Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मनोगत सक्सेस स्टोरी सक्सेस स्टोरी - डॉ. देवदत्त गोरे

सक्सेस स्टोरी - डॉ. देवदत्त गोरे

Print PDF
पश्चिम भारतातील किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्यातील एका छोट्या खेड्यात डॉ. देवदत्त गोरे हे एक प्रख्यात सर्जन म्हणून कार्यरत होते. १९९४ मध्ये एकदा त्यांना स्वत:ला HIV ची लागण झाल्याचे लक्षात आले. हे निदान झाले आणि डॉ. गोरे ह्यांचे आयुष्य, त्यांची तब्येत हे उद्ध्वस्तच झाले! त्यांचे वजन ६८ किलोंवरून ३८ किलोंवर आले. आणि त्यांचा CD 4 count सुद्धा ३८ वर आला. त्यांना नागिण, सेरेब्रल ऍट्रोफी ह्या सरख्या आजारांची लागण सुद्धा झाली. HIV ची लागण झाल्यावर आणि इतके आजार भराभर पसरत गेल्यावर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले की ह्यानंतर डॉ. देवदत्त गोरे हे फार फार तर दोन महिने जगू शकतील.

परंतु स्वत:च्या हिम्मतीवर आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळावर डॉ. गोरे ह्यांनी HIV वर लढा दिला, योग्य असे उपचार घेतले. आणि नुसतेच ऍलोपथीचे उपचार घेत न बसता त्याच्या बरोबरीने योगासने, प्राणायाम, आहार ह्या सर्वांचाही त्यांनी ह्या HIV च्या लढ्यात वापर केला. खरे तर एखादी व्यक्ती जेव्हा ऍलोपथीची डॉक्टर असते, तेव्हा ती फक्त त्यावरच विश्वास ठेऊन ते उपचार घेत रहाते. परंतु डॉ. गोर्‍यांनी तसे न करता इतर पद्‍धतीच्या उपचारांवरही विश्वास ठेऊन त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला. आणि त्याचा डॉ. गोर्‍यांना खूपच फायदा झाला. ज्यांना डॉक्टर म्हणाले होते की ते फार फार तर दोन महिने जगू शकतील, ते डॉ. गोरे ह्या उपचार आणि हिम्मतीच्या जोरावर तारून निघाले आणि व्यवस्थित राहू लागले.

त्यांचे HIV चे निदान झाल्यानंतर ४ वर्षांनी, म्हणजेच १९९८ मधे डॉ. गोरे ह्यांचा CD 4 count ३८ वरून २७३ वर आला. आणि त्यांचे वजन आता ५२-५३ किलो वर स्थिरावले आहे. त्यांच्या मते त्यांचे मन जेव्हा शांत झाले, स्थीर झाले, त्यांनी आणि कुटुंबियांनी एच.आय.व्ही. ला स्वीकारले, तेव्हाच त्यांची खरी रिकव्हरी सुरू झाली.

डॉ. देवदत्त गोरे हे आता कोकणातल्या त्यांच्या गावी चांगली प्रॅक्टिस करणारे प्रथितयश डॉक्टर म्हणून प्रसिद्‍ध आहेत. त्यांची पत्नी सुद्धा डॉक्टर आहे. त्या एका सरकारी दवाखान्यात नोकरी करतात. त्यांची पत्नी आणि मुलगी दोघींच्याही एच.आय.व्ही. टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. डॉ. गोर्‍यांनी आता स्वत:ला एच.आय.व्ही. सहीत जगणार्‍या रुग्णांची सेवा करण्यातच झोकून दिले आहे.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya