Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मदत एड्सची लागण झालेल्या कुटुंबातील मुलांची मदत

एड्सची लागण झालेल्या कुटुंबातील मुलांची मदत

Print PDF
एड्स हा आजार सामाजिक भेदभाव सोबत घेऊनच येतो , पेशंटला केवळ अपराधीपणाच्या भावनेने जगावे लागत नाही तर इतरांकडुन योग्य वागणुक मिळत नाही तसेच दुर्लक्षित केले जाते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि जास्त करुन मुलांवर याचा प्रभाव जास्त होतो , कारण एड्सची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नीला ही लागण होण्याची शक्यता जास्त असते.

याचा परिणाम ? ”अनाथ” ,सर्व सेवा संघाचे संचालक फादर फेलिक्स म्हणतात अशा मुलांची देखभाल कोणी करत नाही अशा मुलांची काळजी घेणे हे काम सर्व सेवा संघ करते.

फेलिक्स म्हणतात की आम्ही एच.आय.व्ही बाधीत असलेल्या स्त्री/पुरुषाच्या मुलांवर एच.आय.व्ही. बाधीतांची मुले असा शिक्का लागु ड्यायचा नाही त्यामुळे त्यांची ओळख गुप्त ठेवतो, कारण त्यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, आणि त्यांना निरनिराळ्या शहराच्या वेगवेगळ्या हॉस्टेल मध्ये ठेवले जाते, तेथे त्यांच्यासोबत रहाणार्‍या मित्रांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियाच्या आजाराबद्दल माहीत नसते, त्यामुळे इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगु शकतात.

जर सेवाचा लाभ घ्यायचा असेल तर अनाथ असलाच पाहिजे हे आवश्यक नाही, फेलिक्स म्हणतात कि जर आई/वडील एच.आय.व्ही बाधीत असतील तर ,आम्ही त्या मुलाची जबाबदारी घेतो कारण जर वडील आजारी असतील तर मिळकत देखील कमी होते व कुटुंबाचे पालन पोषण करणे अवघड होते, तसेच मुलांचे जगणे खुप कठीण होते.

आत्तापर्यंत सर्वसेवासंघाने ५२ मुलांना मदत केली ज्यांच्या पालकांना एच.आय.व्ही ची लागण झाली आहे. या मुलांच्या सर्व गरजा जसे शिक्षण , कपडे,अन्न हे सत्यसेवासंस्थेतर्फे पुरवले जाते. जर कोणाला काही शंका असतील तर ते फादर फेलिक्स यांच्याशी संपर्क करु शकतात -ई मेल sss@pn2.vsnl.net.in

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya