Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी ‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये

‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये

Print
महाराष्ट्र टाईम्स
03 ऑक्टोबर 2012
पुणे, भारत.

राज्याच्या कानाकोप-यातील बाधितांसह विद्यार्थी , नागरीक , महिला , आयटी , बीपीओमधील कर्मचा-यांना एका फोन कॉलवर एचआयव्ही म्हणजे काय , त्यापासून कसे बचाव करू शकतो यासारख्या नानाविविध प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने महाराष्ट्रातील सव्वालाखांहून अधिक जणांचे आयुष्यच बदलले...!

Aarogya news

मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या संवाद हेल्पलाइनच्या निर्मितीला उद्या (दोन ऑक्टोबर) सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सात वर्षांत हेल्पलाइनने किती जणांना फायदा झाला याबाबत मुक्ता फाउंडेशनच्या डॉ. मधु ओसवाल यांनी ' मटा ' ला माहिती दिली. ' महाराष्ट्र , बिहार , अहमदाबाद , झारखंड राज्यांत ' मुक्ता ' ची संवाद हेल्पलाइन कार्यरत आहे. हेल्पलाइनचा राज्यातील पंधरा ते चाळीस वयातील एक लाख तीस हजार जणांना फायदा झाल्याने त्यांच्या आयुष्यात चांगलाच बदल झाला आहे. एक कॉल केल्याने एचआयव्ही म्हणजे काय , तो कशामुळे होतो. त्याच्यापासून कसे बचाव करू शकतो , त्यासाठी काय उपाय आहेत , उपचार कोठे आणि कोणते आहेत याची सविस्तर माहिती हेल्पलाइनवर देण्यात येते. स्वतःची ओळख न सांगताही अनेकांनी तसेच शालेय , पदवीधर , पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह आयटी , बीपीओ कर्मचाऱ्यांचा संपर्क करणाऱ्यांमध्ये समावेश होता ,' अशी माहिती डॉ. ओसवाल यांनी दिली.

२००५ मध्ये सुरू झालेल्या या हेल्पलाइनशी पहिल्या वर्षी दोन हजार ३३२ जणांनी संपर्क साधला होता ; तर सात वर्षांत म्हणजे २०११-१२ या वर्षी २६ हजार १०९ जणांनी संवाद साधला. गेल्या वर्षीच्या तुलनेत संपर्क साधणाऱ्यांमध्ये ११ हजारांची वाढ झाली. या वर्षी संवाद साधलेल्यांपैकी ३६ टक्के म्हणजे नऊ हजार ८३५ कॉल्सधारकांनी कोणत्याही प्रकारची ओळख स्पष्ट केली नाही. १५ ते २५ वयातील २६ टक्के , २५ ते ४० मधील ३४ टक्के जणांनी कॉल केला. ४० ते ६० वयातील चार टक्के लोकांनाच संपर्क करावासा वाटला. गेल्या दोन तीन वर्षांपासून यासाठी माहिती घेणाऱ्यांची संख्या ही साडेसहा हजारांच्या आसपास असल्याची माहिती आढाव्यातून पुढे आली.

हेल्पलाइनशी संवाद साधणारा गट

३७१ प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी

८३७ दहावीतील विद्यार्थी

५९ माध्यमिक शालेय विद्यार्थी

१२९४ बारावीतील विद्यार्थी

४९३१ पदवीधर

५८५ पदव्युत्तर

१५४ निरक्षर

६६५ इतरांनी संपर्क केला...

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya