एड्स शी लढा

Print


पुणे जिल्हा
 • इस्पितळामध्ये एच.आय. व्हि पॉझिटिव्ह व्यक्तिशी भेदभाव निमिशाला ससून हॉस्पिटल वॉर्ड नं. - १८ मध्ये पायाच्या ऑपरेशन साठी अडमिट केले गेले. ति आमच्या नेटवर्क मध्ये पूर्वी पासून सदस्य आहे. डॉक्टर व नर्सेस तिला उपचारा दरम्यान त्रास देत असत व एक दिवस तिला अचानक डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा तिची तब्येत बरी नव्हती. व तिला अजून उपचार व औषधांची गरज होती. एच.आय.व्ही पॉझिटिव्ह असल्याने तिला दवाखान्यामध्ये बराच त्रास सहन करावा लागला. एक किंवा दोन आठवड्यांच्या उपचाराची अजून निमिशाला गरज होती. त्याच वेळी सदर प्रकाराबद्दल पुणे नेटवर्क ऑफिसला समजले आम्हांस कळाल्यावर लगेच हॉस्पिटलला भेट देवून जबाबदार डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांकडे विचारणा करण्यात आली. की डॉक्टरांनी तिला कसा काय डिस्चार्ज दिला? डॉक्टर व नर्स कडून त्रास व भेदभाव का केला जात आहे? ती एच.आय.व्हि पॉझिटिव्ह असल्यामुळे का?

  नेटवर्क स्टाफ मधील मनिषा कुदळे व कुंदा मुजुमले यांनी स्वत: सदर डॉक्टरांशी भेट घेवून सदर डॉक्टरांना समजाविले. कोणताही पूर्वग्रह न ठेवता येणा-या प्रत्येक रुग्णांना सेवा व उपचार देणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. तसेच आत्ता आपण जे करत आहात ते कायद्याच्या विरुध्द आहे. तुमच्या विरुध्द पेशंटशी भेदभाव व उपचारात टाळाटाळ केल्याप्रकरणी कारवाई होवू शकते. त्यामुळे आम्ही त्यांना समजावले की येथून पुढे कोणत्याही पेशंटशी अशा पध्दतीची वर्तवणूक करु नये.

  या भेटीमुळे निमिशाला हॉस्पिटल मध्ये परत अडमिट करुन घेण्यात आले. योग्य उपचारांमुळे तिची तब्येत आत्ता सुधारु लागली आहे.
 • एच.आय.व्हि पॉझिटिव्ह शिक्षकाशी शाळेमध्ये भेदभाव १९९० पासून शहा हे एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये हायस्कूल टिचर चे काम करत होते. त्यांचा या कामातील अनुभव आठ वर्षाचा होता. या कालावधीमध्ये ते कधीही अनुपस्थित किंवा रजेचा बाबत दोषी आढळून आले नाही. त्यांच्या कामाची गुणवत्ता ती संस्थेतील इतर शिक्षकांच्या गुणवत्तेसमान होती. काही कालावधीनंतर तब्बेतीच्या तक्रारींमुळे त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात आले. त्यांना त्यांच्या पदावरुन कमी करण्यात आले. त्यांनी संस्थेमध्ये येवून कामावरुन कमी करण्याचे कारण विचारले. संस्था चालकांनी त्यांना तुम्ही एच.आय.व्हि पॉझिटिव्ह आहात व पदावर काम करण्यास अपात्र आहात असे उत्तर दिले.

  एका दिवशी त्याने आमच्या संस्थेला भेट दिली व त्यांच्याबाबत घडलेली घटना सांगितली नेटवर्कचे अध्यक्ष संजय जाधव व जनरल सेक्रेटरी यांनी त्यांना शाळेला परत जाण्याची व संस्था चालकांकडून कामावरुन कमी करण्यात आल्याचे कारण लेखी स्वरुपात देण्याचे सांगितले. संस्था चालकांनी लेखी स्वरुपात काहीही देण्यास नकार दिला. व परत न येण्याबद्दल समज दिली.

  पुन्हा घडलेल्या घटनेबाबत शिक्षकांनी येवून नेटवर्क ऑफिसमध्ये सांगितले तेव्हा प्रेसिडंट व जनरल सेक्रेटरी यांनी शिक्षण संस्थेस भेट दिली

  कामावरुन कमी करण्यात आल्याबद्दल चर्चा केली. चर्चा अंती सांगण्यात आले. कि ही घटना कायदेशीर असून याबाबत त्यांना कोर्टाकडून अडचणींचा सामना करावा लागेल. संस्था चालक अजूनही लेखी स्वरुपात काही देण्यास तयार नव्हते अशा पध्दतीने शहा यांना त्यांचे काम परत मिळाले. आता शहा त्याच पदावरती शिक्षक म्हणून काम पहात आहे.
कोल्हापूर जिल्हा
 • रेखाचे १९९८ मध्ये शंकरशी लग्न झाले. शंकरच्या सास-यांबरोबर दोघेही वडगाव येथे आनंदी जीवन जगत होते. शंकर घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट येथे काम करीत होता. रेखा ७ महिन्याची गरोदर असताना सासूशी झालेल्या किरकोळ वादाचे परिवसन तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. रेखाने पहिल्या मुलीला जन्म दिला. तिचे आई वडील तिला मदत करीत असे. दोन वर्षानंतर रेखा परत गरोदर राहिली. त्यावेळी तिला मुलगा झाला. सर्व सुरळीत असताना काही वेळेला देव तुम्हांला कठीण दिवस दाखवितो. शंकरला ताप, थंडी असे काही आरोग्य विषयक तक्रारी जाणवू लागल्या त्यामुळे त्याचे कामावरती जाणे मुश्कील झाले हळूहळू आर्थिक स्थिती खालवल्याने औषधोपचाराचा खर्चही त्यांना करणे परवडणारे नव्हते. शंकरचा एच.आय.व्हि रिपोर्ट सकारात्मक आला. त्यावेळी रेखाला नेटवर्क ऑफ कोल्हापूर बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय.व्हि या संस्थेबद्दल माहिती मिळाली. शंकर व रेखा २००७ मध्ये नेटवर्क ऑफिसला आले. विविध आरोग्य समस्यांवर समुपदेशन केल्यावर पीअर कॉन्सलर ने त्यांना कम्युनिटी केयर सेंटर पाचगणी येथे पाठविले.

  रेखा पतीच्या आरोग्याबाबत चिंतेत होती व तिला स्वत:ची तपासणी व आरोग्य याचे भान नव्हते. दोन आठवड्यांनंतर शंकरची प्रकॄती सुधारल्याने डॉक्टरांनी शंकरला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले.

  दोघांनी सर्व नातेवाईकांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. शंकर आत्ता सुरळीत काम करु लागला होता. समुपदेशनामध्ये कॉन्सलरने त्यांना मुलांची देखील तपासणी करण्याबाबत सांगितले ए आर टी सातत्य नसल्याने काही दिवसांनंतर शंकर डीफॉल्टर झाला. त्याच दरम्यान रेखा ला कळाले की शंकर लग्नापूर्वीच एच.आय.व्हि पॉझिटिव्ह होता. व त्याने स्वत:च्या स्थितीबद्दल कोणासही कल्पना दिली नाही. या आघातानंतर रेखाला शंकर बरोबर राहण्याची ईच्छा नव्हती. सर्व घटनांबद्दल शंकरचे कुटुंब रेखालाच दोषी मानत होते. रेखाला तिच्या दोन्ही मुलांबद्दल काळजी लागली होती. जगण्याचा उत्साह व लढण्याची उमिद रेखा हरवून बसली होती. रेखा आत्ता लहान सहान गोष्टीवरुन शंकरशी भांडू लागली होती. या परिस्थितीमध्ये शंकर हळूहळू दारुच्या आहारी गेला व त्याला आरोग्य विषयक तक्रारी जसे की ताप, अपचन, लिव्हर विषयक समस्या जाणवू लागल्या रेखाला आर्थिक, मानसिक, सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. टी ओ डब्यू ने गॄह भेट दिल्यावर असे दिसून आले की रेखा व शंकर कडे औषधोपचारासाठी देखील पैसे नव्हते. काही दिवसानंतर रेखा ने ऑफिसशी संपर्क साधून शंकरचे निधन झाल्याचे कळविले.

  काही महिन्यानंतर रेखाला स्वत:च्या तब्येतीची काळजी वाटु लागली. तिला मुलांची एच.आय.व्हि तपासणी करायची होती पण त्यासाठी तिचे धाडस होत नव्हते. रेखा चा सी डी ४ चांगला असल्याने तिला ए.आर.टी उपचार सुरु करण्याची आवश्यकता नव्हती. मनो सामाजिक आधाराची गरज समुपदेशकांनी पूर्ण केली.

  मे २००८ मध्ये रेखाला शिवणकामाचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली जेणेकरुन ती तिच्या वडीलांना व कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकत होती. रेखा आत्ता ऑफिसच्या सर्व कार्यक्रमात उत्सुर्फ सहभाग घेत असत. एन के पी प्लस कडे एच.आय.व्हि टी बी प्रकल्प चालतात या मध्ये ज्या पॉझिटिव्ह व्यक्तिंना काम करण्याची इच्छा असे अशांना काम मिळू शकते. रेखाला ड्रॉप इन सेंटर मध्ये काम करण्याची संधी मिळाली. व ती पन्हाळा तालुक्यासाठी आऊट रिच वर्कर म्हणून काम पाहते.
निष्कर्ष :
 • शंकरला एच.आय.व्हि उपचाराची माहिती नव्हती.
 • रेखाला कुटुंबाचा आधार किंवा मदत नव्हती.
 • आर्थिक स्थिती गरीबीची होती.
 • उपचारादरम्यान रेखाने शंकरला चांगली साथ दिली.
 • तिला ए.आर.टी सेंटर सांगली मधून औषधे सुरु करण्यात आली.
 • तिने स्वत:चे एच.आय.व्ही बाबतची स्थिती स्विकारली आहे.
 • नातेवाईकांशी लढण्यासाठीचा तिचा आत्मविश्वास वाढत आहे.
 • ती आता सुरळीत काम करते.
बीड
 • या महिन्याच्या दोन केस स्टडीमधील पहिली बीड मधुन जितेंद्र सुर्यवंशी यांचे ही केस स्टडी पाठवल्याबद्दल आभार

  बीड, सनिता वय - २६ हि तिच्या संसारिक आयुष्यात खूप सुखी होती. २००२ ला तिचे लग्न टॅक्सी चालक [ मालक] यांच्याशी झाले होते. तो एका दुकानाचा मालक होता. लग्नानंतर लगेचच सुनिता गरोदर राहिली व तिने एका पहिल्या मुलींला जन्म दिला. २००४ पर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होते, त्यानंतर तिच्या नव-याला ताप येणे, वजनात घट होणे असा त्रास होण्यास सुरवात झाली. बीड सरकारी दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर सुनिताचा नवरा एच.आय.व्ही पॉझिटीव्ह असल्याचे आढळले.

  एच.आय.व्ही बाबतीची स्थिती समजल्यावर मदतीसाठी त्यांनी ब-याच लोकांकडे प्रयत्न केले. पण कुणाकडूनही त्यांना योग्य मदत मिळाली नाही. त्याच खाजगी उपचार करुन पाहिले पण काही उपयोग झाला नाही. त्याच खाजगी उपचार करुन पाहिले पण काही उपयोग झाला नाही. सुनिताच्या नव-यांची तब्येत जास्तच बिघडत गेली व शेवटच्या स्टेजमध्ये त्यांना २००५ मध्ये बेल एअर हॉस्पीटल, पाचगणी येथे नेण्यात आले.

  पतिच्या निधनानंतर सुनिता असहाय्य झाली व तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिचाही एच.आय.व्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. नेटवर्क ऑफिसला आल्यानंतर समुपदेशन व इतर सुविधांनंतर तिचा

  जगण्याचा आत्मविश्वास वाढला तिला असेही समजून सांगण्यात आले की ती एकटीच नसून तिच्या सारखे हजारो लोग आहेत जे एच.आय.व्ही सह जगत आहेत. तिचा पहिला प्रश्न होती की, "माझ्या नंतर माझ्या मुलींची काळजी कोण घेईल?" ती एनबीपी+ची सभासद झाली व तिचे रेग्युलर जीवन जगू लागली.

  त्याच दरम्यान दुकान विकून नव-यांच्या उपचारासाठी घेतलेले उधार पैसे लोकांना परत केले. इतक्या बिकट परिस्थितीतही सुनिताला भविष्याबद्दल आशा आहे. कलंक व भेदभावाच्या अंधारात जगणा-या एच.आय.व्ही पॉझिटिव्ह लोकांना ती सर्वतोपरी सहाय्य करते. तीच्याकडे १. ५ एकर जागा असून तिला त्यावर घर बांधायचे आहे. एच.आय.व्ही सह जगणा-या लोकांमध्ये जागॄती करण्यासाठी ती धडपडते हे काम करतांना ती स्वत: एच.आय.व्ही सह जगत आहे. याचा तिला विसर पडतो. सुहास्य वदनाने ती सांगते, "इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सर्व एच.आय.व्ही + लोक जगू शकतात त्यासाठी त्यांना समाजाच्या सहकार्याची आवश्यकता आहे." सनिता ही एच.आय.व्ही सह जगणा-या सर्वासाठी आदर्श आहे.

  जेव्हा ती प्रथम नेटवर्कच्या संपर्कात आली तेव्हा तिला असुरक्षित वाटत होते व तिच्या मनात ब-याच शंका होत्या. समुपदेशनामुळे आम्ही तिचा जगणा-या दुष्टिकोन व सकारात्मक बदल घडवू शकतो. तिला माहित आहे की ती एकटीच नाही. ती शिक्षीत असून, तिचे शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी आमचा तिला पाठिंबा आहे. स्वत:च्या मुलीसाठी जगते हे तिच्या आयुष्याचे उददीष्ट असून तीला चांगले शिक्षण देवून तिचे आयुष्य चांगले व्हावे अशी तिची इच्छा आहे.

  १] जगण्यासाठी आयुष्यांत संघर्ष करणे महत्त्वाचे आहे.
  २] एच.आय.व्ही सह जगणा-या इतर लोकांसाठी काम करण्याची तिची इच्छा आहे.
  ३] योग्य समुपदेशनामधून आपण एखाद्याचा जीवनाकडे बघण्याचा दुष्टिकोन बदलू शकतो.
  ४] एच.आय.व्ही उपचारासाठी येणारा अतिरिक्त खर्च कुटुंबाला आर्थिक संकटात टाकू शकतो.
  ५] सामाजिक बांधीलकी व सहकार्याचे सुनितासह सर्वांनाच आवश्यकता आहे.

  जितेंद्र सुर्यवंशी
  जिल्हा समाजसेवक, बीड
  मोबाईल - ९९७०२६७७५०
परभणी
 • बबीता चरण व संजू काळे यांचे ही केस स्टडी टाकवल्याबद्दल आभार. रुपा ही ३१ वर्षाची महिला फेब्रुवारी २००६ मध्ये परभणी नेटवर्कची सभासद झाली ती परभणीतील एका खेड्यामध्ये राहत होती. तीच्या नव-याला एड्स होता. पण कुटुंबाला एच.आय.व्ही बाबत असलेल्या अज्ञानामुळे किंवा माहितीच्या अभावामूळे ते तिच्या नव-याचा उपचार व्यवस्थित करु शकले नाही त्यामुळे तो मरण पावला. नव-याच्या मुत्युनंतर रुपाची सासू व कुटुंब तिला व्यवस्थित वागणूक मिळाली नाही. मुलांच्या मॄत्युसाठी तिला जबाबदार धरण्यात आले. तसेच तिला स्वतंत्र राहण्यास सांगण्यात आले. तिला घरातून बाहेर काढल्यानंतर ती त्यांच्या वडीलांकडे राहू लागली. तिचे वडील कामगार होते तसेच व्यसनी होते. आता हळूहळू रुपा आजारी पडू लागली तिच्या शेजारी तिला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले असता तिचा रिपोर्ट एच.आय.व्हि पॉझिटिव्ह असल्याचा आढळले. त्यानंतर तिच्या वडीलांनाही तिला घराबाहेर काढले. तिच्या वडीलांनाही तिला घराबाहेर काढले. तिचे वडील त्याकाळामध्ये तिला मारझोड करत असत, व आत्महत्या करण्याबाबत सांगत असत. तिच्या हातचा स्वयंपाक कुटुंबातील कुणीही खात नसत व तिचा तिरस्कार करत असत. गंभीर आजारी पडल्यानंतर परभणी येथे सरकारी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. त्याठिकाणी तिला नेटवर्क बद्दल समजले व ती नेटवर्कची सभासद झाली. तीची सर्व परिस्थिती समजावून घेतल्यानंतर आम्ही तिला समुपदेशन करून सकारात्मक जीवनशैली बद्दल सांगितले. दिवसेनदिवस तिचा आजार वाढत चालल्याने तिला आता ए.आर.टी ची आवश्यकता होती. सीडीफोर टेस्टिंगची आवश्यकता त्यावेळेला सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध नसल्याने तिला परभणीमध्ये ए.आर.टी सुरु होऊ शकली नाही. वडीलांनी बाहेर काढल्यामुळे व इतर कोणाचाही आधार नसल्याने तसेच पैश्याचे पाठबळ नसल्याने रुपा जास्त अडचणीत सापडली. आम्ही तीच्या वडीलाकडे गेलो व त्यांना एच.आय.व्ही बद्दल माहिती दिली. एकत्र राहील्याने एच.आय.व्हीचा प्रसार होणार नाही हे आम्ही त्यांना समजावून सांगितले. जर तिला उपचार देण्यात आले तर तीची तब्येत सुधारुन ती काम करु शकेल व पैसे मिळवू शकेल. पण आता तिला कुटुंबाच्या आधाराची गरज असल्याचे समजावून सांगितले. वडीलांचा दुष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही दोन ते तीन वेळेला त्यांच्याघरी भेट दिली. त्यावेळी सीडीफोर करण्यासाठी पैसे देण्याचे मान्य केले. लोकल हॉस्पिटल ३०००/- ते ५०००/- रु सीडीफोर साठी घेत असत. जे की तीच्या वडीलांना परवडण्या सारखे नव्हते. आम्ही मुंबईला तिचे रक्त तपासणीसाठी पाठविले. ज्याचा खर्च ६००/- रु. होता त्यावर तिचा सीडीफोर फक्त २४ होता. ए.आर.टी सुरु करण्याची आवश्यकता असल्याने आम्ही तीला जे.जे. हॉस्पीटल मुंबई येथे पाठविले. त्याच तारखेला जाणा-या इतर सभासदासह ती मुंबईला गेली व काही दिवसांनतर ३१ ऑगस्ट २००६ ला तिचे ए.आर.टी सुरु करण्यात आली.

  आम्ही आता तीच्या संपर्कामध्ये होतो. तसेच तिच्या वडीलांना वेळोवेळी मार्गदर्शनही करत होतो. आता तीची तब्येत सुधारत होती. संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवांना मिळणा-या योजनेअंतर्गत तिला पेशंन सुरु करण्यात आले. दर महिन्याला ७५०/- तिला मिळतात. तसेच अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी ती दुस-याकडे धुणं, भांड्याचे काम करु लागले. कुटुंबाला चालवण्याइतके पैसे मिळवायला लागल्यामुळे ती व तिचे वडील आता आनंदी जीवन जगत आहे. आम्ही तीला सकारात्मक जीवनशैली व सकस आहाराबद्दल मार्गदर्शन केले ज्यामुळे तिची प्रकॄती बददली. काही वेळेला इतर लोकांनाही घेऊन ए.आर.टी सेन्टर मुंबई येथे जात असे. अशिक्षीत असतांनाही ती इतरांना ए.आर.टी संदर्भात मार्गदर्शन करु लागली होती. दवाखान्याशी असलेला संवाद व डॉक्टरांचा असलेला संवाद यामध्ये आता खुप फरक पडला होता. सपोर्ट ग्रुप मिटिंग व इतर कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग नेहमी असतो. ती व तीचे वडील आता आनंदी जीवन जगत आहे. दोघेही परभणी नेटवर्कचे अत्यंत आभारी आहेत.

  बबीता चरण, डीएलएनओ,
  संजू काळे, समाजसेवक
औरंगाबाद
 • श्री. सिंग हे ४० वर्षाचे ग्रहस्थ हे विवाहित असून त्यांना २ मुले आहेत ते एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हरचे काम करत असत. औरंगाबाद मधील या कामासाठी त्यांना महिन्यांला २,०००/- रुपये पगार होता. त्यांच्या या पगारामधुन रुम भाडे घरगुती खर्च व मुलांच्या शिक्षणावरती बरेच पैसे खर्च होत असत.

  काही दिवसानंतर त्यांना डोळ्याच्या प्रॉब्लेमचा त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांची तब्बेत अशक्य झाली. त्याच दरम्यान एच.आय.व्ही. तपासणी अंतर्गत त्यांचा रिपोर्ट एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह आल्यामुळे ते अतिशय खचले व त्यांचा जिवनाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला. नकारात्मक विचारांमुळे ते आता स्वत:च्या जेवणाकडे देखील पुरेसे लक्ष देत नव्हते. इथुन पुढे जगण्याची त्याची इच्छा संपली होती.

  शेवटी त्यांना नेटवर्क ऑफिस बद्दल समजले. एके दिवशी ते ऍक्ट प्रोजेक्टच्या सोशल वर्करांना भेटले. आम्ही त्यांना योग्य समुपदेशन केले व रेग्युलर नेटवर्क ऑफिसला भेट देण्या संदर्भात सांगितले. समुपदेशनामध्ये आम्ही त्यांना जीवनाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलण्यासाठी सांगितले. पुर्वी ते एका प्रायव्हेट हॉस्पीटलमधून उपचार घेत होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना ए.आर.टी. औषधोपचार सुरु केले. चार महिने औषधोपचार घेतल्यानंतर देखील डॉक्टरांनी ए.आर.टी. औषधोपचार हे सर्वसाधारण ताप, थंडी या आजरांसारखेच औषधोपचार आहे. डॉक्टरांनी त्यांना ए.आर.टी. औषधोपचार सातत्यपुर्वक घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले नाही. तसेच ए.आर.टी. औषध इथुनपुढे त्यांना आयुष्यभर घ्यावी लागतील हे देखील सांगितले नाही. सरकारी दवाखान्यामध्ये हि औषधे मोफत मिळतात याची कल्पना डॉक्टरांनी सिंग यांना दिली नाही.

  औरंगाबाद नेटवर्क ऑफिसमध्ये ए.आर.टी सी.डी. ४ कौन्सिलींग नंतर सिंग यांना स्वत:च्या आरोग्याबद्दल ए.आर.टी उपचाराबाबत व सातत्याबाबत माहिती मिळाली. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने ते प्रायव्हेट मधून औषधे घेवू शकत नव्हते. औषधांची किंमत जास्त असल्याने ते त्यांना शक्य नव्हते. आम्ही त्यांना संदर्भ चिठ्ठी देवून गव्हरमेंट ए.आर.टी सेंटरला पाठविले व तेथे त्यांची फ्रि ए.आर.टी सुरु झाली. समुपदेशन व रेग्युलर भेटीमधून त्यांचा आत्मविश्वास भरपूर वाढला. तसेच त्यांची तब्बेतही सुधारली. आता ते आपल्या नेटवर्क बरोबर पी.टी.ई म्हणून काम पाहतात. आज ते एक चांगले पी.टी.ई असून उपचार सातत्य बाबत ते इतर पॉझिटीव्ह लोकांची माहिती व ज्ञान शेअर करतात. तसेच ते सपोर्ट ग्रुप मिटींग मध्ये देखील सहभाग घेतात.

  काही प्रमुख मुद्दे
  १] काही वेळेला प्रायव्हेट डॉक्टर स्वत:च्या फायद्याखातर पेंशन्टला सर्व माहिती देत नाही.
  २] प्रथम पासून पेशन्टला ए.आर.टी संदर्भात माहिती नव्हती.
  ३] ऑफिसशी संपर्क आल्यानंतर क्लाईटला ए.आर.टी. उपचारा संदर्भात व सातत्यासंदर्भात चांगले ज्ञान मिळाले.
  ४] चांगले समुपदेशन व आधारामुळे क्लाईटंचा जीवनाकडे बघण्याचा दुष्टीकोन सुधारला तसेच आरोग्य सुधारले.