Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मनोगत सक्सेस स्टोरी मरियम्माचे व्यसनमुक्ती बद्दलचे मनोगत

मरियम्माचे व्यसनमुक्ती बद्दलचे मनोगत

Print PDF
मरियम्मा ही आंध्रप्रदेशातील एका छोट्या गावातील एका शेतकर्‍याची मुलगी आहे . तिचे वय ३१ आहे तिला ३ बहिणी आणि एक भाऊ आहे. ति आणि तिचे भावंड नशिबवान होते की त्यांनी उच्च शिक्षण घेतले.सर्व भावंडाचे लग्न झाले होते.

तिने तिचे शिक्षण पुर्ण केले आणि एका रेल्वे कर्मचार्‍याशी लग्न केले , त्याचे शिक्षण १० पर्यंत झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर ति गर्भवती राहीली आणि चाचणी द्वारे तिला आपण पॉझीटीव्ह असल्याचे समजले. आणि तिच्या पतीची चाचणी देखील पॉझीटीव्ह आली आणि तिचे आयुष्य पुर्णपणे विखुरले गेले.
तिच्यामध्ये आणि तिच्या नवर्‍यामध्ये बरेच वाद आणि भांडण झाल्यानंतर त्याने हे कबुल केले कि लग्नाच्या आधीपास ुनच तो पॉझीटीव्ह होता. तिला आपण फसवले गेलो असे वाटले आणि तिने वेगळे रहायचे ठरवले , दुसर्‍या लग्नाचा पण विचार तिच्या मनात आला पण तिला दुसर्‍या कोणाचे आयुष्य खराब करायचे नव्हते. पण तिच्या नवर्‍याला त्याची चुक कळाली आणि आता यापुढे तिच्याशी त्याने प्रामाणीकपणाने वागण्याचे वचन दिले, आणि तिने एका मुलीला जन्म दिला आणि सुदैवाने ति निगेटीव्ह जन्माला आली ,आणि तिच्या आयुष्यात एक नविन आशा निर्माण झाली तिने तिच्या मुलीला आई वडीलांकडे ठेवायचा निर्णय घेतला.

नंतर तिने "Railway Women's Empowerment and AIDS Prevention Society" येथे समुपदेशक म्हणुन काम करु लागली. तिने या विषयात बरीच माहीती मिळवली आणि इतर पॉझीटीव्ह लोकांना त्यांना येणार्‍या समस्यांसाठी मदत करायचे ठरवले. आपण ज्या समस्येतुन गेलो त्यात इतरांनी जाऊ नये यासाठी तिने व्यसनामधुन एड्सचा प्रसार कसा होतो हा संदेश सर्वपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

आता ते एक चांगले आयुष्य जगत आहेत. आणि त्यांना स्वास्थामध्ये काही अडचण नाही आणि ति तिला तिच्या मुलांचे भविष्य उज्वल असेल अशी आशा आहे.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya