Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

तपासणी करताना

मी HIV ची तपासणी का करून घ्यावी?
आधीच घेतलेली काळजी ही आपल्या भविष्यातील निरोगी आयुष्यासाठी गुरुकिल्ली ठरते. तंदुरुस्त रहाणे आणि योग्य ती काळजी घेणे, ही HIV ची लागण न होण्यासाठी पहिली पायरी आहे. HIV टेस्ट नियमित करणे, आणि आपण पॉझिटीव्ह निघाल्यास ताबडतोब HIV स्पेशिआलिस्टना जाऊन भेटणे, त्यांच्या मर्गदर्शनाने योग्य ते उपचार घेणे, हे ह्या पुढील टप्पे आहेत. आपली प्रतिकार शक्ती शाबुत ठेवण्यासाठी HIV स्पेशिआलिस्ट देतील तशी ऍन्टीरेट्रोव्हायरल औषधे घेणे, योग्य तो आहार घेणे, संयमित जीवनशैली निवडणे, ह्या सर्व गोष्टी नंतरचे तंदुरुस्त आयुष्य जगण्यासही खूपच उपयोगी ठरतात.

आपले स्वत:चे आरोग्य ओळखून स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेणे.
तुम्हाला जर माहित आहे, की तुम्ही HIV पॉझिटीव्ह आहात, तर तुम्ही स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी योग्य ती पावले उचलणे अत्यंत गरजेचे असते. उदाहरणार्थ: तुमच्या जीवनसाथीला HIV बद्दलची पूर्ण माहिती देणे. Safe Sex ची अंमलबजावणी करणे.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सद्यस्थितीचा विचार करावा.
आयुष्यात आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु प्रत्येक निर्णयाच्या वेळी आपल्याला त्याची HIV शी सांगड घालूनच निर्णय घ्यावा लागतो, आणि तशी काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ: आपण पॉझिटीव्ह आहात हे माहित असेल, आणि आपल्याला मूल होऊ द्यायचे असेल, तर पहिल्यापासूनच काळजी घेतली तर मूल पॉझिटीव्ह न होता आपण त्याला जन्म दिऊ शकता. पोटातल्या बाळाचाही आपण बचाव करू शकतो.

तुम्ही त्या त्या संदर्भात नक्कीच प्रश्न विचारू शकता.
चांगल्या आयुष्यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे, HIV चाचणी करून घेणे, आणि त्या त्या वेळी योग्य व्यक्तीला योग्य ते प्रश्न विचारून व्यवस्थित काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्या तब्येतीची स्थिती जाणून घ्या, आणि डॉक्टरांकडे नियमित जाऊन सर्व गोष्टी माहिती करून घेऊन उपचार घ्या.
जेव्हा तुम्हाला बरे नसते तेव्हा तुम्हाला तपासायला आणि उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टर ही अतिशय योग्य व्यक्ती असते. त्यातही डॉक्टरांना तुमच्या HIV ची स्थिती माहीत असणे अत्यंत गरजेचे असते. त्या त्या प्रमाणे तुम्हाला नवे उपचार सुरू होऊ शकतात. डॉक्टरांकडे नियमित जाऊन त्याचा फायदा घेणे हे आपल्याच हिताचे असते.

HIV टेस्ट करून घेण्यापूर्वी आपण आपल्या कुटुंबियांशी आणि जवळच्या व्यक्तींशी मोकळेपणाने चर्चा करणे जास्त हितावह ठरेल. तुम्ही HIV counselore ला टेस्ट करण्या आगोदर जरूर जाऊन भेटावे. त्यामुळे मोकळेपणाने आपल्याला त्याविषयी माहिती होते.

टेस्ट मध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न:
आपण कधी "असुरक्षित" संभोग केला आहे का?
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एच.आय.व्ही. झाला असण्याची शक्यत आहे, तर तुम्ही ताबडतोब टेस्ट करावी.
 • आपण कधी असुरक्षित संभोग केला आहे का? (कंडोम न वापरता, किंवा इतर लॅटेक्सच्या शिवाय संभोग) मौखिक, योनी किंवा गुदा संभोग
 • आय.व्ही. ड्रग चे व्यसन असणार्‍या व्यक्तीशी किंवा HIV असणार्‍या व्यक्तीशी आपण संभोग केला आहे का?
 • तुम्हाला कधी नागिण, क्लॅमेडिया, गोनोर्रेहा, हिपेटायटिस ह्या सारखे एखादे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन STI झाले होते का?
 • तुम्हाला कधी अनियोजित गर्भावस्था आली होती का? (सक्तीने संभोग, बलात्कार इत्यादी.)
 • तुम्हाला कधी एखाद्या नशेत काय झाले, आदल्या रात्री काय झाले हे पूर्ण विसरायला झाले आहे का?
 • तुम्ही कधी सुई किंवा शरिरात/त्वचेतून आत जाणारी इतर उपकरणे इतरांबरोबर शेअर केली आहेत का?
 • तुम्हाला कधी बाहेरून रक्त द्यावे लागले आहे का?
 • तुम्ही जन्मलात तेव्हा तुमची आई एच.आय.व्ही. बाधीत होती का?
एच.आय.व्ही. चाचणी करणे नेहमीच उचीत ठरेल, जर
 • तुम्हाला वाटत असेल तुम्हाला HIV बाधा झाली आहे.
 • गेल्या एक वर्षात तुमचा तीन वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर संभोग झाला असेल
 • १९७७ ते १९८५ मधे तुम्ही दुसर्‍या कुणाचे रक्त घेतले असेल तर.
 • तुमच्या जोडिदाराच्या बाबतीत तुम्हाला शंका वाटत असेल
 • तुम्ही पुरुष असाल, आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर तुमचे कधी कंडोम शिवाय संभोग झाले असेल.
 • तुम्ही आरोग्य विभागात काम करत असाल आणि दुसर्‍याच्या रक्ताशी तुमचा परस्पर संबंध येत असेल
 • तुम्ही गरोदर असाल, तुम्ही HIV बाधीत असाल आणि बाळाला बाधा होण्याची तुम्हाला भीती असेल तर. त्यासाठी आता खूप चांगले उपचार निघाले आहेत.
 • तुम्ही जर स्त्री असाल, आणि तुम्हाला गरोदर व्हायच्या आधी HIV बाधा नसल्याची खात्री करून घ्यायची असेल तर जरूर टेस्ट करून घ्यावी. किंवा काहीही बाधा नाही हे माहित असतानाही मनाची शांती करून घ्यायची असेल तर जरूर टेस्ट करावी. अशामुळे आपल्यातही एक जागरूकता निर्माण होते.
पुण्यातील मान्यवर चाचणी केंद्रे:
 • सोनावणे हॉस्पिटल, भवानी पेठ, पुणे. +९१ २० २६४५१४९१
 • डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गांधीखाना, शुक्रवार पेठ, पुणे. +९१ २० २४४७३२५३
 • जेहांगिर हॉस्पिटल, ससून रोड, पुणे. +९१ २० २६०५४९९४
 • वाय.सी.एम हॉस्पिटल, चिंचवड, +९१ २० २७१००२६६
 • दीपगृह सोसायटी, ताडिवाला रोड, पुणे. +९१ २० २६१२५७७३
 • डॉ. मधू, मैत्री क्लिनिक, दत्तवाडी, पुणे. +९१ ९८९००४४४७७
 • कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे. +९१ २० २५५०८५३३
प्रश्न: मी गरोदर आहे. अशावेळी मी HIV टेस्ट करून घेणे गरजेचे आहे का?
उत्तर: तुम्ही गरोदर असताना HIV टेस्ट केली तर काहीच बिघडत नाही. तुमच्या सद्यस्थितीवरून, अत्ताच्या तब्येतीवरून तुमच्या बाळाची तब्येत, त्याचे भविष्य ह्या बाबतीत थोडेसे ठरवता येते, थोडी काळजी घेता येते. तुमच्या HIV बद्दल जर तुम्हाला काहीच माहित नसेल, तर अत्ताच HIV टेस्ट करून भविष्यकाळ निर्विघ्नपणे पार पडेल.

जर तुमची HIV टेस्ट पॉझिटीव्ह आली, तर तुमच्या बाळात ते जंतू जन्माच्यावेळी किंवा दूध पाजताना ते जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी स्त्रीने काही विशिष्ट काळजी घेणे जरूरीचे असते.
 • ऍन्टिरेट्रोव्हायरल औषधे गर्भारपणात घेणे.
 • प्रत्यक्ष बाळंतपण होत असताना सुद्धा ऍन्टिरेट्रोव्हायरल उपचार घेणे.
 • बाळंतपण सिझेरियन करणे.
 • बाळाला ऍन्टिरेट्रोव्हायरल थेरपीचा शॉर्ट कोर्स देणे.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजीपूर्वक आईचे दूध देणे, नाहीतर आईचे दूध देऊच नये.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya