Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

MSM & HIV

Print PDF
MSM म्हणजे काय?
 • पुरुषांनी एका किंवा अनेक पुरुषांशी संभोग करणे म्हणजे समलिंगी संभोग असे म्हणतात. असे करणार्‍या व्यक्तीला MSM ( Men having Sex with Men ) असे म्हणतात.
 • MSM & HIV
 • सर्वच MSM असणार्‍या व्यक्तींना समलिंगी (’गे’) म्हणता येणार नाही.
 • यांचे वर्गीकरण ओळखीपेक्षा त्यांच्या वर्तनावरुन होत असते.
 • पण त्यांची स्थिती आपापसात बदलणारी असते.
 • MSM व HIV वर चर्चा करण्याची गरज का आहे?
कालांतरानुसार बदलत आलेल्या समलिंगींचे मुलभूत हक्क, त्यांच्या चळवळी, HIV चा संसर्ग, त्यांचे आधुनिकिकरण व या विषयाला समाजात कलंक मानले जाणे यांसारख्या विविध गोष्टींमुळे या विषयाच्या मूळाशी जाण्याची गरज भासते आहे.

HIV संसर्ग उदयास येण्याच्या सुरवतीच्या काळात HIV हा फक्त समलिंगी आजार आहे असे मानले जात असे. याच कारणाने या आजाराबाबत अनेक समज गैरसमज तयार झाले.

In the early years of the global HIV epidemic...
अमेरिकेतील संस्थांनी त्या काळात या आजारापासून महिलांना व पुरुष-स्त्री संभोग करणार्‍या व्यक्तींना कोणताही धोका नसल्याचे जाहीर केले होते.

पूर्वी कित्येक स्थानिक जाती असे मानत असत की HIV ही एक शिक्षा आहे. जी फक्त समलिंगी व्यक्तींना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल देवाने त्यांना दिलेली असते.

शास्त्रज्ञ व डॉक्टर्स पूर्वी HIV ला
१. समलिंगी प्लेग
२. समलिंगी कर्करोग
३. समलिंगी संबंधामुळे रोगप्रतिकार शक्ती खंगत जाणे
४. समलिंगी कारणास्तव होणारे विकार/लक्षणे

HIV as the ‘Gay Plague?’
१९८० सालानंतर विज्ञानात प्रगती होत गेली व अमुलाग्र बदल होत गेले. शास्त्रज्ञांनी संशोधनानी निष्कर्ष काढला की ह्या विषाणूंचा संसर्ग HIV चा आहे. HIV चा संसर्ग होण्याचा मोठा धोका व्यसनी माणसे व वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना असतो, तर काही प्रमाणात धोका असणार्‍या गटात MSM व्यक्तीही मोडतात. पण कलंक, भिती आणि भेदभाव अशा समस्या MSM व्यक्तींपुढे उपस्थिततच असतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमीवर १९८० मधील HIV चा उदय.
 • २० व्या शतकाच्या सुरवातीला समलिंगी स्त्री/पुरुषांच्या मानवी हक्कांना न्यायालयीन मान्यता मिळून देण्यासाठी हलचाल सुरु झाली.
 • इतिहासामधे समलिंगीसंभोगाकडे गुन्ह्याच्या स्वरुपात पाहिले जात असे.
 • पण २० व्या शतकाच्या उदयास समलिंगी संभोगाबद्दल भेदभाव कमी होत गेला. यामधे ग्रीस, ब्रिटन, इस्राईल आणि चार्ड इत्यादी देशांनी पुढाकार घेतला.
स्टोनवॉलचे दंगे
Medical researchers discover that a virus causes HIV
१९६९ मधे "स्टोनवॉल इन" हे समलिंगी व्यक्तींचे एकामेकांना भेटण्याचे ठिकाण होते. या ठिकाणी पोलिसांनी विनापरवाना धाडसत्र चालवले. या धाडसत्रामुळे असंतोष निर्माण झाला, निषेध व्यक्त केला गेला आणि येथूनच पुढे समलिंगी संभोगाच्या मुलभूत हक्कांविषयी संघर्ष सुरु झाला.

समाजाचा बदलता दृष्टिकोन: कलंकित बाबींविरुद्ध लढा व सहकार्याची उपलब्धता.
The Historical Context into which HIV emerged in the 1980s
१९६० व १९७० च्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर १९८० मधे HIV चा उदय झाला. HIV बाधीत व्यक्तींसाठी मदत कार्य सुरु झाले. त्यांच्यासाठी कार्य करणार्‍या संस्था निर्माण झाल्या. काही संस्था पुढील प्रमाणे
 • न्युयॉर्क मधील समलिंगी लोकांचे आरोग्य संवर्धन
 • सॅन फ्रांन्सिस्को एड्स फाऊंडेशन
 • ऍक्ट अप ही एक छोटी संस्था आता जगभर HIV/AIDS साठी कार्यरत आहे.
पण अद्यापही या क्षेत्रात प्रगत कार्याची गरज आहे. ज्या देशांमधे HIV चा धोका वाढत आहे त्या देशात अद्यापही समलिंगी संभोग हा गुन्हा मानला जातो. अशा प्रकारचे काही देश.
उत्तर आणि पूर्व आफ्रिका
पूर्व आशियाखंड
आणि भारत!

मध्य आशिया आणि आफ्रिकेमधे तुरुंगवासापासून मृत्यूपर्यंतच्या शिक्षा ठोठावल्या जातात.

MSM हा गुन्हाच असल्याचा भारताचा दृष्टिकोन
Fight for Gay Rights in America
भारतीय दंड विधान कलम ३७७ प्रमाणे पुरुषाने पुरुषांशी गुदामैथून संभोग करणे हा दंडनीय गुन्हा मानला जात असे. परंतु जून २००९ पासून भारतीय न्यायव्यवस्थेने समलिंगी संबंधांना मान्यता दिली आहे. या संदर्भात नुकतेच काही नवीन कायदे आलेले आहेत.

या नियमांमुळे पुरुष आणि स्त्री, यांच्यात होणारा गुदा संभोग हाही गुन्हा मानला जात होता. पण सुरवातीला पुरुष-स्त्री मधे होणारा अशाप्रकारच्या संभोगाला मान्यता मिळाली.

Criminalization of MSM in India
समलिंगी संभोग हा गुन्हा आहे असे मानले गेल्यामुळे MSM लोकांवर झालेले परिणाम.
भारतीय दंड विधान कलम ३७७ हे कालबाह्य ठरवले जाऊ लागले आणि MSM व्यक्तींबाबत भेदभाव कमी होऊ लागला.
या कायद्यामुळे MSM व्यक्तींना व HIV च्या क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींनाही पोलिसांकडून हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.

माहितीसाठी स्त्रोत: International Gay and Lesbian Human Rights Coalition

लखनौ ४: येथे स्टोनवॉल सारखी परिस्थिती निर्माण होईल का?
२००१ मधे MSM साठी कार्य करणार्‍या दोन निमसरकारी कार्यालयावर पोलिसांनी धाडसत्र चालवले आणि चार व्यक्तींना अटक करण्यात आली. त्या चारही कार्यकर्त्यांवर कलम ३७७ प्रमाणे आरोप ठेवण्यात आले. त्यांना मारहाण केली गेली, उपाशी ठेवले गेले व गटारातील पाणी प्यायला दिले (त्यांच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार)

"समलिंगी संभोग हा भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्यामुळे मी त्याचा समूळ नायनाट करीन" असा दावा वरीष्ठ निरिक्षक बी.बी. बक्षी यांनी केला होता.

लखनौ ४ प्रकरणाचे परिणाम
अटक झालेल्यापैकी तिघांना ४५ दिवसात सोडून देण्यात आले पण एकाला मात्र सात महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला.
भारतातील समलिंगी संभोग करणार्‍या स्त्री पुरुषांकडे विशेषतः कलम ३७७ वर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. हा कायदा MSM व्यक्तींसाठी त्रासदायक ठरु लागला होता.

मानवी हक्कासाठी लढणार्‍अया समाजाची प्रतिक्रिया
स्वीकृत एड्स कौंसीलच्या पदाधिकार्‍यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की पूर्वीही अशाप्रकारच्या कायद्यामुळे निमसरकारी समाजकार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना बर्‍याच हाल-अपेष्टा सहन करव्या लागल्या होत्या. त्याच घटनांना लक्षात घेता असे दिसून येते की कलम ३७७ नी वैयक्तिक स्वातंत्र्यावर, विचार स्वतंत्र्यावर घाला घतला आहे. अशा कायद्यांमुळे HIVAIDS चे प्रमाण वाढून समाजिक आरोग्याला धोका निर्माण झाला होता.

असे विधान मानवी हक्क आयोगातर्फे भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांना उद्देशून करण्यात आले.

म्हणूनच पुन्हा MSM आणि HIV का?
Same Sex Beheviour: Crime?
अशा पार्श्वभूमीवर MSM आणि HIV/AIDS बाधीत व्यक्तींना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे कलंकित आणि भेदभावाच्या दृष्टिकोनाने बघणे चुकीचे आहे.
MSM आणि HIV/AIDS ची जागतिक स्थिती
 • स्त्री पुरुषांमधे होणार्‍या संभोगामुळे HIV चा अधिक प्रसार झाला आहे.
 • पण काही प्रदेशांमधे मात्र MSM व्यक्तींमुळे HIV चा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना आहेत. उदाहरणार्थ: अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड.
 • लॅटिन अमेरिकेमधे २५% HIV चा संसर्ग झालेले लोक MSM व्यक्ती आहेत.
 • बँकॉक आणि थायलंड मधे २८% MSM व्यक्ती HIV चा संसर्ग झालेले आहेत तर पश्चिम आफ्रिकेमधे हे प्रमाण २२% वर आहे.
 • जागतिक स्तरावर MSM व्यक्तींकडून झालेल्या HIV चा संसर्गाचे प्रमाण सांगणे कठिण आहे. कारण बर्‍याच ठिकाणी संस्कृतीच्या नावावर अशी प्रकरणे झाकली जातात.
भारतातील MSM व HIV/AIDS
आकडेवारी
Impact of Lucknow 4 Case
दिल्लीमधे MSM व्यक्तींना HIV चा प्रादुर्भाव ६.४% असल्याची नोंद २००६ मधे झाली.
२००४ मधे मुख्य शहरांमधे हे प्रमाण २५% वर होते.
शहरेतर भागांमधे हे प्रमाण ५.७% इतके होते.

MSM व HIV ह्या दोन्ही बद्दलचे समज-गैरसमज.
गैरसमज:
समलिंगी संभोग हा नीतीबाह्य आहे.
समलिंगी संभोग जास्तीत जास्त पुरूष करतात.
HIV हा देवाचा शाप आहे.

सत्यता:
पण तरीही MSM धोक्याच्या गटात आहे कारण
आकडेवारीनुसार गुदासंभोगातून HIV चा प्रसार अधिक प्रमाण होतो.
कंडोमचा वापर फक्त गर्भधारणा रोखण्यासाठी केला जातो.
MSM व्यक्तींमधे ड्रग (अंमली पदार्थ) आणि अल्कोहोल(दारु) यांचे प्रमाण वाढते आहे.
भेदभाव आणि कलंकित असल्यामुळे MSM व्यक्तींचे सबंध हे छुप्या स्वरुपाचे असतात.

भारत MSM विषयी जागरुक होत आहे का?
Gay men
हो पण संथ गतीने.

भारतामधे राष्ट्रीय पातळीवर MSM व्यक्तींचा दिल्ली, बेंगळुर आणि कोलकाता येथे मेळावा आयोजित केला गेला.

कलम ३७७ विरुद्‍धचा लढा.
नाझ फाऊंडेशन च्या वकीलांनी कलम ३७७ विरुद्‍ध भेदभाव व कलंकित बाबींचा नाश करण्यासाठी आवाज उठवला.

ऑगस्ट २००८ मधे झालेल्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेमधे भारताचे आरोग्य मंत्री अंबुमणी रामदोस यांनी "समलिंगी" ह्या विषयास जाहीररित्या निषेध केला.

Nationwide gay pride event, on Sunday, 29th June, 2008
परंतु जून २००९ पासून न्यायालयाने "समलिंगी" ह्या विषयास पूर्णपणे मान्यता दिली आहे.

भारतात MSM साठी कार्यरत असलेल्या काही निमसरकारी संस्था व गट.
हमसफर ट्रस्ट (मुंबई): www.humsafar.org
नाझ फाउंडेशन (दिल्ली): www.nazindia.org
समपथिक ट्रस्ट (पुणे): www.geocities.com/samapathik_pune/
उडान ट्रस्ट (पुणे आणि महारास्ट्र) : www.udaantrust.org
स्वभाव ट्रस्ट (बेंगळुर) : http://members.tripod.com/swabhava_trust/
इंडीया नेटवर्क फॉर सेक्शूअल मिनोरीटीज :www.infosem.org

माहितीसठी स्त्रोत/ वेबसाईट

1. International Gay and Lesbian Human Rights Coalition – www.iglhrc.org
2. Human Rights Watch – www.hrw.org
3. AVERT – www.avert.org/msm
4. 2008 UNAIDS Report on Global AIDS Epidemic - www.unaids.org
5. World Health Organization Epidemiological Fact Sheet on HIV and AIDS, 2008 - www.who.int/hiv/countries

अधिक माहितीसाठी HIV in India and Pune किंवा पुढील वेबसाईटला भेट द्या : www.wakeuppune.org

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya