Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स शासनाने एड्स बाबत घेतलेली दखल

शासनाने एड्स बाबत घेतलेली दखल

ऍक्वाईरेड ईम्युनो डिफीशीयेंसी सिंड्रोम म्हणजेच AIDS हा जीवनास धोका उत्पन्न करणारा आजार आहे आणि म्हणूनच आज केंद्र शासनाच्या दृष्टिकोनात याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आजतागायत AIDS या आजारावर कोणताही रामबाण उपाय किंवा इलाज शोधला गेलेला नाही. यामुळेच AIDS बाबत सर्व समाजातील लोकांना या आजाराबाबत घ्यावयाची दक्षतांची अधिकाधिक माहिती पुरवणे महत्त्वाचे ठरते.

केंद्र शासनाने प्राधान्य घेऊन या आजारावरील नियंत्रणासाठी राष्ट्रीय AIDS नियंत्रणात्मक उपक्रम म्हणून राष्ट्रीय AIDS नियंत्रण संघटनेची म्हणजेच नॅकोची (NACO) स्थापना केली. आ संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट HIV/AIDS सह जगणा-या व्यक्तींना चांगल्या प्रतीची उपचार सन्मानाने घेता येतील अशा भारत देशाची निर्मिती करणे हा हे आहे. आज आपल्या देशातील प्रत्येक राज्यात एक राज्यस्तरावरील AIDS नियंत्रक समूह आहे व हा उपक्रम पूर्णतः राज्य सरकारच चालवते. असे समूह म्हणजे एकाअर्थी नॅकोचेच (NACO) विभाग असतात.

HIV/AIDS संदर्भात सरकारी उपक्रमांशिवाय असंख्य निमसरकारी संस्था या आजाराबाबत माहिती व दक्षतांचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत आहेत. हीच या आजाराची खरी दक्षता व शक्य असा इलाज आहे. अमेरिकासारख्या उच्चशक्तीमार्फत बहुसंख्य परदेशी निमसरकारी संस्था आणि संघटना या आजाराबाबत जागृकता आणण्यासाठी कार्यरत आहेत. अशा काही संस्थांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
ऍक्शनएड, ऍव्हेर्ट, एड्स केअर एज्युकेशन ऍंड ट्रेनिंग (ACET) म्हणजेच एड्स्बाबत सुश्रूषा-शिक्षण-प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य (FHI), इंडीयन रेड क्रॉस ऍंड पॅनोज एड्स प्रोग्रॅम.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya