Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

निदान

निरनिराळ्या प्रकारचे “अँटीजेन” वापरून करण्यात येणार्‍या रक्ताच्या तीन चाचण्या (एलायझा/रॅपीड सिंपल टेस्ट्‌) द्वारे “एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्गाचे निदान केले जाते.

निरनिराळ्या प्रकारचे “अँटीजेन” वापरून करण्यात येणार्‍या रक्ताच्या तीन चाचण्या (एलायझा/रॅपीड सिंपल टेस्ट्‌) द्वारे व निरनिराळ्या जंतूंचा त्वरित होणारा परिणाम ह्यावर “एड्स” झाला आहे किंवा नाही हे ठरवले जाते.

एलायझा टेस्ट्‌मधून निश्‍चित न कळल्यास वेस्टर्न ब्लॉट्स नावाची चाचणी करून रोग निदान करता येते.

चाचण्या व लक्षणे
अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निरनिराळ्या रोगजंतूंमुळे होणारे आजार, गाठी होणे इत्यादी प्रकारच्या लक्षणांमधून “एड्स” चा झालेला प्रादुर्भाव दिसून येतो. उदाहरणार्थ, दररोजच्या शारीरिक सवयींमध्ये अचानक होणारे बदल.

“एच्‌.आय्‌.व्ही.” “अँटीबॉडी टेस्ट्‌” - “एलायझा” (“एन्झाईम लिंक्ड्‌ इम्युनो ऍब्सॉर्बंट ऍसे”) व “वेस्टर्न ब्लॉट” या परीक्षा होकारार्थी येणे.

“ऍब्सोल्युट सीडी ४ लिंफोसाईट काऊंट” २०० पेक्षा कमी असणे. पी २४ अँटीजेनचे प्रमाण नेहमी पेक्षा वेगळे असणे (वाजवीपेक्षा जास्त). “टी थायमस डिराईव्हड्‌” “लिंफोसाईट काऊंट” हे नेहमीपेक्षा वेगळे असणे (वाजवीपेक्षा जास्त).

उपचार
सध्यातरी “एड्स” वर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही. तरी परंतू, काही उपचार पध्दती वापरून रोग्याची परिस्थिती सुधारण्याकडे मदत होते.

“एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्गाचा परिणाम कमी करण्याकडे “अँटीव्हायरल थेरपी” चा उपयोग होतो.

“एड्स” चा उपचार करण्यासाठी “रिट्रोव्हिल” म्हणजेच “झिडोव्हुडीन” किंवा “एझेड्टी” नावाचा “अँटीव्हायरल एजंट” हा बर्‍याच प्रमाणात वापरला जातो. “एड्स” चा उपचार करण्यासाठी हल्ली “एफ्‌डीए” (फूड अँड ड्रग असोसिएशन) या सरकारी संस्थेने “सिक्वीन्यावीर” नावाच्या औषधाचा वापर करण्यास अनुमती दर्शविली आहे. ह्याचेच व्यावसायीक नाव “इन्व्हीरेस” असे आहे. सध्या प्रचलित असलेल्या औषधांपैकी “इन्व्हीरेस” हे औषध “एड्स” काबूत ठेवण्यासाठी १० पट अधिक परिणामकारक आहे.

संसर्गजन्य जंतूंना प्रतिबंध करणारी अशी नवीन प्रकारची औषधे सध्या संशोधन अवस्थेत आहेत.

“हेमॅटोपोएटीक स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स” म्हणजे रक्तवृध्दी करणारी औषधांचा वापर “एड्स” मुळे निर्माण होणार्‍या “अनिमिया” हा आजार व पांढर्‍या रक्तपेशींचे कमी होणारे प्रमाण हे काबूत ठेवण्यासाठी केला जातो.
Title Filter 
Display # 
# Article Title
1 Terms and Concepts of AIDS
2 भावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya