा आहे. तिचा प्रियकरच तिचा दलाल होता.
"माझ्या प्रियकराला वाटले की माझ्या गर्भात वाढत असलेले मूल त्याचे नाही. परंतु ते त्याचेच होते. मला आठवा महिना लागला होता. तेव्हा आमचा काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला, ज्याचे रुपांतर शाररिक झटपटीत झाले. तेव्हा अचानक त्याने मला पोटावर खूप जोरात लाथ मारली, आणि मला खूपच रक्तस्त्राव सुरू झाला. त्याने मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. माझ्या शेजार्‍यांनी माझे हाल होताना बघून मला डॉक्टरांकडे नेले. माझे महिने पूर्ण होण्याआधीच बाळंतपण झाले आणि डॉक्टर बाळाला वाचवूसुद्धा शकले नाहीत. त्यानंतर कधी मला दिवस गेले नाहीत."

वेश्या व्यवसाय - एक कलंक
शरीरक्रीया करणार्‍यांना ह्या कलंकीत व्यवसायात पडण्याचे कारण बर्‍याचदा गरीबी हे असते. हा व्यवसाय त्यातील जास्तीत जास्त जणांना कोणत्या ना कोणत्या आजाराच्या दिशेने नेत असतो. एच.आय.व्ही ची लागण ही जास्तीत जास्त हा व्यवसायामुळेच पसरते. ह्या विश्वात आज एवढे गुन्हे आणि फसवणूक चालू असते, की ती सर्वसामान्य माणसांपर्यन्त पोहोचत सुद्धा नाही. त्यामुळे वेश्या व्यवसाय हा आज एक खूप मोठा कलंक बनत चालला आहे.

वेश्या व्यवसाय - एक भेदभाव
volunteer
volunteer
शरीरक्रीया - म्हणजेच वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रीयांना नेहमीच गुन्हेगारांना, पोलिसांना, आणि गुंडगिरी करणार्‍या लोकांना सामोरे जावे लागते. ह्या स्त्रीया समाजापासून फारच दूर सारल्या गेल्या असल्यामुळे ह्या भेदभावाची तीव्रता त्यांना खूपच जाणवते.

अशा तर्‍हेने शरीरक्रीया करणार्‍या स्त्रीया, म्हणजेच वेश्या ह्यांचे आयुष्य खूपच कठीण असते, आणि त्यामधे एच.आय.व्ही. ची लागण किंवा इतर आजार ह्याची शक्यता खूपच असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya