Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी खासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार

खासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार

Print
महाराष्ट्र टाइम्स
०७ मे २०१२
पुणे भारत

तपासणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन, 'एमसॅक्स' आणि 'अकॅल्प'चा पुढाकार,

खासगी लॅबमध्ये केल्या जाणा-या एचआयव्ही टेस्टची माहितीही आता सरकारला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे (एमसॅक्स)असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अॅनॅलिस्टस् अँड पॅक्टिशनर्सच्या (अकॅल्प) सभासदांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर ही माहिती उपलब्ध होईल.

' अकॅल्प' आणि 'एमसॅक्स' यांच्यातफेर् आयोजित एचआयव्ही तपासणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 'एमसॅक्स'चे संचालक आर. डी. देवकर यांच्या हस्ते झाले. महापौर वैशाली बनकर, आमदार चंदकांत मोकाटे, 'अकॅल्प'चे अध्यक्ष अण्णासाहेब करोले, राजकुमार तिवाटणे, शिवाजी कदम, उदय खैरनार आदी उपस्थित होते.

' आतापर्यंत फक्त सरकारी हॉस्पिटलमधून होणाऱ्या एचआयव्ही पेशंटच्या तपासणीचीच माहिती सरकारकडे उपलब्ध होत असे. मध्यमवगीर्य किंवा उच्च मध्यमवगीर्य व्यक्ती खासगी केंदामधून तपासणी करून घेत. त्यामुळे सुमारे चाळीस टक्के पेशंट्सची माहिती सरकारला मिळू शकत नव्हती. मात्र, आता खासगी लॅबमध्येही होणाऱ्या तपासणीची माहिती उपलब्ध होणार आहे. खासगी संस्था आणि सरकारी संस्था यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या कार्यक्रमाचा एचआयव्ही निर्मूलनासाठी फायदा होईल,' असे देवकर यांनी सांगितले.

' अकॅल्प'चे १७०० हून अधिक सभासद राज्यभरात एचआयव्हीच्या चाचण्या करीत आहेत. मात्र, आता 'एमसॅक्स'च्या माध्यमातून त्यांना एचआयव्ही चाचणीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारला उपलब्ध होईल,' असे करोले यांनी सांगितले.

' या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाथीर्ंना एचआयव्ही तपासणीबाबतची जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, चाचणीपूवीर्चे समुपदेशन, पेशंटचे वर्तन आदी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, एचआयव्ही बाधित आहे किंवा नाही यासाठीच्या तिन्ही प्रकारच्या चाचण्या, त्यासाठी आवश्यक उपकरणे यासाठीचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येईल,' असे 'एमसॅक्स'च्या लॅब सव्हिर्सेस विभागाचे क्वालिटी मॅनेजर अभय दीक्षित यांनी सांगितले.

' एआरटी' केंद्रांना हवी जागा

एचआयव्ही एड्सवरील उपचारांसाठी राज्यात लवकरच नऊ नवे 'एआरटी' केंद सुरूकरण्यात येणार आहेत. यातील दोन केंद पुण्यात असणार आहेत. या केंदांसाठी मध्यवतीर् भागात जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन 'एमसॅक्स'चे संचालक आर. डी. देवकर यांनी महापौर वैशाली बनकर यांना केले. बनकर यांनीही यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya