Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मदत एच.आय.व्ही. सह जगणार्‍यांकरीता भारतातील पहिला आरोग्य विमा समूह

एच.आय.व्ही. सह जगणार्‍यांकरीता भारतातील पहिला आरोग्य विमा समूह

Print PDF
PSI आणि NMP+ हे HIV सह जगणार्‍या व्यक्तींकरीता आरोग्य विमा उपलब्धीसाठी एकत्रितरित्या काम करत आहेत. HIV सुश्रूषा विमाची रचनाच मुळात HIV ग्रस्त लोकांच्या गरजांवर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिकोनाने करण्यात आली आहे. अत्तापर्यंत कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमधील जवळजवळ २५८ सभासदांना या विमानितीचा सभासद होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या कार्यात कर्नाटक राज्यातील KNP+ चा मोठा वाटा आहे.

या विमानितीची काही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये
 • फक्त HIV ग्रस्त अथवा पिडीतांसाठी वैयक्तिक पातळीवर उपलब्ध
 • अर्जदाराला कोणत्याही वयाची अट नाही
 • इतर वैद्यकीय विमानिती प्रमाणेच या विमानितीचाही कालावधी एका वर्षाचा असतो.
 • रु. ३०,०००/-, रु. ४०,०००/- आणि रु. ६०,०००/- पर्यंतची विमा रक्कम मर्यादा.
 • ५०% रक्कम रुग्णालयातील खर्चा करीता तर उर्वरित ५०% AIDS च्या पातळीवर पोहचल्यानंतर येणार्‍या खर्चाकरीता संरक्षित.
काही महत्त्वाच्या पात्रता
 • HIV सुश्रूषा विमानितीकरीता HIV चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा समूहा पात्र असतो.
 • नितीधारक हा संबंधीत उपलब्ध करुन देणार्‍या कंपनीचा उपभोक्ता किंवा सभासद असावा लागतो.
 • अशा प्रकारची नितीची शिफारस ही सरकारी कंपन्यांद्वारे, निमसरकारी सामाजिक संस्थांद्वारे अथवा अधिकृत नोंदणी असलेल्या समूहाद्वारे अंमलात आणलेली असावी.
 • AIDS ची पातळी ठरवण्यासाठी सर्व सभासदांची CD4 तपासणी करणे बंधनकारक आहे.
नितीचे अधिकारक्षेत्र आणि कार्यक्षेत्र
 • दाखल स्वरुपाची रुग्ण सेवा/रुग्णालय
 • रुग्णालयात दाखल करण्याआधी ३० दिवसांचा खर्च
 • रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा ५०००/- रुपयांपर्यंतचा खर्च
नितीअंतर्गत असलेल्या काही विशेष गोष्टी
 • सुरवातीपासूनच निदान झाले असलेल्या सर्व आजारांसाठी/दुखापतींसाठी उपलब्ध.
 • नितीचा कालावधी सुरु झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कोणताही आजार उद्‍भवल्यासही विमानिती लागू.
नोंदणीच्या प्रक्रिया/महत्त्वाच्या बाबी
 • विमानितीच्या अर्जदाराने सर्व अटी व पात्रता पूर्ण केलेल्या असाव्यात
 • विमाकंपनीद्वारे छायाचित्रासहित ओळखपत्र दिले जाते.
 • छायाचित्रासहित ओळखपत्रात ओळखपत्राचा क्रमांक, निती क्रमांक व वैधता कालावधी समाविष्ट असतो.
 • तसेच विमादात्याचा निशुल्क असलेला टोल क्रमांकही दिला जातो.
 • या कार्डाद्वारे कोणत्याही अगाऊ रकमेशिवाय रुग्णाला दाखल करता येते. संबंधित
 • ३००० रुग्णालये संपूर्ण देशात अस्तित्वात आहेत.
दाव्याची प्रक्रिया (रकमेशिवाय रुग्णालयात दाखल करणे)
 • विमानितीमधे नमुद असलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला दाखल करावयाचे असल्यास आपण विनारकमेने त्यास दाखल करु शकतो.
 • रुग्णालयात उपचार करणार्‍या डॉक्टरांकडून अधिकृत फॉर्म(माहितीपत्रक) भरुन घ्यावा.
 • हा फॉर्म विमाकंपनीकडे अधिकृत मंजुरीसाठी पाठवला जातो.
 • परिस्थिती व प्रसंगाचा योग्य आढावा घेऊनच मग विमाकंपनीचा वैद्यकीय अधिकारी या दाव्याला मंजुरी देत असतो.
 • अधिकृतरित्या प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यास रुग्णास कोणतीही रक्कम रुग्णालयात भरावी लागत नाही.
 • रुग्णालय आणि विमा कंपनी कोणत्याही मध्यस्तीशिवाय दाव्याची हाताळणी करतात.
सभासदांचा परतफेडीचा दावा (MRC)
 • परतफेडीचा दावा मंजुर करुन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर/ अपघातानंतर/ आजारी पडल्याची लक्षणे कळल्यानंतर पुढील २४ तासांच्या आत कॉल सेंटरद्वारे/ २४ तास उपलब्ध असणार्‍या हेल्पलाईनद्वारे त्याबद्दल कळवणे गरजेचे असते.
 • दाव्याची सविस्तर माहिती पुरवणारी कागदपत्रे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर १५ दिवसांत पोच करावी लागतात.
 • सर्व कागदपत्रे मूळ प्रतीच असावी लागतात.
 • या कागदपत्रात रुग्णालयातून बाहेर पडताना डॉक्टरांनी दिलेला लेखी सल्ला, रुग्णालयाची सविस्तर बिले, प्रयोगशाळेतील तपासण्यांची कागदपत्रे, पावत्या इत्यादींचा समावेश असतो.
विम्याची रक्कम वार्षिक हाप्ता
३०,००० १५११
४०,००० १९१९
६०,००० २४४५

संपर्क
राज्य वीमा समन्वयक
प्रोजेक्ट कनेक्ट
महाराष्ट्रातील एच.आय.व्ही. सहीत जगणार्‍या लोकांचे नेटवर्क - एन.एम.पी. (N.M.P.+)
दुरध्वनी: +९१ २० २६३३६०८४/८७
ई-मेल: connect@nmpplus.net

www.usaid.govwww.pepfar.gov www.psi.orgNetwork of Maharashtra By People Living with HIV (NMP+)

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya