एड्स संकट आणि सामना

Print
अनिल अवचट
अमेरिकेत १९८१ मध्ये एड्सची सुरवात झाली तेव्हा आपण म्हणालो, ‘असले रोग तिकडे होणार’, आपल्याला त्याची भीती नाही. मद्रासला पहिला पेशंट उघडकीला आला तेव्हा आपण म्हणालो, ‘काही तुरळक घटना घडतील, त्याचा बाऊ कशाला करता? एड्सविषयी जागृती करणारा कार्यक्रम टीव्हीवर दाखवला तेव्हा, माहित देऊन नसलेली भीती का निर्माण करता’ असा गिल्ला करून प्रेक्षकांनी तो बंद पाडला. आणि आज आपण कोठे येऊन पोचलो आहोत! भारत हा आजचा सर्वाधिक एड्सचे पेशंट असलेला देश आहे. - वर्ल्ड कॅपिटल ऑफ एड्स!

आधीच हा देश दुबळा, आर्थिक संकटात सापडलेला. त्यावर आता हे ओझं येऊन आदळतंय. आपली मोडकळीला आलेली आरोग्य व्यवस्था, स्वार्थाकडे झुकलेली झासगी डॉक्टर यंत्रणा, सभासमारंभात मश्गुल असलेले लोक पाहिले की वाटते, कसली ग्लानी आपल्या डोळ्यावर चढली आहे? राजकारणी, अन्य क्षेत्रांतले मान्यवर, कार्यकर्ते या कुणाच्याच तोंडी एड्स हा शब्दही ऐकायला मिळत नाही, तर या आव्हानाला देश कसं तोंड देणार?

पहाटेची वेळ आहे. सर्वत्र अंधार पसरलेला फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येते आहे. सगळे निर्धास्तपणे झोपले आहेत, आणि मी एड्सवरचा लेख लिहायला बसलो आहे. वर्षा दोन वर्षापूर्वीपासून मी या विषयाची माहिती घ्यायला लागलो. त्याआधी मी असाच निर्धास्त झोपलो होतो, पण मी जेव्हा या क्षेत्रातल्या तज्ञांना, प्रत्यक्ष हा रोग झालेल्या लोकांना, कार्यकर्त्यांना भेटलो, तशी झोप तर निर्धास्त राहिली नाहीच, पण जागेपणीही आता हाच विचार आत असतो, वेगाने हा रोग पसरतोय, या देशाचे काय होणार? आधीच हा देश दुबळा, आर्थिक संकटात सापडलेला. त्यावर आता हे ओझं येऊन आदळतेय. आपल्या अर्थव्यवस्थेचे काय होणार? आपली आधीच मोडकळीला आलेली आरोग्य व्यवस्था, स्वार्थाकडे झुकलेली खासगी डॉक्टर यंत्रणा, हे सगळे या आव्हानाला पुरे पडणार आहेत का?

सभासमारंभात मश्गुल असलेले लोक पाहिले की वाटते, कसली ग्लानी आपल्या डोळ्यावर चढली आहे?राजकारणी, अन्य क्षेत्रांतले मान्यवर, कार्यकर्ते या कुणाच्याच तोंडी एड्स हा शब्दही ऐकायला मिळत नाही, तर या आव्हानाला देश कसं तोंड देणार? दोन हजार पाच मध्ये भारतात जगातील सर्वात जास्त एड्सचे पेशंट असतील, असं भाकीत काही तज्ञ करीत होते तेव्हा आपण त्यांना हसलो आणि दुर्लक्ष केले. पण जेव्हा १९९६ मध्ये झालेल्या व्हँकुवर परिषदेत एक निबंध वाचला गेला, त्यात म्हटले होते, की भारत हा आजचा सर्वाधिक एड्स पेशंट असलेला देश आहे. तज्ञांचे भाकीत आपण दहा वर्षे आधीच खरे करून दाखवले.

१९८१ मध्ये अमेरिकेत एड्सची सुरवात झाली तेव्हा आपण म्हणालो, ‘असले रोग तिकडे होणार’, आपल्याला त्याची भीती नाही. कारण आपल्याकडे समलिंग संबंध नाहीत. भारतीय संस्कृतीच्या प्रभावाने आपल्याकडे विवाहबाह्य संबंधही नसतात. मद्रासला पहिला पेशंट उघडकीला आला तेव्हा आपण म्हणालो, ‘काही तुरळक घटना घडतील, पण त्याचा बाऊ कशाला करता? सुमारास एड्सविषयी जागृती करणारा कार्यक्रम टीव्हीवर दाखवायला सुरवात झाली. त्याविषयी प्रेक्षकांनी एवढा गहजब केला, तुम्ही माहिती देऊन नसलेली भीती का निर्माण करताय? असा गिल्ला करून प्रेक्षकांनी तो बंद पाडला. आणि आज आपण कोठे येऊन पोचलोय! आजही या रोगाने माणसे मरताहेत, पण ते बाहेर फारसे कुणाला समजत नाही. अजून चारपाच वर्षात माणसे पटापट मरतील तेव्हा आपण जागे होणार तोपर्यंत हा रोग कोट्यावधी माणसांपर्यंत पोचणार.

तेव्हा सुजाण लोकांनी ही ग्लानी झटकणे आवश्यक आहे. समाजधुरीण करोत न करोत, आपण कामाला लागले पाहिजे. त्यासाठी हा विषय मुळातून समजून घेतला पाहिजे. हा विषय समजायला आपण डॉक्टर किंवा मायक्रोबायॉलॉजिस्ट किंवा इम्युनॉलॉजिस्ट असायला पाहिजे असे नाही. प्रत्येकाला बुध्दी आहे. तो प्रश्न समजून घेण्याची कुवतही आहे. तो समजून घेणे हा आपला हक्‍कच आहे.

एड्स या रोगाविषयी माहिती मिळवायच्या आधी मला वाटले, आपण आपल्या शरीरातल्या प्रतिकार शक्तीविषयी म्हणजेच ‘इम्युनिटी’ विषयी समजून घ्यावे. कारण मी ६७ मध्ये एम. बी. बी. एस. झलो त्या वेळी जे शिकलो त्यापेक्षा गेल्या दहा-विस वर्षात ज्ञान एवढे पुढे गेलेय, की मी अगदी बालवाडीतला ‘चिवचिच चिमणी’ म्हणणारा विद्यार्थी वाटू लागलो. पुण्यात ‘नारी’ (नॅशनल एड्स रीसर्च इन्स्टिट्यूट) नावाची संस्था भोसरी भागात आहे. तिथल्या तज्ञ मंडळीकडे जाऊन शिकवणीच लावली.

अरूण परांजपे तिथे भेटले. निमगोरे, ठसठशीत चेहेर्‍याचे, चष्मा लावलेले हे गृहस्थ (या क्षेत्रातली भेटलेली मंडळी माझ्यापेक्षा कमी वयाची. बरेच जण मला ‘सर’ म्हणायचे. पण या ‘अडाणी सराला’ छान शिकवायचे.) त्यांनी कागद पुढे घेतला आणि मला शरीराची ‘इम्युन सिस्टीम (प्रतिकारशक्ती) कशी काम करते ते शिकवायला सुरवात केली.

भारतात एड्सच्या साथीच्या पोटात टी.बी. ची साथ दडलेली आहे. एड्सवाल्यांना तर टी.बी. होणारच, पण त्यामुळे एड्स न झालेल्यांना टी.बी. चा प्रसाद मिळणार! कारण एक टी.बी. झालेला माणूस आसपासच्या वीस लोकांना टी. बी. देत असतो.

परांजप्यांनी त्यांच्या लॅबमधला एक मोठा रंगीत छापील नकाशा दाखवला. शरीरातल्या सर्व प्रकारच्या पेशींची त्यावर चित्रे होती आनि एकमेकींकडे बाण जात होते, ‘या सेल या सेलला अमुक द्र्व पाझरून ‘स्टिम्युलेट’(उत्तेजित) करतात, या त्याला तमुक द्र्व पाझरून ‘इन्हिबीट’ करतात,(परावृत्त करतात). या उत्तेजित - परावृत्ततेचे एवढे प्रचंड जाळे समजणे माझ्या डोक्यापलीकडचे होते. परांजपे म्हणाले, ‘तरी आपल्याला थोडेच समजले आहे. शरीरात याहूनही इम्युनिटीचे अत्यंत गुंतागुंतीचे जाळे पसरले आहे.’


‘पण या पेशी एकमेकींना हे सिग्नल पोचवतात कसे? त्यांना हे कळते कसे? त्यांना विचार करायला मेंदू थोडाच आहे?’
‘हे सगळे केमिकल्समार्फत चालतं. ती तर त्यातली मजा आहे. आम्ही प्रयोग करतो. आम्हाला टेस्टट्यूबमध्ये दिसत काहीच नसतं. परिणामावरून ते सिध्द होत असतं.’

शरीरात अशा लक्षावधी जंतू, विषाणूंसाठी तयार झालेल्या अब्जावधी अँटिबॉडीज रक्तातून फिरत असतात. त्या प्रकारचा जंतू, विषाणू दिसला, की हल्ला चढवून त्याला नष्ट करीत असतात. ही लढाई सतत चालू असते. हवेतून पाण्यातून एवढे जंतू शरीरात दर क्षणाला जात असतात, तरी माणूस नेहमी आजारी का पडत नाही? त्याचे कारण ही सतत चाललेली लढाई. जसे माणसाला मेंदूमुळे व्यक्तीमत्व प्राप्त होते, तसेच या म्युनिटीमुळेही व्यक्तीमत्व येते. कारण प्रत्येकाच्या शरीरात निरनिराळ्या काळात निरनिराळे जंतू जाऊन ती तयार झालेली असते.

एवढी मजबूत यंत्रणा, कडेकोट बंदोबस्त असताना मग एड्सचा व्हायरस शरीरात कसा काय शिरतो आणि या यंत्रणेवर कब्जा कसा मिळवू शकतो? असा कसा ताकदवान आहे हा व्हायरस? परांजपे म्हणाले, ‘छे! छे! हा व्हायरस अगदीच दुबळा आहे, माणसाच्या शरीराबाहेर तो फार वेळ जिवंत राहू शकत नाही. माणसाच्या शरीराबाहेर तो आपली संख्याही वाढवू शकत नाही. ते करण्यासाठी त्याला मानवी शरीरात यायला लागते. उकळत्या पाण्यात तर तो मरतोच पण त्याच्या निम्म्या तापमानाला म्हणजे ५६ अंश सें. तापमानातही ते मरून जातात.’

मी नॅशनल जिऑग्राफिकने प्रसिध्द केलेल्या फ्रॉटियर्स या पुस्तकात या व्हायरसचा फोटो पाहिला होता. हा व्हायरस असतो अगदी लहानं, म्हणजे एका मिलिमीटरच्या एक दहाहजारांश भागाएवढा. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने काढलेला तो फोटो पानभर होता. तो व्हायरस गोलाकार असून, त्यावर सर्वत्र बोंडे उगवलेली होती.

‘अमेरिकन सायंटिफिक’ नावाचे सर्वसामान्य लोकांना समजू शकेल असे, पण सायन्सविषयी अगदी अद्ययावत माहिती देणारे छान मासिक आहे. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या अंकातल्या लेखावरून मला हा व्हायरस शरीरात कसा शिरतो त्याचा खुलासा झाला. या व्हायरसची जी बोंडे आहेत ना, त्यावर जी. पी. १२० नावाचे प्रोटिन असते आपल्या इम्यूनिटिमधल्या सर्वात महत्वाच्या ‘टी’ सेलवर या प्रोटिनचा रिसेप्टॉर असतो. म्हणजेच तो फिट्‍ट बसेल अशी जागा असते. म्हणून व्हायरस शरीरात शिरला, की तो या ‘टी’ सेलवर जाऊन फिट्‌ बसतो आणि त्या पेशीत प्रवेश करतो. प्रत्येक जंतूला, आपल्या शरीरातल्या पेशला एकैक गाभा - म्हणजे न्युक्लिअस असतो. त्यात आपला डी.एन.ए. असतो. या डी.एन.ए. वर आपले जीन्स्‌ असतात.

एड्सच्या व्हायरसमध्ये (त्यालाच एचआयव्ही म्हणतात.) डी.एन.ए. नसतो तर त्यासारखाच पण वेगळा आर.एन.ए. असतो. हा व्हायरस स्वतःपासून इतर व्हायरस तयार करण्यासाठी या आर.एन.ए. च्या कॉप्या काढू शकत नाही. म्हणून ‘टी’ सेलमध्ये आल्यावर एका आर. टी. एन्झाइम द्रावाच्या साह्यानं तो स्वतःचा डी.एन.ए. तयार करतो. आणि तो डी.एन.ए. ला जाऊन चिकटतो. एरवी आपला डी.एन.ए. स्वतःच्या कॉप्या काढीत असतोच. त्या छापखान्याचा उपयोग करून हा स्वतःच्या कॉप्या काढून अधिक आर.एन.ए. मिळवतो. गाभ्यातून बाहेर आल्यावर त्याच्याकडे प्रोटिएज नावाचे दुसरे एन्झाइम असते. त्या साह्याने कव्हर चढवून परत आपली पेशी तो तयार करतो. असे अनेक व्हायरस एकेका ‘टी’ सेलमध्ये तयार झाले, की तो ‘टी’ सेल फुटतो आणि व्हायरस रक्तात बाहेर पडतात. जी. पी. १२० च्या सहाय्याने आणखी ’टी’ सेलला चिकटतो, प्रवेश मिळवतो, स्वतःच्या लक्षावधी कॉप्या काढतो, तोही टी सेल फुटतो..... की चालले

कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी उबवून घेते म्हणातात, पण त्याहीपेक्षा हे भयंकर झाले. इथेही व्हायरस कोकिळा नुसती अंडी घालत नाही, तर कावळ्याचे घरटेच उध्द्वस्त करतो.... अशीच ही अवस्था आहे.

बरे, ‘टी’ सेल मरणे म्हणजे शरीर आंधळे होणेच आहे. ‘टी’ सेल म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीचा सुत्रधार आहे. कमांडर जनरल आहे त्याच्याच ऑफिसात घुसून त्याला मारल्यावर सैन्य आहे, पण ऑर्डर द्यायला कुणी नाही अशी गोंधळाची अवस्था शरीराची होऊन जाते.

तरी शरीराचा प्रतिकारही चालूच असतो. सुरूवातीला व्हायरस शरीरात घुसले आणि त्यांची वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली, की शरीराची इम्युनिटी त्यांचा बंदोबस्त करून त्यांना आटोक्यात आणते. त्यामुळे सुरवातीला फ्ल्युसारखा ताप येऊन जातो, ते याचेच लक्षण. पण त्याच पूर्णपणे निःपात होत नाही. कारण दर वेळी जन्म घेताना ते व्हायरस थोडे वेगळे होऊन बाहेर पडतात.

आर. टी. एन्झाइमचा चूक करण्याचा दर जास्त आहे. तो यांच्या पथ्यावर पडतो. त्यामुळे अगदी तंतोतंत कॉपी होण्याऐवजी बर्‍याच चूका होऊन वेगळ्या कॉप्या तयार होतात. म्हणून अँटिबॉडिज त्यांना पटकन ओळखू शकत नाहीत. नंतर शरीर त्यांना ओळखायला शिकते, त्यांचा निःपात करते, पण तोपर्यंत दुसर्‍या ‘टी’ सेलमधे त्यांच्या दुसर्‍या कॉप्‍या निघालेल्या असतात. अशी लढाई पाच, सात, आठ, दहा वर्षे सतत चालू राहते. शेवटी ‘टी’ सेलची संख्या कमी कमी होत जाते, तसतशी शरीरातली प्रतिकारशक्ति क्षीण होत जाते. एरवी त्या सेलचा काउंट हजार असतो तो ५००, मग २०० शेवटी ५-१० वर येऊन पोचला, की इतर जंतू शरीरावर हल्ला करतात आणि त्यातच माणुस मरतो. माणसातील एड्‍सचे व्हायरस प्रत्यक्ष मारत नाहीत, ते फक्त मोक्याचे सेल्स नष्ट करतात. त्यामुळे इतर रोगांना शरीराची दारे सताड उघडी होतात.

मी परांजप्यांना विचारले, ‘पण शरीरात नवीन टी (किंवा याला टी-फोर किंवा सी. डी. फोर असही म्हणतात.) सेल्स निर्माण होत असतातच ना? तरीही का असं होतं?’
ते म्हणाले ‘लहानपणी गुरूजी आपल्याला हौदाचं गणित घालायचे ना, तसं आहे हे. शरीर ‘टी’ सेल तयार करत असतं, व्हायरस त्या नष्ट करीत असतं. हौदाचा खलच नळ वरच्यापेक्षा थोडा मोठा असला की काय होतं? पाण्याची पातळी हळूहळू खाली जायला लागते. तसं होतं शेवटी हौद पूर्ण रिकामा होतो.’....

शरीरसंबधातून रोग दूसर्‍या माणसास मिळण्याची शक्यता एक टक्‍का असते, तर पॉझिटिव्ह रक्ताची बाटली दुसर्‍यास दिली तरी ती ९० टक्‍के आहे. एकमेकांच्या शरीरातल्या द्रव पदार्थांचा संपर्क आला की हे व्हायरस दुसरीकडे जाऊ शकतात.

‘इट डिपेंड्स’. त्यांनी एक आलेख काढला. एक उभी रेघ, एक आडवी. उभ्या रेघेवरच्या भागातून एक रेघ सुरू केली आणि ती हळूहळू खाली आणत शेवटी खालच्या रेषेला टेकवली. म्हणाले, ‘आता हाटी फोर काऊंट आहे. हा हळूहळू खाली चाललाय. तो खाली टेकतो ती दहा वर्ष समजा. पण मध्येच त्याला इतर आजार झाले तर?’ म्हणुन त्यांनी त्या उतरत्या रेघेवर मध्येच एक खड्‍डा काढला. ती रेघ आणखी अलीकडे खालच्या रेघेला मिळवली. म्हणाले, ‘म्हणजे हा आठ वर्षातच जाणार. तसे मधूनच जेवढे जेवढे आजार होतील, तेवढं त्यांच आयुष्य कमी होणार. अगदी अपवादानं अमेरिकेत तेरा ते वीस वर्ष जगलेले लोक आहेत. पण बहुतेक जण दहा वर्षात जातात. म्हणून त्या दरम्यान त्यांनी आपली तब्येत चांगली ठेवली, आजारांपासून दूर राहिले, तर तितकी अधिक वर्ष मिळू शकतील.’

टी- फोर सेल काऊंट पाच-दहावर आला, की एरवी साधे साधे वाटणारे अनेक रोग हल्ला करतात. तोंडात पांढर्‍या रंगाची कँडिडा नावाची बुरशी येते. ती अन्ननलिकेत पसरून अन्नाचा मार्ग बंद होतो. शेवटी पाणी पिणेही अवघड होऊन बसते. सतत डायरिया (ढाळ) सुरू होतो वजन महिन्याला एकदशांश इतक्या वेगाने घटू लागते. सतत ताप येत राहतो. ‘न्यूमोसिस्टिस कॅरिनी’ नावाच्या जंतूपासून न्यूमोनिया होतो. मेंदूवर परिणाम होतो.

कातडीवर अनेक ठिकाणी नागीण (हर्पिस) उगवते. त्वचेचा ‘कापोसी’ नावाचा कॅन्सर होतो तो पसरत पसरत बराच भाग व्यापून टाकतो. (आपल्याकडे हा फार दुर्मिळ आहे.) ‘माय ओन कंट्री’ नावाचे डॉ. अब्राहम वर्गीस या अमेरिकेत स्थिरावलेल्या भारतीय तरूण डॉक्टरने लिहिलेले पुस्तक वाचले.


अमेरिकेतल्या टेनेसी प्रांतातल्या डोंगराळ भागात तो काम करीत होता. न्यूयार्क, सॅनफ्रान्सिस्कोसारख्या महानगरांमधील हा रोग आपल्या छोट्या डोंगराळ गावात कशाला येईल या कल्पनेने ते गाव गाफिल होते. आणि बघता बघता एड्सचे लोण त्याही गावापर्यंत आले आणि गावाला व्यापून टाकले. त्याच्या पेशंटच्या शेवटच्या अवस्था अतिशय तपशिलाने दिल्यात. त्या फारच हृदयद्रावक आहेत. मला पूर्वी वाटायचे, व्हायरस शरीरात गेल्यापासून दहा वर्षानी, बल्ब उघडावा तसा माणूस मरतो ना, मग वाईट नाही. अख्खी दहा वर्षे मिळतात. पण हे पुस्तक वाचल्यावर समजले, की तसे नाही. एक तर व्हायरस शरीरात गेल्याला किती वर्षे झालीत ते कळत नाही, आणि दुसरे म्हणजे शरीराची पडझड खूप आधीच सुरू होते. शेवटी व्हायरसचा मेंदूवर डायरेक्ट परिणाम झाला, तर काही माणसे इतकी भ्रमिष्ट होतात, की आसपासच्या माणसांना त्याची सेवा करणेही अशक्य होऊन बसते.

आपल्याकडे तर टी. बी. चे जंतू हवेत एवढे मुबलक आहेत, की टी-फोर काऊंट दोनशेवर आल्यावर टी.बी. हे स्टेशन लागते आणि माणूस टी.बी. लाच बळी पडतो. तर असे दिसून आलेय, की त्यातली अकरा टक्‍के माणसे ही एड्स विषाणूग्रस्त होती आणि इथून पुढे हे प्रमाण वाढतच जाणार आहे. म्हणून या क्षेत्रातले लोक म्हणतात, ‘भारतात एड्सचा चेहरा हा टी.बी. चा चेहरा आहे. परवा ‘टाइम’ मध्ये व्हँकुवर परिषदेनंतर एक लेख आला होता. त्यात म्हटले होते, की भारतातल्या एड्सच्या साथीच्या पोटात टी. बी. ची साथ दडलेली आहे. एड्सवाल्यांना तर टी.बी. होणारच, पण त्यामुळे एड्स न झालेल्यांना टी. बी. चा प्रसाद मिळणार ! कारण एक टी.बी. झालेला माणूस आसपासच्या वीस लोकांना टी.बी. देत असतो, असे एक शास्त्रातले अनुभवातून आलेले गणित आहे.

एड्ससहित टी.बी. झालेल्या पेशंटला जी औषधे दिली जातील, ती त्या पेशंटला जी औषधे दिली जातील, ती त्या पेशंटमध्ये प्रतिकारशक्तीच नसल्याने लागू पडणार नाहीत आणि ती औषधे टी.बी. चे जंतू पचवायला शिकणार. त्यामुळे औषधाला दाद न देणार्‍या टी.बी. च्या जंतूंच्या जातीच्या जाती देशभर थैमान घालणार.

एड्सपासून आपण काही दक्षता घेतली तर दूर राहू शकू, पण टी.बी. पासून कसे शक्य आहे? कारण तो श्वासावाटे, थुंकीवाटे हवेतून मिळणारा रोग आहे.

शरीरसंबंधातून रोग दुसर्‍या माणसास मिळण्याची शक्यता एक टक्‍का असते, तर पॉझिटिव्ह रक्ताची बाटली दुसर्‍यास दिली तर ती ९० टक्‍के आहे. एकमेकांच्या शरीरातल्या द्रव पदार्थाचा संपर्क आला की हे व्हायरस दुसरीकडे जाऊ शकतात.

‘इट डिपेंड्स’. त्यांनी एक आलेख काढला. एक उभी रेघ, एक आडवी. उभ्या रेघेवरच्या भागातून एक रेघ सुरू केली आणि ती हळूहळू खाली आणत शेवटी खालच्या रेषेला टेकवली. म्हणाले, ‘आता हा टी फोर काऊंट आहे. हा हळूहळू खाली चाललाय. तो खाली टेकतो ती दहा वर्ष समजा. पण मध्येच त्याला इतर आजार झाले तर?’ म्हणुन त्यांनी त्या उतरत्या रेघेवर मध्येच एक खड्‍डा काढला. ती रेघ आणखी अलीकडे खालच्या रेघेला मिळवली. म्हणाले, ‘म्हणजे हा आठ वर्षातच जाणार. तसे मधूनच जेवढे जेवढे आजार होतील, तेवढं त्यांच आयुष्य कमी होणार. अगदी अपवादानं अमेरिकेत तेरा ते वीस वर्ष जगलेले लोक आहेत. पण बहुतेक जण दहा वर्षात जातात. म्हणून त्या दरम्यान त्यांनी आपली तब्येत चांगली ठेवली, आजारांपासून दूर राहिले, तर तितकी अधिक वर्ष मिळू शकतील.’

हा एड्स जगात एकाएकी कसा उपटला, कुठून आला हा, हे नक्‍की कुणालाच माहित नाही. कुणी म्हणते आफ्रिकेतून आला. व्हायरस, बॅक्टेरिया यांच्या अनेक कारणांनी नवनव्या जाती तयार होत असतात. त्यात ‘म्युटेशन’ होऊन एक वेगळेच व्हायरस तयार झले असावे. १९८१ मध्ये एड्सच्या रोगाचा शोध लागला तो अमेरिकेत.

सॅनफ्रान्सिस्को आणि न्युयार्क या दोन टोकांच्या शहरात अतिशय दुर्मिळ आजारांच्या (न्यूमोसिस्टि न्यूमोनिया आणि कापीसी कॅन्सर) केसेस सापडल्या. इम्युनिटी अत्यंत खालावलेली असली, तरच हे रोग होतात. तशी दुसरी कुठलीही कारणे नसल्यामुळे ही नवीन साथ असल्याने जाहीर झाले. पुढे वर्षा-दीड वर्षातच फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशांत जवळपास एकाच वेळी या रोगाचे कारण असलेले व्हायरस सापडले. त्यावर वर्षभरातच रोग ओळखणार्‍या एलायझा, वेस्टर्न व्लॉट आणि पीसीआर या टेस्ट डेव्हलप झाल्या. गेल्या वीस वर्षात आपले शास्त्रीय जग इतके पुढे गेले नसते तर काय झाले असते, ते सांगता येत नाही. एक जण म्हणात होते. ‘हाच रोग पंचवीस वर्षापूर्वी आला असता तर निम्मे जग मेले असते. तरी आपल्याला लोक कशाने मरताहेत याच कल्पना आली नसती.’ हे इम्युनॉलॉजीमधले सीडी-फोर, सीडी. एट, बी सेल्स, डी.एन.ए., आर.एन.ए. पेशिंच्या आवृत्या (क्लीन्स) काढण्याचे तंत्र, या पेशीमधून पाझरणारे तर्‍हेतर्‍हेचे द्राव हे सगळॆ अलीकडेच उलगडलेले विश्व आहे.

अमेरिकेतल्या एका लॅबमध्ये खूप वर्षापासूनच्या माणसांच्या सिरम्सना लावून पाहिली. त्यावरून १९५५ च्या सिरम्समध्ये एड्सचा पुरावा सापडलाय. त्याचा अर्थ तेव्हापासून तरी निदान हा रोग अस्तित्वात आहे. माणसे तुरळक तुरळक मरत असणार. अमेरिकेत समलिंगी लोकांमध्ये याची लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे एड्स आणि समलिंगी असे समीकरण झाले. थोड्याच दिवसात तशी लक्षणे समलिंगी नसणार्‍यात दिसू लागली.

एड्सचा पहिला चेहरा अमेरिकन होता, नंतर तो आफ्रिकन झाला. आता तो आशियाई झआल आहे. सन १९८१ मध्ये रोग सापडला. १९८२ मध्ये व्हायरस सापडले. लगेच वर्षभरात टेस्ट डेव्हलप झाल्या. लोकांना वाटले, आता वर्षभरात औषध आणि प्रतिबंधक लसही सापडणार, पण त्यानंतर पंधरा वर्षे गेली तरी हमखास लागू पडेल असे औषध मिळाले नाही. जी मिळाली आहेत, त्यांच्या मर्यादा बर्‍याच आहेत. प्रतिबंधक लस तयार करता येत नाही. कारण दर वेळी हे व्हायरस ‘टी’ सेलमधून नवी जात होऊन बाहेर पडतात. त्यामुळे सर्वच जातींना लागू पडेल असे व्हॅक्सिनही होत नाही, म्हणून तुर्त तरी हा औषध नसलेला, मृत्युकडे बहुदा हमखास नेणारा रोग आहे.

आतापर्यंत अनेक साथी मानव जातीने पाहिल्या. प्लेगची साथ होती. त्यात लक्षावधी माणसे खलास झाली. इतर लहान- मोठ्या साथी होत्या, पण एड्सची साथ त्यापेक्षा बरीच वेगळी आहे. इतर साथीचे कारण अस्वच्छता, दुषित पाणी वगैरे असे. ती एखाद्या भागापुरती मर्यादित असे. त्याचा काही मर्यादित काळ असे.

या साथीचे तसे नाही. विशेषतः या रोगाचा प्रसार स्त्री-पुरूष संबंधातून किंवा समलिंगी संबंधातून होतो. आणि सेक्सबाबतचे वर्तन बदलणे किंवा नियंत्रित करणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. इतर रोगांच्या बाबतीत आपण कचरा उचलणे, फवारे मारणे, सर्वांना लस टोचणे असे उपाय वापरून साथीला आळा घालू शकतो. इथे तसे नाही. माणासांचे कुठे कोणाशी संबंध असतील हे काही सांगता येत नाही. पुण्यातल्या एका एड्स कौन्सिलिंग सेंटरमध्ये बसलो होतो. कौन्सिलर बाईपुढे एक पंचविशीचा माणूस बसलेला होता. त्याची टेस्ट झालेली होती. ती पॉझिटिव्ह आलेली होती. (व्हायरस त्याच्या शरीरात आढळले होते.)

बाईंनी त्याला विचारले, ‘तुमचा बायको व्यतिरिक्त स्त्रीशी संबंध आला होता का?’ तो मान खाली घालून म्हणाला, ‘आमच्या कामावर एक बाई आहे. तिच्याशी एकदा आला होता.’

‘हे तुमच्या पत्‍नीला माहित आहे का?’
‘नाही.’
त्यावर त्यांनी यापुढे काय दक्षता घ्यायच्या वगैरे सांगितले व म्हणाल्या, ‘तुमच्या बायकोला आत पाठवा व तुम्ही बाहेर बसा.’ तरूण मुलगी समोर येऊन बसली.
इतर चौकशी झाल्यावर तिलाही तोच प्रश्न विचारला. तिनेही मान खाली घालून सांगितले, ‘माहेरी जवळ राहणार्‍या मुलाशी माझे संबंध आहेत.’
ससूनच्या ओपीडीत बसलो असता एक काटकुळा, उंच मुलगा स्टुलावर डॉक्टरांपुढे बसला होता.
डॉक्टरांनी याबाबत चौकशी केली. त्याला गुप्तरोग झालेला होता. तो रिक्षा ड्रायव्हर होता. म्हणाला, ‘माझे बायकोशिवाय आणखी तीन मुलींशी संबंध आहेत.’

मी थक्‍क झालो! डॉक्टर मित्र म्हणाला, ‘आपल्याला कल्पना येणार नाही इतकं या ‘अनपेड’ (पैशा शिवाय) सेक्सचं प्रमाण मोठ आहे. आपण भारतीय संस्कृती वगैरे म्हणतो, पण इथं येऊन बघा. खरी संस्कृती इथं पाहायला मिळेल.’

अशा क्षेत्रातल्या डॉक्टरांशी बोलणं म्हणजे अनुभवच असतो. खालपासून वरपर्यंत शरीरसंबंधाचे कसे वेड समाजाला लागलेय, ऑफिसामधल्या चांगल्या पगाराच्या मुली फावल्या वेळात अधिक पैसा मिळवण्यासाठी काय काय उद्योग करतात वगैरे वगैरे . . .

‘नारी’ चे डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘टीव्हीमुळे हे आणखीच वाढलंय. फिल्मी गाण्यांमधून अगदी उघड उघड सेक्स चाळवला जातो. आता तर आपलं दूरदर्शन ‘ऍडल्ट चॅनल’ (मोठ्या माणसांसाठी बहुदा जास्त सेक्शूअल दृश्ये दाखवणारी) सुरू करताहेत म्हणे. म्हणजे आणखीनच हे प्रकार वाढतील.’

‘नारी’च्या पुण्यातल्या रक्ततपासणी केंद्रात बसलो होतो. एका जिल्ह्याच्या ठिकाणाहून एक साठीचा, शर्ट धोतरातला व्यापारी, त्याचा हीरोटाईप कपडे घातलेला तरूण मुलगा, त्याची डोक्यावर कपाळापर्यंत पदर घेतलेली सुरेख दिसणारी बायको आणि तिचे दोनेक वर्षाचे अत्यंत सुंदर व गुटगुटीत मुल हे सगळे आले होते. त्या तरूण मुलाची तिघांची टेस्ट केली होती. त्याचा निकाल यायचा होता. तरूण मुलाची, मुलीची आणि लहान मुलाची तिघांची टेस्ट केली होती. त्याचा निकाल यायचा होता. तरूण मुलाचा चेहरा पडलेला होता. त्याची हसरी बायको सासर्‍याची अदब राखून बाहेरच्या बाजूला मुलाबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात निकाल आला आणि कळले- नवरा, बायको, मुल तिघेही पॉझिटिव्ह आहेत. मला धक्‍काच बसला. डॉक्टरांनी लगेच निकल सांगितला नाही. उद्या या, असे सांगितले. म्हातारा व्यापारी डॉक्टरांना अजीजीने सांगत होता, ‘डॉक्टर, हाकसला रोग आम्हाला माहितबी नाही. कुठ याचा दवा मिळतो सांगा. पाहिजे तेवढा खर्च येऊ दे. आपली तयारी आहे. बॉम्बेला नेऊ का? तुम्ही चिठ्‍ठी द्या. आता बॉम्बेला निघतो.’ डॉक्टर म्हणाले, ‘बघू. उद्या या.’

ते गेल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘हा पोरगा तीन वर्षापूर्वी आला. तेव्हा कुठं वेश्याकडे जाऊन आला होता. पॉझिटिव्ह निघाला. त्याला आम्ही समजावून सांगितलं, की काय दक्षता घ्यायच्या वगैरे. पठ्‍ठयानं नंतर जाऊन लग्न केलं. न सांगताच केलं असणार. आता मुल झालं. आता तिघही पॉझिटिव्ह. काय करणार आपण?’


‘नारी’ चा आणि एकूनच या क्षेत्रातला संकेत आहे, की त्या माणसाचे निदान हे त्याला तोंडी सांगायचे. मला आश्‍चर्य वाटले. डॉ. आनंद दिवेकर हा माझा मित्र तिथे काम करतो. तो म्हणाला, ‘आम्ही त्याला निदान सांगतो. त्याचं काय करायचं ते त्यानं ठरवावं.’

‘पण त्यानं बायकोला नाही सांगितलं तर?’
‘त्याला आपण काय करणार? अशी कितीतरी तरूण मुलं येतात. पॉझिटिव्ह निघतात. एकानं तर मला त्याच्या लग्नाची पत्रिकाच दाखवली. म्हणाला, ‘पंधरा दिवसांनी लग्न आहे. मी घरी सांगूच शकत नाही. आता त्या मुलीचं वाटोळं होणार.’ आपण त्याला धोके सांगायचे काम केल, पुढचं काय करणार?’

‘पण त्या घरच्यांना इन्फॉर्म केलं तर?’
ही गुप्तता पाळणं हा आपला संकेत आहे. बंधनकारक आहे. कारण ती पाळली नाही तर काय घोटाळे होतात, हेही आम्ही रोज पाहतो. एका खेड्यातल्या शहाण्या डॉक्टरनं तर गावची सभा घेऊन सांगितलं, की या माणसाला असा रोग झाला आहे. काय होणार? तो माणूस वाळीत पडला. नुसतं निदान इतर कुणाला समजलं, की बातमी वणव्यासारखी पसरते. काहींना कामावरून काढून टाकतात. काहींना घराबाहेर हाकलतात. आपण कशाकशाला जबाबदार राहणार?’

विनित चितळे या कौन्सेलर. मुंबईला टाटा इन्स्टिट्युटतर्फे एक कौन्सिलिंग सेंटर चालवतात. त्यांना विचारले, ‘तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल?’
‘मी त्या मुलाला त्या लग्न ठरलेल्या मुलीला सांगायला भाग पाडेन. त्याला पटवून देईन.’ ‘पण त्यानं नाही ऐकलं तर?’
‘मी त्याला धमकी देईन, की तु नाही सांगितलंस तर मी सांगेन. त्यापेक्षा तूच सांग. यानं तो नक्‍कीच सांगेल.’

‘पण तरीही त्यानं नाही सांगितलं तर?’
र्जरीमध्ये. आपल्या देशाची ब्लड पॉलिसी अशी आहे, की ब्लड हे कमीत कमी दिलं जावं. ब्लड जितकं कमी द्याल, तितका एड्स व्हायरस पसरण्याचा धोका कमी होणार. शेवटी रक्त हे एक जीव वाचवणारं औषध आहे. त्याचा जपूनच वापर केला पाहिजे.’ ‘तर मग मी सांगेन. मी त्या मुलीचं फुकाफुकी नुकसान होऊ देणार नाही.’

विनय कुलकर्णी हा स्किन स्पेशालिस्ट मित्र या क्षेत्रात बरेच काम करतो. त्याच्या खासगी प्रॅक्टिसमध्ये अनेक एड्सग्रस्त पेशंट येत असतात. त्याची प्रयास नावाची संस्थाही आहे. तो म्हणाला ‘माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत. मुलाचि टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचं लग्न ठरलंय, पण त्याला घरी किंवा ठरलेल्या बायकोला सांगायचा धीर होत नाही. एक म्हणाला, ‘डॉक्टर, तुम्हीच त्या बाजूच्या लोकांना काहीतरी कारण सांगा आणि लग्न मोडा.’ मी काहीही रोगाचं कारण सांगितलं की पलीकडची माणसं म्हणायची, ‘काही हरकत नाही. आपण ट्रीटमेंट द्या. पाहिजे तर जहांगिरमध्ये ठेवा. सगळा खर्च आम्ही करू.’ ‘मला कारणं पुरवून लग्न मोडता मोडता पुरेवाट व्हायची.’ असे अनुभव माझ्या या क्षेत्रात प्रॅक्टिस करणार्‍या इतर मित्रांनाही आलेत.

एका केंद्रात आलेली काही तरूण मुले वेश्यांकडे जाऊन व्हायरस मिळाल्याचे सांगत होती. त्यांच्याकडे बघून ती अगदीच साधी मुले वाटत होती. त्यातल्या एकाने सांगितले, ‘माझे लग्न ठरलं, पण मी कधी ‘ते’ केलं नव्हतं. बायकोबरोबर आपल्याला ‘ते’ करता येईल का, जमेल का, जमलं नाही तर तिच काय मत होईल, अशी काळजी वाटत होती. म्हणून मी धीर करून एकदा ‘तिकडे’ (वेश्येकडे) गेलो.’ डॉक्टर म्हणाले, ‘हे मुलांचे नेहमीचं आहे. आपल्या समाजात प्रॉपर सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) नसतं. ते जर दिलं गेलं असतं तर ही मुलं कशाला तिकडे गेली असती?’

सेक्स एज्युकेशन हा आता आजपर्यंत लोकांना हास्यास्पद विषय वाटत होता, पण ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या अभावाने अशा नवरा-बायकोच्या किती जोड्या एका जीवघेण्या प्रवासाला निघत असतील! या क्षेत्रातले एक जण म्हणत होते, ‘या एड्समुळे आता लोकांना सेक्स एज्युकेशनची आठवण होऊ लागलीय.

आम्हाला शाळाशाळातून बोलावणी यायला लागलीत. पुर्वी आम्ही त्यांच्या मागं लागायचो, तरी प्रतिसाद नसायचा.

एड्स आणि वेश्या हे पहिल्यापासून बनलेले समीकरण आहे. एड्सचा सगळा दोष त्यांच्यावरच टाकला जातो. विजयताई लवाटे या वेश्यांमध्ये बरीच वर्षे काम करतात. त्या म्हणाल्या, ‘त्या मुलींच्या (वेश्यांच्या) शरीरात एड्स काही आपसूक तयार नाही झाला. कुणीतरी पुरूषानंच तिला दिलं आहे. मग तिला का दोष देता?’

डॉ. रमेश गौड नावाचे डॉक्टर नाशिकला एड्स क्षेत्रात काम करतात. त्यांच्या एका कार्यकर्त्याबरोबर गंजमाळ भागातल्या वेश्या वस्तीत गेलो होतो. एका बसस्टॉपच्या मागे खूप घाण साठलेली होती. तिथल्या एका भिंतीवर चढून परत उतरलो तो एका झोपडीतच. त्या वस्तीत कुठूनही जा, असे उतरूनच जावे लागते, ती सगळी वस्ती म्हणजे अनेक छप्परांनी बनलेल्या एका छपराची, अंधारी वस्ती आहे. या झोपड्या एकमेकांना सलग दाटीवाटीने तयार झालेल्या. आत सगळ्या वेश्या. आम्हाला बसायला जागा नव्हती. तसेच कसेतरी बसलो.

ज्या बाईकडे गेलो होतो, ती एक हसरी, बोलकी, तरूण सावळी मुलगी होती. ती इतर मुलींना कंडोम वापरायला उद्युक्त करते. डॉ. गौडांच्या कार्यकर्त्याबरोबर काम करते. तेवढ्यात आतून पन्नाशीची जाड बाई आली आणि तिला ‘तु कुठं होतीस रात्रीची, का उशीर केलास, ती व इतर मुली क्षीणपणे आमच्याकडे बोट दाखवून ‘हे साहेब आलेत’ वगैरे सांगण्याचा प्रयत्‍न करू लागल्या, त्यावर त्या बाईने ‘कसले सायब, मला माहित नाही.’ म्हणून जवळची केरसुणी मुठीकडच्या भागाने तिला बडवबडव बडवले. आम्ही सुन्न होऊन उभे राहिलो. ती आधीची तरतरीत मुलगी आत लहान मुलीसारखी गुडघ्यात मान घालून ऊं ऊं ऊं करीत रडू लागली. आम्ही निरोप न घेताच परतलो.

पुण्यात व्यवसाय करणारी ‘ज्युली’ नावाची गोव्याहून आलेली अशीच काळी, शिडशिडीत मुलगी भेटली होती. ती स्वतः ‘पॉझिटिव्ह’ आहे. तिला लहान मुलगी आहे. तीही पॉझिटिव्ह आहे. ससूनच्या आवारात ‘साफोश’ नावाची अनाथ मुलांची संस्था आहे. तिथं तिला ठेवलं आहे. ज्युलीताई म्हणाल्या, ‘दुपारी मेक‍अप करून चारला खाली जाऊन उभं राहायचं ते पहाटे चारपर्यंत. वर यायचं ते गिर्‍हाईक घेऊनच यायचं. तहान लागली म्हणून चोरूनमारून पाणी प्यायला वर आलं आणि घरवालीनं पाहिलं, की ती तोंडानं शिव्यांचा पट्‍टा सुरू करते. कधी कधी मारहाणही करते.’

‘तुम्ही गिर्‍हाइकाला कंडोम वापरायची सक्ती करता का?’
‘आम्ही सांगून पाहतो. ऐकलं तर ठीक. त्या कारणानं गिर्‍हाईक परत गेलेलं घरवालीला चालत नाही. परत शिव्या, मार खायला कुणी सांगितलयं? त्यापेक्षा नाही कंडोम तर नाही.’

मी डॉक्टर आहे समजताच त्या म्हणाल्या, ‘डॉक्टर, कधी येणार आहे या रोगाचं औषध? ही बिमारी लवकर हटवा ना.’
मला त्यांच्या अनाठायी विश्वासाचे नवल वाटले. पुधे म्हणाल्या, ‘काहो, दारू पिणं या बिमारीला चांगलं असतं का वाईट?’
‘वाईट. कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल. शक्यतो टाळलं तर बरं. शक्य आहे का ते?’
बोट हनुवटीला टेकवून मान हलवत म्हणाल्या, ‘कसं शक्य आहे? प्रत्येक गिर्‍हाईक येतं ते बाटली घेऊन. प्यावीच लागते. नाही म्हटलं तर गिर्‍हाईक बिघडतं, पुढे म्हाणाल्या, ‘मला माझ काही वाटत नाही हो. मी मरायला तयार आहे. पण माझ्या पोरीचं काय होणार हो?’

‘साफोश’ ची कौन्सेलर कल्याणी तिथे उभी होती. ती म्हणाली, ‘आमच्याकडे अनाथ मुलं येतात ना, त्यांना एका विशिष्ट वयापर्यंतच आम्ही सांभाळू शकतो. हीची बेबी पॉझिटिव्ह आहे. तिचं काय करायचं तो प्रश्नच आहे. मुलं दत्तक घ्यायला कुटुंब येतात. त्यांना पॉझिटिव्ह बेबी देता येत नाहीत. अलीकडे उघड्यावर सोडून दिलेल्या मुलांमध्ये पॉझिटिव्ह मुलांचं प्रमाण खूप आहे. त्यांचं काय करायचं, हे समाजानंच आम्हाला सांगावं.’

पॉझिटिव्ह लोकांची भरतातील पहिली असोसिएशन पुण्यात सुरू झाली. पिंकू नावाचा तीस-पस्तिशीचा गोरा तरूण ती चालवत असतो. तो म्हणाला, ‘या वेश्यांचे फार प्रॉब्लेम आहेत. सरकारतर्फे कंडोम फुकट मिळतात. काही सेवाभावी संस्था वेश्यांना कंडोमचे बॉक्स देताना फोटो काढून घेतात. पेपरमध्ये त्यांना प्रसिध्दी मिळते. त्यांच्या संस्थेला फॉरेनचे पैसेही मिळतात, पण ती बाई ते कंडोम वापरते का, हे कोणीच पाहत नाही. मी एकदा माझ्या अशाच एका बहिणीकडे (पॉझिटिव्ह बाईकडे) गेलो होतो. तिनं कॉटखाली बोट दाखवून मला कंडोमचे बॉक्सच्या बॉक्स दाखवले. म्हणाली, ‘दादा, लोक हे देतात. आम्ही ठेवून घेतो. पण गिर्‍हाईक नाही म्हणतात. मग वापरायची कशी, ते सांग तू.’ मला त्या किळसवाण्या देसणार्‍या स्त्रियांची अगतिक्ता स्पर्शून गेली. त्या कुणाला हा रोग द्यायचं थांबवूच शकत नव्हत्या आणि तो रोग कुणाकडून घ्यायचंही थांबवू शकत नव्हत्या.

पिंकू म्हणाला, ‘परवा अशाच एका पॉझिटिव्ह बहिणीकडे गेलो. ती मुडात नव्हती. मी विचारलं, ‘काय झालं’ तशी ती म्हणाली, ‘काय सांगू दादा. काल मी सहा गिर्‍हाईकं केली. समद्यांना मी कंडूम दाखवले, पण सगळं नाही म्हणाले. आता एका दिवसात मी सहा लोकांनास मरणाची वाटच दाखवलीना. ते हा रोग त्यांच्या बायकांना देणार. किती जणांच्या हत्येचे पाप माझ्या डोक्यावर. काल राती अन्नपण गेलं नाही पोटात.’ असं म्हणून मुळूमुळू रडायला लागली. मी तिला समजावलं- ‘हे बघ ताई, तू तुझं सांगायचं काम केलं ना, आता त्यांनी ऐकलं नाही, त्याला तू काय करणार?’ तरी ती म्हणत राहिली, ‘पण पाप माझ्याच डोक्यावर बसणार.’ आता कसं समजावूनं सांगायच तिला?’

समजा, कंडोम वापरायला गिर्‍हाईक तयार झाले, तरी पुढे अनेक धोके ठेवलेलेच आहेत. ते गिर्‍हाईक दारू पिऊन आलेले असले तर कंडोम नीट चढवता येत नाही. कंडोम थेटपर्यंत उलगडत न्यावा लागतो. चढवताना कंडोम फाटतो. ती कृती झाल्यावर तो कंडोम हळूहळू काढून वीर्य अडकलेल्या भागाला गाठ मारून ते कचरापेटीत फेकून द्यावे लागते. ते या दारू प्यायलेल्या अवस्थेतल्या गिर्‍हाईकाला जमत नाही.


पिंकू म्हणाला, ‘सरकार कंडोम फुकट देतं - आम्ही तुमच्यावर उपकार करतो अशा भावनेनं, पण कंडोम कसे असतात? सगळा वशिलेबाजीचा निकृष्ट माल. ती सरकारी पॅकबंद खोकी ऑस्ट्रेलियाला एका संस्थेकडे तपासायला पाठवली, तर त्याचा रिपोर्ट आला, ‘८० टक्‍के कंडोम बेकार होती.’ आम्ही खूप आरडाओरडा केला तेव्हा आता दर्जा बरा आहे पहिल्यांदा वंगण म्हणून पावडर वापरायचे त्यांन आतल्या भागावर रॅश यायचा. त्याविषयी ओरड केली तेव्हा आता जेलीचं वंगण असलेलं कंडोम यायला लागलेत.’ ‘नुसत्या शरीरसंबंधाने रोग दुसर्‍याला मिळतो, तर शरीरात होणारे द्राव मिसळले तर - मग ते वीर्य असेल, रक्त असेल, ‘नारी’वाले डॉ. संजय मेहेंदळे सांगत होते. ‘नुसत्या सेक्समधून रोग जाण्याची कार्यक्षमता १ टक्‍का आहे, पण गुप्त रोग असतील तर ती एकदम ५ टक्‍के वाढते.’

‘फक्त १ टक्‍का? मग घाबरण्याचं एवढं कारण काय?
डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘गुप्त रोगांचं प्रमाण आपण खूप कमी केलं, तर एड्सचा प्रसार पाच टक्‍क्यांनी खाली येऊ शकू. ही काही कमी अचीव्हमेंट नाही.’

‘पण करणार कसं ते?’
‘या वस्त्यांमधून चांगले दवाखाने काढा. चांगली औषधं, रिगरस अपचार केले. तर गुप्तरोगांचं प्रमाण सहज खाली येऊ शकेल.’

वेश्यामधलं पॉझिटिव्ह असायचं प्रमाण दिवसेदिवस वाढत चाललंय. मुंबईला ८६ मध्ये एक टक्‍का वेश्या पॉझिटिव्ह होत्या त्या ८८ मध्ये, ८ टक्‍के झाल्या. ९१-९२ मध्ये त्या ३४ ते ४१ टक्‍के होत्या. आता ९६ मधला अंदाज ५५ ते ६० टक्‍के इतका आहे.

वेश्यामध्ये नुसते ‘कंडोम वापरा’ असा प्रचार करून कसे चालेल? त्यांची जगण्याची प्रत सुधारल्याशिवाय प्रचाराचा उपयोग होणार नाही. ‘नारी’चे शुक्रवार पेठेत वेश्यावस्तीत जे कौन्सिलिंग सेंटर आहे. तिथे काम करणारा एक कार्यकर्ता सांगत होता, ‘आम्ही त्यांना सांगायला जातो, असा असा रोग आहे. त्याचा जंतू शरीरात गेल्यावर दहा वर्षानी मरण येतं, त्यासाठी निरोध वापरा.’तर त्या म्हणतात, दहा वर्षांनी ना? इथं माझा धंदा नाही झाला, तर मी उद्याच उपाशी पडून मरंल. ते दहा वर्षाचं राहू दे.’ यांना कसं समजावून सांगायचे?’

शरीरसंबंधातून रोग दुसर्‍या माणसास मिळण्याची शक्यता एक टक्‍का असते, तर पॉझिटिव्ह रक्ताची बाटली दुसर्‍यास दिली तरी ती ९० टक्‍के शक्यता होते. काहींच्या मते ती १०० टक्‍के आहे. एकमेकांच्या शरीरातल्या व पदार्थाचा संपर्क आला की हे व्हायरस दुसरीकडे जाऊ शकतात. रक्त, लिंफनोड्स इथे व्हायरस जास्त असतात. पण वीर्यात किंवा योनीतल्या द्रावात कितीसे येणार? म्हणून तितकी शक्यता कमी होते. तिन लिटर लाळेमध्ये एखादा व्हायरस, इतके लाळेत प्रमाण आहे. म्हणून चुंबनामार्फत रोग मिळण्याची शक्यता त्याहूनही कमी. सर्वात लवकर म्हणजे रक्तातून जाणार. न्हाव्याकडे, सलूनमध्ये ब्लेडमार्फत जाईल असे काहींना वाटते, पण तशा केसेस अजून नोंदल्या गेलेल्या नाहीत. कारण एकाला जखम होणार, मग तो वस्तारा न धुता, न पुसता तसेच ताजे न साकळलेले रक्त वस्तर्‍यावर असताना दुसर्‍यास जखम करून त्यात ते रक्त मिसळले गेले पाहिजे. परत त्या थेंबात तो व्हायरस असला तर तो दुसर्‍याच्या शरीरात जाणार. कारण रक्ताची बाटली चढवतो त्यात ३०० सीसी रक्त असते.

काही जण विचारतात, ‘रोग्याच्या शरीरावरचा डास आपल्याला चावला तर पसरेल का हा रोग?’ तसे होत असते तर एव्हाना सगळे जग मरून गेले असते. डास रक्त शोषतो, पोटात त्याचा ब्रेकडाऊन करून त्याच्यापासून प्रोटिन्स मिळवतो आणि ती पुनरूत्पादनासाठी वापरतो, आधी तो रक्त घेणार किती, तर पाव थेंब. त्यात व्हायरस असेलच तर ते या बेकडाऊनमध्ये शिल्लकच राहत नाही. त्यामुळे डासामार्फत रोग पसरल्याची एकही केस नोंदली गेलेली नाही. पण रक्ताची बाटली चढवल्यामुळे तर असंख्य लोक या रोगाला बळी पडलेत. सगळ्यात दुर्दैवी लोक म्हणजे हिमोफिलिया किंवा थॅलेसिमिया या आनुवंशिक आजाराने ग्रस्त असलेले लोक. हिमोफिलियावाल्यांचे रक्त साकळू शकत नाही. त्यामुळे रक्तस्त्राव झाला, की तो होतच राहतो. अशांना वरचेवर रक्त घेण्याची गरज भासते.

थॅलेसिमियावाल्यांच्या शरीरात पुरेसे रक्त बनू शकत नाही. त्यामुळे ठराविक काळाने दुसरीकडून रक्त नाही घेतले तर ते जगूच शकणार नाहीत. या दुषित रक्ताचे पहिले बळी तेच होते. बिचारे आधीच एक असाध्य व्याधीशी सामना करीत होते. त्यात ही आपत्ती! आणखी असेच एक बळी म्हणजे डयलिसिसवरचे लोक. किडनीच्या रोग्यांना काही ठराविक काळानंतर टायलिसिस रोग्यांना काही ठराविक काळानंतर डायलिसिस करून घ्यावेच लागते. नाही तर शरीरातली दुषित द्रव्ये साठवून माणूस मरतो.

डायलिसिसच्या यंत्रात सर्व रक्त फिल्टर करून परत शरीरात येते. यातले फिल्टर वेळच्या वेळी बदलले नाहीत तर तिथून पुढच्या येणार्‍या माणसास व्हायरस मिळाल्याची उदाहरणे आहेत. आता अनुभवाने काही ठिकाणी पॉझिटिव्हवाल्यांचे वेगळेच मशिन ठेवलेले असते. माझ्या ओळखीच्या माणसाचे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरशन झाले. त्यासाठी सर्वांनी काही लाख रूपये उभे केले आणि त्यामार्फत त्याला एड्स व्हायरस पोचले. देणारा आणि घेणारा दोघेही आता हयात नाहीत. हे सर्व एड्सच्या सुरवातीच्या काळात घडले. तेव्हा टेस्ट करणे एवढे सर्रास नव्हते.

आता टेस्ट निघाल्या आहेत. पण रक्ताच्या पिशवीवर नुसता टेस्ट केल्याचा शिक्‍का मारून पिशवी तशीच दिली तर? आपल्याकडे तर हे सर्रास होतेच आहे, पण एवढ्या कडक शिस्तीच्या जर्मनीत, जपानमध्ये आणि फान्समधल्या ब्लड बॅकांतही हे झालेले आहे. फ्रान्सचा रिपोर्ट वाचला होता. ती ब्लड बँक चालवणारी कंपंनी तोट्यात येत चालली होती. पैसे वाचवण्यासाठी ही टेस्ट न करता रक्त सर्व युरोपभरात कुठे कुठे पेशंटला पाठवले गेले. त्यातून एकशे बावीस का पंचवीस लोकांना हा रोग मिळाला.

आपल्याकडे ८९ मध्ये ही टेस्ट सक्तीची झाली. जुन्या सर्वात स्टँडर्ड समजल्या जाणर्‍या मुंबईच्या रेडक्रॉस ब्लड बँकेत जवळपास काही वर्षे टेस्ट न करता रक्त बाहेर दिले गेले. त्या केसचा तपास झाला, त्यात मुंबई पोलिसामधले डी. सी. पी. हेमंत करकरे सहभागी होते. ते म्हणाले, ‘ती ब्लड बँक म्हणजे निव्वळ बजबजपुरी होती. स्टाफवर मॅनेजमेंट कंट्रोलच नव्हता. मॅनेजमेंटमध्ये बहुतेक वृध्द. आम्ही रजिस्टर्स पाहिली. रक्ताच्या नोंदी होत्या पण टेस्ट केल्याचे कॉलम रिकामे. रक्त पुढे कुठं दिलं गेलं त्याचे कॉलम रिकामे. तपासातून असं कळलं, की रक्तदान कार्यक्रम व्हायचे, पण कित्येक पिशव्या स्टाफमधले लोक विकायचे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता, याही प्रकरणात शेकडो बाटल्या दुषित रक्त पेशंटला दिलं गेलं असावं, असा अंदाज आहे परवा जसलोकसारख्या श्रीमंताच्या हॉस्पिटल मधल्या बँकेतही तोच प्रकार. (आपले एफ. ए. फूड अँड ड्र्ग ऍडमिनिस्टेशन अत्यंत कार्यक्षम रितीने हे प्रकार उघडकीला आणत आहे.) ती बँक बंद करायचा हुकूम झाला. आता तो हुकूम परत फिरवला गेल्याचं कळलं.’

नाशिकच्या डॉ. गौडांनी याचा खूप अभ्यास केलाय. ते म्हणाले, ‘अधिकृत ब्लड बँकापेक्षा अनधिकृत ब्लड बँकाची संख्या खूपच जास्त आहे. डॉक्टर रक्त मिळवतात, आवश्यक ती केमीकल घालून फ्रीजमध्ये ठेवतात आणि काही डॉक्टरांना फोन करून ते रक्त खपवतात.’

‘खपवतात म्हणजे?’
‘या क्वॅक डॉक्टरांची छोटी छोटी हॉस्पिटल्स असतात. त्यांना फोन करतात. ‘अरे, तुझी ऑर्डर बरेच दिवसांत नाही आली? सध्या अमक्या ग्रुपच्या बाटल्या आहेत, बघ कुणी घेणार असलं तर?’ मग तो त्याच्या ऍनिमिया झालेल्या पेशंटपैकी कुणाला तरी घाबरवतो. रक्ताची बाटली चढवली नाही तर खरं नाही. त्यासाठी दोन दिवस ऍडमिट करून हजार रूपये बिल करता येतं, रूमही भरल्या जातात. वास्तविक ऍनिमियासाठी एक बाटली रक्त देण्याचा काही उपयोग नसतो. हिमोग्लोबिन काही दिवस वाढतं. परत रक्त पूर्ववत होतं. ऍनिमियाचं कारण दूर करायला पाहिजे ते करत नाहीत.’

त्यांनी काही चार्ट दाखवले. म्हणाले, ‘आपल्या देशात ब्लड बँकांमधून जमा होणारं ७० टक्‍के रक्त ऍनिमियासाठी दिलं जातं. त्याचा काही उपयोग नसतो. उरलेलं ऍक्सिडंटमध्ये, सर्जरीमध्ये. आपल्या देशाची ब्लड पॉलिसी अशी आहे, की ब्लड हे कमीत कमी दिलं जावं. ब्लड जितकं कमी द्याल, तितका एड्स व्हायरस पसरण्याचा धोका कमी होणार. शेवटी रक्त हे एक जीव वाचवणारं औषध आहे. त्याचा जपूनच वापर केला पाहिजे.’

नाशिकमध्ये विनापरवाना खासगी ब्लड बँकांचे बरेच प्रस्थ असल्याचे आधीच माहित होते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राकडे नाशिकहून येणारे ड्रग ऍडिक्ट पेशंट सांगायचे, ‘जेव्हा पैसे उभे करायचे सगळे रस्ते बंद व्हायचे, तेव्हा मग आम्ही अमक्या डॉक्टरकडे जायचो. तो रक्त घ्यायचा. त्याचे पंचवीस रूपये मिळायचे. एका पुडीची (गर्दच्या पुडीची) सोय व्हायची. हे पेशंट आधीच दुबळे. यांचे रक्त घेणारे कोण हे डॉक्टर? चौकशी केली तेव्हा समजले, की असे इथे बरेच आहेत. फक्त फ्रीज एवढेच त्यांचे भांडवल. कसले चेकिंग नाही, कुठल्या टेस्ट नाहीत. त्यांना असलेल्या जुजबी माहितीवर हा धंदा चाललेला. इतरांच्या रक्तावर जगणारी आणि अनेकांच्या जीवाशी खेळणारी एक जमात पहायला मिळाली, आणि तीही सुशिक्षित!

रक्त साकळू नये म्हणून त्यात अँटी-कोयाग्युलेट्स घालावी लागतात. तरीही रक्त हे वीस दिवसांनी (आणि काही अँटी-कोयाग्युलेट्स वापरली तर पस्तीस दिवसांनी) फेकून द्यावं लागतं. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला खुप लोक रक्तदान करतात आणि नंतरचे पंधरा-वीस दिवस ब्लड बँकांमध्ये रक्ताचा महापूर असतो. जनकल्याण रक्तपेढींचे डॉक्टर दिलीप वाणी हे या क्षेत्रातले उत्साही कार्यकर्ते. ते म्हणाले ‘त्यापेक्षा लोकांनी आपापल्या वाढदिवसाला रक्तदान करावं, म्हणजे वर्षभर सतत पुरवठा होत राहील.’ डॉ. गौडांचे म्हणणे, ‘रक्तदान मोहिमा राबवण्यापेक्षा एखाद्या संघटनेनं रक्तदात्यांची यादी करावी. ते हुकमी लोक असले पाहिजेत. त्या त्या ब्लडग्रुपच्या रक्ताची मागणी आली, की संघटनेनं त्यांच्या यादीतल्या त्या ब्लडग्रुपच्या माणसाला ब्लड बँकेत पाठवायचं. असं नेटवर्किंग केलं तर ती सर्वात योग्य व्यवस्था होईल.’

दिलीप वाणी म्हणाले, ‘करता येणं अवघड आहे. कारण सरकारनं व्ही. डी. आर. एल. (गुप्त रोगांच्या जंतूसाठी), ऑस्ट्रेलियन अँटिजेन, (लिव्हरच्या जंतूसाठी), एलायझा (एड्ससाठी) अशा टेस्ट कम्पसरी केल्या आहेत. त्यांना मध्ये अवधी मिळाला पाहिजे.’

एड्सग्रस्त रक्तासाठी सरकारची एक विचित्र पॉलिसी आहे. घेतलेल्या रक्तापैकी (एड्ससाठी करावी लागणारी) एलायझा पॉझिटिव्ह आली, तर त्या रक्तदात्याशी संपर्क साधून त्याला या निदानाची कल्पनाद्यायची नाही. ते रक्त फेकुन देऊन मोलळं व्हायचं. ‘नॅको’ या अखिल भारतीय पातळीवरच्या सरकारी यंत्रणेच्या डॉ. सेनगुप्तांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘आमच्याकडे टेस्टच्या आधी आणि नंतर कौंन्सिलिंग करावं लागतं, (पेशंटला रोगाचं स्वरूप, घ्यावी लागणारी काळजी हे समजावून द्यावं लागतं.) ते करायची यंत्रणा नाही.’

दिलीप वाणी म्हणाले, ‘स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करणारा वर्ग म्हणजे किती वेगळा वर्ग! हे सगळे सामाजिक कामांची आवड असलेले! पण त्यात आता जवळजवळ पाच टक्‍के रक्त असं दुषित निघू लागलंय.’ म्हणजे तितके लोक आपापल्या बायकांना हे व्हायरस देत राहणार. त्यात परत त्यांना स्वतःलाही कल्पना नाही, की आपण पॉझिटिव्ह आहोत. आणि कौन्सिलिंगची यंत्रणा अशी काय विशेष गोष्ट असते? तिथल्या डॉक्टर, नर्स, सोशल वर्कर्सना दोन-चार दिवसांचे ट्रेनिंग दिले तरी ते तयार होतील. तेही करायचे नसले, तर एवढ्या स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात उतरल्यात, त्यांच्यावर एकेक बँक सोपवा. पण हे होत नाही.

दिलीप वाणी म्हणाले, ‘रक्ताचा वापर आणखी कमी करायचा असेल, तर तेवढाच ब्लड प्रॉडक्ट पुरवला जावा. उदा. भाजलेल्या पेशंटला फक्त प्लाझ्मा लागतो. हिमोफिलियावाल्यांना फॅक्टर आठ लागतो, तर कुणाला पॅक सेल्स लागतात. पण तसं करायचं तर जागा, मशिनरी, पैसा लागतो.’

नाशिकच्या डॉ. गौडांनी याचा खूप अभ्यास केलाय. ते म्हणाले, ‘अधिकृत ब्लड बँकापेक्षा अनधिकृत ब्लड बँकाची संख्या खूपच जास्त आहे. डॉक्टर रक्त मिळवतात, आवश्यक ती केमीकल घालून फ्रीजमध्ये ठेवतात आणि काही डॉक्टरांना फोन करून ते रक्त खपवतात.’

‘खपवतात म्हणजे?’
‘या क्वॅक डॉक्टरांची छोटी छोटी हॉस्पिटल्स असतात. त्यांना फोन करतात. ‘अरे, तुझी ऑर्डर बरेच दिवसांत नाही आली? सध्या अमक्या ग्रुपच्या बाटल्या आहेत, बघ कुणी घेणार असलं तर?’ मग तो त्याच्या ऍनिमिया झालेल्या पेशंटपैकी कुणाला तरी घाबरवतो. रक्ताची बाटली चढवली नाही तर खरं नाही. त्यासाठी दोन दिवस ऍडमिट करून हजार रूपये बिल करता येतं, रूमही भरल्या जातात. वास्तविक ऍनिमियासाठी एक बाटली रक्त देण्याचा काही उपयोग नसतो. हिमोग्लोबिन काही दिवस वाढतं. परत रक्त पूर्ववत होतं. ऍनिमियाचं कारण दूर करायला पाहिजे ते करत नाहीत.’


पिंकूला व्हायरस रक्तातून मिळलाय. लग्नानंतर एक-दोन वर्षातच त्याला मोटारसायकलचा अपघात झाला, तेव्हा तर टेस्टिंग सक्तीचे नव्हते. आरोग्यासाठी नंतर एकदा त्यानं रूटीन टेस्ट करून घेतल्या. त्यात हे निघाले. बायकोला कसे सांगावे, या कल्पनेने जवळपास आठ महिने त्याने निराशाग्रस्त मनःस्थितीत काढले. शेवटी सांगितले, पण बायकोने ते चांगल्या रितीने घेतले.

तो म्हणाला, ‘दादा, (तो मला दादा म्हणतो) काय सांगू या ब्लड बँकांची हालत. बर्‍याच बँकांमध्ये अनट्रेड स्टाफ असतो. मुलं, मुली पकडून आणतात. ‘हे यात घालायचे, ते त्यात घालायचं, हं आता करा काम सुरू,’ असं चाललंय. त्यांना पगारपण खूप कमी. ते कसलं काम करणार हो? त्यांना काय कशाचे परिणाम माहित असतात का? सरळ टिकमार्क करून टाकतात. पिशवीवर छाप लावला, की चालली पिशवी पुढे. बँका चालवणारे काही काही लोकही तसलेच. एक टिकमार्क केला, की शंभर रूपये वाचतात ना, मग करा तसंच.’

मी हादरलोच! विचारले, ‘मग कुठली ब्लड बँक चांगली आहे? नाव सांगता का?’
तो म्हणाला. ‘मला कुणाचे नाव घ्यायला सांगू नका. काही बँका चांगल्याही आहेत, पण या भारतात कुणा माणसाच्या प्रामाणिकपणाची कुणी गॅरंटी घेऊ शकतं का? हा तर साधा टेक्निशियन. वरपर्यंत म्हणजे अगदी पंतप्रधानापर्यंत आपण कुणाची गॅरंटी घेऊ शकतो का?’

या प्रश्नाने मी थिजलोच!
तो पुढे म्हणाला, ‘रक्ताचासुध्दा काळाबाजार चाललाय. काही ब्लड बँकामध्ये नातेवाईक ब्लडसाठी गेलां, की विंडो क्लार्क सांगतो, ‘या ग्रुपची बाटली शिल्लक नाही आणि दुसर्‍या कुठल्याच बॅकेत नाही. आत्ताच फोन करून आम्ही विचारलंय.’ मग तो निराश होऊन बाहेर पडतो. तिथंच बाहेर बसलेला एजंट त्याला गाठतो.

आपल्याकडे आहे एक माणूस त्या ग्रुपचा. पाहिजे का? माणसं डेस्परेट झालेली असतात. म्हणतात, ‘आण बुवा. कितीही पैसे घे, दे आणून.’ त्याच्या टेस्ट करायचा प्रश्नच नसतो. परवा माझ्या नातेवाईकाचं ऑपरेशन होतं. मी त्याला सांगितलं होतं, की सलाईनवर भागव. मेलास तरी चालेल, पण ब्लड लावू नकोस.’

असे रक्तावाचून काही वेळा भागूही शकेल, पण काही ठिकाणी रक्ताशिवाय चालतच नाही. अपघात झालाय, खूप रक्तस्त्राव झालाय, तेव्हा ताबडतोब रक्त मिळणे आवश्यक असते. तरच प्राण वाचतो. लोकांची रक्तदान करण्याची वृत्ती कमी होत चाललीय, ही चिंताजनक गोष्ट आहे. लोकांनी इतरांसाठी नियमीत रक्तदान केले पाहिजे. ब्लड बँकांनी जबाबदारीने टेस्ट करून योग्य रीतीने वाजवी किमतीत पेशंटला ते पुरवले पाहिजे. असे झाले तरच हे सगळे गाडे सुरळीत राहील.

‘माय ओन कंट्री’ पुस्तकात एका जॉन्सन नावाच्या, त्या गावातल्या प्रतिष्ठित, उत्साही, धार्मिक माणसाची हकीकत आहे. त्याच्या हार्ट सर्जरीत भरपूर बाटल्या रक्त दिले गेले. त्यातने त्याला एड्स व्हायरस मिळाला. त्या वेळी त्याला कोणीही सांगितले नाही. त्याच्यामुळे त्याच्या बायकोला. हे सारे घडलेय ते अमेरिकेसारख्या संपन्न देशात!

इथून पुढे तर अशी नवनवीन टेक्निक्स असलेली ऑपरेशन येत राहणार. सर्जनने ऑपरेशन कितीही चांगले केले तरी उपयोग काय? आधी हा पाया मजबूत नको का करायला?

जगात एड्स पसरलेला आणखी मोठा वर्ग म्हणाजे ड्रग ऍडिक्टसचा. पुढारलेल्या देशात गर्दची म्हणजे हेरॉइनची पावडर शुध्द स्वरूपात मिळते. ती पाण्यात विरघळू शकते. म्हणून तिथले व्यसनी आपल्या शिरेत इंजेक्शन देऊन ते घेतात. मी हॉलंडमधल्या ऍम्स्टरडॅम शहरात हे स्वतः पाहिलंय. वरून खिडकीतून पाहिल्यास खाली रस्त्याच्या कडेकडेने हे स्त्री-पुरूष बसलेले दिसत. एक सिरिंज भरून एक जण शिरेत घ्यायचा. ती काढून तशीच सिरिंज त्याची मैत्रीण (किंवा मित्र) आपल्या शिरेत टोचून घ्यायची या मार्गाने रोग जाण्याची शक्यता १५ ते २० टक्‍के इतकी असते. त्यामुळे अमेरिकेत काळे लोक ड्रग ऍडिक्ट खूपच. तेच आता एड्स पेशंटस, असे समीकरणच झले आहे.

मुक्तांगणमध्ये येणारे ड्रग ऍडिक्ट हे गर्द सिगारटमध्ये घालून ओढणारे किंवा चेसिंग म्हणजे गर्दची वाफ ओढणारे लोक आहेत. कारण इकडे मिळणारे गर्दची पावडर ही अशुध्द म्हणून पाण्यात न विरघळणारी. हे चित्र महाराष्ट्राचे आणि बहुतेक भारताचे. त्यामुळे त्या समीकरणातून आपण वाचलो, पण गेल्या काही वर्षात मणिपूर, आसाम, नागालँड इकडचे तुरळक पेशंट मुक्तांगणमध्ये उपचारासाठी येतात. ते मात्र इंजेक्शनमार्फत हेरॉईन घेणारे. कारण तिकडे ब्रम्हदेशच्या सीमेवरून हेरॉइनची शुध्द पावडर आता येऊ लागली आहे. त्यात तिकडल्या आदिवासी समाजात स्त्री-पुरूषांचे शरीरसंबंध हे खूप मोकळे असल्याने त्या रोगाने कुटुंबेच्या कुटुंबे, गावे एड्सग्रस्त झली आहेत.

त्या भागातून एक मुलगा मुक्तांगणमध्ये उपचार घेऊन बरा झाला. तो पॉझिटिव्ह आहे, पण आहे तब्येतीने चांगला तगडा. तो आता नेहमी घरी येणारा माणूस झाला आहे. त्याला विचारले, ‘तुला कुठल्या मार्गानं मिळालं हे व्हायरस?’
तो म्हणाला, ‘तसं सांगता येत नाही. सिरिंजमधूनही असेल. मला गर्लफ्रेंड होत्या, त्यांच्याही मार्फत असेल.’

‘परिस्थिती चांगली होती, मग तुम्ही दर वेळी वेगळी सुई का वापरत नव्हता?’
‘अंगावर नीडल - सिरिंज आम्ही ठेऊ शकत नव्हतो. कधी पोलिसानं हटकलं, झडती घेतली आणि जर सिरिंज सापडली, तर ते आत लॉक‍अपमध्ये टाकायचे. माल आलाय कळल्यावर आम्ही घाईघाईनं तिकडं जायचो. तिथं असेल ती सिरिंज-नीडल वापरणं भागच असायचं. आणि खरं सांगू का, त्या ड्रगमधून नशेत कसली शुध्दच नसायची.’

मला परवा मुंबईहून आलेला मित्र सांगत होता. बोरीबंदर स्टेशनच्या बाजूच्या गल्लीत बरेच लोक असे शिरेतून ड्रग्ज घेताना त्याने पाहिले. म्हणजे हे ईशान्य भारतातले लोण इथे पोचायला सुरूवात झालीच.

वीर्य आणि रक्ताव्यतिरिक्त रोग पसरायचा आणखी एक मार्ग म्हणजे, आईकडून मुलाला गर्भाशयातच हा रोग मिळू शकतो. आईचे रक्त गर्भाशयातल्या मुलांकडे जाते. त्यातून व्हायरस जातो का याचे कोडे आहे. काही संशोधक म्हणातात, गर्भाशयातच ते व्हायरस मिळतात. काही म्हणतात, मुलाचा जन्म होताना आईच्या योनिमार्गावर ज्या छोट्या मोठ्या जखमा होतात त्यातून ते पास होतात. पण एक बरी गोष्ट म्हणजे, असे होण्याची शक्यता ३० टक्‍के असते. म्हणून पॉझिटिव्ह बाई गर्भात राहिल्यावर तिला डॉक्टर ही परिस्थिती समजावून सांगतात. आणि निर्णय घ्यायला सांगतात. हे मुल वाढू द्यायचे की गर्भपात करायचा हा निर्णय त्यांचा. झिबांबेमधल्या एका पॉझिटिव्ह बाईचे वाक्य वाचलं, ‘मला मुल पाहिजे. कशावरून त्याला हा रोग मिळेल? मी त्यला चांगलं सांभाळीन त्याची काळजी घेईन.’ ते वाचल्यावर वाटलं, आपण अशा कुठल्या बाईला मूल होऊ न देण्याचा सल्ला सहजपणे देऊ शकतो, पण मातृत्वाची ओढ कुणाची कुणला थांबवता येते का?

एका कॅनडातल्या पॉझिटिव्ह बाईचे वाक्य वाचले, ‘एकाएकी मरणं ही एक गोष्ट आहे. आणि स्वतःपासून झालेल्या पॉझिटिव्ह मुलाची काळजी करत मरणं ही दुसरी गोष्ट आहे.’ अशा एकेका वाक्यात जे दुःख, शोकांतिका दडली आहे, तिची आपल्यल कल्पनाही करता येत नाही.

लहान मुल निगेटिव्ह जन्मले, तरि आईच्या अंगावरचे दूध पीत असले तर त्यातून व्हयरस जाऊ शकतो.

स्तनपानाला उत्तेजन देणारे धोरण जागतीक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) होते. त्यांनी नंतर स्तनपान करू नक., असे धोरण फिरवले. त्यावर टिका झाली. ‘अशानं दुष्काळी, गरीब परिस्थितीतील मुलं उपासमारीन लागलीच मरतील. त्यपेक्षा त्यांना व्हयरस मिळला तरी चालेल.’ अशी टीका झाल्यवर ते धोरण आज परत बदलले आणि पुर्वीचे धोरण जारी झाले.

आफ्रिकेत गावेच्या गावे अशी आहेत, की जिथे फक्त म्हातारे आणि लहान मुले शिल्लक आहेत. कर्ती माणसे एड्सने मेली. म्हातारे तरी का जगले, तर हा रोग आला तेव्हा त्यांचे शरीसंबंधाचे वय होऊन गेलेले होते. अपल्या देशातही एड्समुळे अनाथ मुलांची आणि त्यातल्या त्यात एड्सग्रस्त अनाथ मुलांची असंख्या प्रचंड वाढणार आहे. त्याचे आर्थिक ओझे आपण कसे पेलणार आहोत ते कळत नाही.

कुठली साथ आली, तर सर्वात प्रथम न सांगता उत्स्फूर्तपणे कोणी पुढे व्हायला पाहिजे, तर डॉक्टर व अन्य वैद्यकीय: पेशातील मंडळींनी, या पातळीवर काय चालले आहे?

पिंकूच्या एका पॉझिटिव्ह मित्राला अतड्याचा कॅन्सर झाला. सुरवातीला छोटे पॉलिप होते. तो पुण्यात चार-सहा सर्जनकडे फिरला, पण हा पॉझिटिव्ह म्हणून कोणी केस हातात घेईना. पिंकूने त्याला मुंबईला नेले. तिथे तीन-चार सर्जनानी त्याला नाकारले मधल्या काळात त्याचा कॅन्सर इतका वाढला होता, की तो ऑपरेशच्याही पलीकडे गेला आणि त्यातच तो वारलाही, हेच जर तो पॉझिटिव्ह नसता, आणि कॅन्सर पूर्ण बरा जरी नसता झाला, तरी निदान काही वर्षे त्याला मिळाली असती.

मुक्तांगणमध्ये आता शंभरातले दोन-तीन तसे पॉझिटिव्ह असतात. ते बरे झले तरी त्यांचे पुढचे प्रॉब्लेम्स आम्हाला बघावे लागतात. एक पेशंट आहे. त्याला दाढदुखी झाल्याने तो डेंटिस्टकडे गेला. त्याने आपण पॉझिटिव्ह असल्याचे सांगताच डेंटिस्टने काही तरी कारणे सांगून त्याला बाहेर काढले. आम्ही दोन-तीन डेंटिस्टना फोन करून विचारलं. त्यांनी त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात ते वाचून कळवतो असे म्हटले. परत त्यांचा फोन आला नाही. नंतर हा पेशंट न सांगता कुणा डेंटिस्टकडून दाताचे काम करूनही आला. पेशंट नाकारणार्‍या सर्जन्सना हे कळात नाही, की आतापर्यंत त्यांनी नकळत कितीतरी पॉझिटिव्ह लोकांची ऑपरेशन केली असतील. पण एकदा पॉझिटिव्ह असल्याचा संशय आला, की टेस्ट करून घेतात आणि पॉझिटिव्ह निघाला, की बाहेरचा रस्ता दाखवतात.

सर्जन्सचे म्हणणे असे, की आम्ही जरी ग्लोव्हज घातलेले असले, तरी अपघाताने किंवा टाके घालताना सुईच्या जखमा झाल्याने इन्फेक्शन होऊ शकते. याला काही जण उत्तर देतात की या ‘नीडल प्रिक’ टाळण्यासाठी तुम्ही तंत्राचा थोडा बदल केला तर त्या टाळता येऊ शकतील.

पण तरीही ‘आम्ही का म्हणून धोका पत्करायचा?’ या प्रश्नावर उत्तर असे, की हा व्यवसाय पत्करला म्हणून. आगीचे बंबवाले, पोलीस, सैनिक या प्रत्येकाच्या व्यवसायातले धोके त्या त्या व्यवसायिकांना माहित असतात. ते असे म्हणतात का, की आम्ही जीव का म्हणून धोक्यात घालयचा? आम्हाला बायका, पोरे आहेत.

जगात आतापर्यंत लाखो माणसे या रोगाने मेलीत. त्यात वैद्यकीय व्यवसायातील किती लोक आहेत याची पाहणी झाली. ते फक्त एकशे वीस आहेत. त्यांची कसून पहणी झाली तेव्हा आढळले, की अनेकांना अन्य मार्गानी (शरीर संबंध इ.) व्हायरस मिळालाय.

‘एड्सचे पेशंट मरतात तेव्हा त्यांना वार्डबॉय हात लावायला तयार नसतो. आमच्या ग्रुपला फोन करतात. मग आम्ही येऊन त्यांना उचलतो आणि स्मशानभूमीत नेऊन दफन करतो.’

‘आतापर्यंत किती वेळा असे केलेत?’ ते एकमेकांशी तमीळमध्ये बोलून बोटे मोजू लागले.
शेवटी एकजण म्हणाला, ‘कमीत कमी शंभरेक लोकांचं दफन आम्ही केलं असेल.’

त्यातल्या फक्त बत्तीस लोकांना वैद्यकीय सेवा पुरवताना व्हायरस मिळाला. त्याही यादीत जास्तीत जास्त नर्सेस आहेत. कारण त्या अनेकदा इमर्जन्सीच्या वेळी प्रथम धावून जातात. त्यावेळी त्यांना ग्लोव्हज घालायला किंवा मास्क घालायला वेळ मिळालेला नसतो. किंवा डॉक्टरांपेक्षा ज्ञान कमी पडते. दुसरा नंबर डेंटिस्टचा आणि तिसरा आणि शेवटचा सर्जनचा, ओरड करण्यात मात्र ते पहिले आहेत.

माझ्यासारख्या अनेक जणांना अभ्यसक्रमात एड्स हा रोग नव्हता. कारण त्या वेळी तो उद्भवलेलाच नव्हता. ८५ नंतरच्या डॉक्टरांना तो पुस्तकातून माहित असेल, पण आम्हा डॉक्टरांना एकदा कधी वीस-तीस वर्षापूर्वी डॉक्टरी पस झाल्यावर परत शिकण्याची, रिफ्रेशर्स कोर्स घेण्याची काहीच आवश्यकता वाटत नाही. (त्यांचे थोडेफार शिक्षण होत राहते ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून.) एड्स क्शेत्रात काम करणारा डॉक्टर मित्र सांगत होता, ‘इथल्या इंडियन मेडिकल असोसिएशननं माझं लेक्चर ठेवलं, तर सगळा हॉल रिकामा. जेमतेम दहा-वीस डॉक्टर असतील.’ खरे तर हे रिफ्रेशर्स कोर्स सक्तीचे केले पाहिजेत. त्याच्या फार तर परीक्षा घेऊ नका, पण उपस्थिती तरी सक्तीची करावी आणि तरच पुढे लायसेन्स कंटिन्यू केले जावे.

पुण्यातल्या सर्वात अद्ययावत समजल्या गेलेल्या एका हॉस्पिटलने तर पॉझिटिव्ह लोक सर्जरी करायची नाही, असा दंडकच केला आहे. बर्‍याच आधीपासून ते सर्वांची टेस्ट करून पेशंट पॉझिटिव्ह निघाला, तर सरळ सांगून किंवा काहीही कारणे दाखवून पेशंटला बाहेर काढतात. पुण्यातल्या अशाच एका हॉस्पिटलमध्ये घडलेली एक घटना

हॉस्पिटलमधला वॉर्डबॉय दारूडा होता. त्यात त्याला टी. बी. झाला. तो ऍडमिट होता. तिथे त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. तो तिथला कर्मचारी असूनही नर्सेस, वार्डबॉईजसुध्दा फिरकत नसत. घरच्यांनीही त्याला टाकून दिले. थोडा डोक्यावरही परिणाम झाला, तशात त्याने निराश होऊन चौकात चवथ्या मजल्यावरून उडी मारली. सगळे काय झाले बघायला धावले. रक्ताच्या थारोळ्यात तो तडफडत होता पण त्या हॉस्पिटलमधल्या नर्सेस, वार्डबॉईज कुणी आले नाही. शेवटी तिथे इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थी डॉक्टरांनी स्ट्रेचरवर त्याला घालून इमर्जन्सी रूमकडे नेताना तो गेला.

पिंकू सुरवाती सुरवातीला खूप भडकून उठायचा. त्या काळात तो ससूनला गेला होता. एड्सचा पेशंट आहे असे कळल्यावरून त्याला भेटायला तो गेला. कुठे सापडेना तेव्हा नर्सकडे चौकशी केली. ती याच्यावरच भडकली. त्या पेशंटला कॉटही दिलेली नव्हती. संडासच्या कडेला खाली तो पडलेला होता. हा नर्सशी भांडला. नर्स म्हणाली. ‘यांनी कुठंही शेण खाऊन यायचं, तर आम्ही कशाला यांचं करायचं?’ हा मेडिकल सुपरिटेंडेंटकडे तक्रार घेऊन गेला. त्यांच्याबरोबर हा वॉर्डात आला तर पेशंट कुठे? घालवून दिलेला, हा नर्सला म्हणाला, ‘आज तुम्ही एड्सवाल्याला बाहेर काढताय. लवकरच अशी वेळ येणार आहे, की इथले, या वार्डातले ऐंशी टक्‍के पेशंट एड्सचे असणार आहेत. तेव्हा काय कराल तुम्ही?’

इंजेक्शनच्या सुयांमार्फत हा रोग पसरू शकतो म्हणून डिस्पोजेबल (प्लास्टिकच्या, कंपनीच्या पॅकमध्ये मिळणार्‍या, एकदा वापरून टाकून देता येणार्‍या सिरिंजेस व सुया) वापरा, असा सगळीकडे प्रचार असतो. पण ‘हेल्थ प्लस’ संस्थेचा डॉ. संजय पुजारी म्हणाला, ‘आपल्याकडे टाकून दिलेल्या डिस्पोजेबल सिरिंज कचर्‍यातून वेचून फक्त कागदाचं पॅकिंग चढवून बाजारात आणणारी यंत्रणा जोरात आहे. त्यात एड्सचे विषाणू रहाणार नसले, तरी इतर जंतू रहाण्याची शक्यता खूपच आहे. म्हणून टाकून देताना सिरिंजेस कापून टाकल्या पाहिजेत.’

मी चक्रावलोच. विचारले, ‘मग करायचे काय?’
‘सोपं आहे. घरात असतो तो प्रेशर कुकर घ्यायचा, ग्लास सिरिंजेस, निडल्स आत ठेवून तीन-चार शिट्‍ट्या काढल्या की संपलं. ऑटोक्लेव्ह म्हणजे तरी दुसरं काय असतं?’

सरकारी हॉस्पिटलमधला एक तरूण डॉक्टर सांगत होता, ‘तुम्ही ग्लोव्हज वापरा म्हणता, पण ग्लोव्हजचा पुरवठा तरी कुठं रेग्युलर असतो? आम्ही तेच तेच ग्लोव्हज वापरून ऑटोक्लेव्ह करून त्याची तुकडे पडायची वेळ आली आहे.’

संजय पुजारी म्हणाला, ‘हळूहळू डॉक्टरांची ऍटिट्यूड बदलत आहे. नव्या पिढीचे काही डॉक्टर्स आम्हाला फोन करून कळवू लागले आहेत, की पॉझिटिव्ह केस असली, तरी पाठवा, आम्ही ट्रीट करू.’

या रोगाची वेश्यागमनाशी सांगड घातली गेल्याने त्याला इतरांची सहानुभूती मिळत नाही. हा आपल्या पापाची फळे भोगतोय अशी सर्वांची भावना असते. वेश्याकडे काय आज लोक जातात? तो तर आदिम काळापासून चालत आलेला धंदा आहे. हा व्हायरस आज आला म्हणून हा प्रश्न निर्माण झाला, पण समाजाची वृत्ती मात्र बदलू शकत नाही. याच्या निदानाबाबतची गुप्तता पाळली जात नाही. ही बातमी फुटली की कामावर असेल, तर तिथून हकालपट्‍टी. काही कारखान्यांनी भरतीच्या वेळी एड्सची टेस्ट सक्तीची केली आहे.

वास्तविक केवळ पॉझिटिव्ह आहे म्हणून तो कामाला अपात्र ठरू नये. कारण तो पुढची बरीच वर्षे इतरांसारखे काम करू शकणार असतो. त्याच्यापासून कामावरच्या इतरांना रोग मिळणार नसतो. याउलट टी.बी., लेप्रसी झाला तरी समजून येत नाही, पण ते रोग तो तिथे दुसर्‍याला देऊ शकतो. गल्फ किंवा दुबईला जाताना ही टेस्ट सक्तीची आहे. इथे काहीतरी करून निगेटिव्ह असल्याने सर्टिफिकेट मिळवतात, पण तिकडे पोचल्यावर मुंबईहून आलाय म्हणताच तिथे परत टेस्ट करतात आणि पॉझिटिव्ह आल्यावर इकडे परत पाठवतात. इथे ज्य लोकांना य कारणावरून कामावरून काढून टाकले जाते ते खरे तर बेकायदेशीर असते, पण त्याविरूध्द हा कशी दाद मागणार? आधीच मनाने खचलेला, आणखी कुणाला माहित होईल या भयाने पछाडलेला हा निमूटपणे बाहेर पडतो. ज्या वेळी त्याने चांगले अन्न खाल्ले पाहिजे, त्या काळात काम गेल्यामुळे आणखीनच उघडा पडतो.


कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असते? संजय पुजारी म्हणाला, या सगळ्या वाईटात चांगलं असं, की कुटुंबाची रिऍक्शन फार चांगली असते. ते सगळे एक होऊन पेशंटला सपोर्ट करतात. खर्चाला मागं पाहत नाहीत.’

‘पण मी असं ऐकलं होतं, की ते पेशंटला घरातून काढूनच टाकतात.’
‘अगदी तुरळक घटना. माझ्याकडे शेकडो पेशंट रजिस्टर आहेत. त्यातल्या एक-दोनच घटना अशा आहेत, पण यावर विनया चितळे म्हणाल्या.

‘हे फक्त पुरूषांच्या बाबतीत. घरच्या बाईला वेगळा अनुभव येतो. अमच्या सेंटरवर येणार्‍यांपैकी अनेक बायकांच्या बाबतीत हे झालेलं आहे. एका बाईचा नवरा एड्सनं वारला. उघडच आहे, की त्याच्यापासून तीही पॉझिटिव्ह झालेली होती. दोघांच्याही टेस्ट त्याच वेळी केल्यामुळे हे घरातल्या सर्वांना माहित होते. तो मुलगा गेल्यावर सासू, सासर्‍यांनी सुनेचा छळ सुरू केला. ‘तुझ्यामुळेच आमच्या मुलाला रोग झाला. आमचा मुलगा कुठं वेडवाकडं वागणार नाही.’ असं म्हणून तिला घरातून बाहेर काढलं. आई-वडिलांना तिला घरी ठेवायचं होतं,

पण भाऊ-वहिनींनी विरोध केला. तेव्हा मुंबईच्या लांबच्या उपनगरात एका चाळीत राहणार्‍या मामाकडे तिला ठेवलं. तिथून ती नियमित चेक‍अपला एका जनरल हॉस्पिटलला जायची. तिथं तिला एका वॉर्डबॉयनं पाहिलं. तो त्या मामाच्या चाळीत राहणारा होता. ती एड्स विभागातल्या डॉक्टरांना भेटते हे पाहून त्यानं चाळीत बभ्रा केला. चाळीतल्या लोकांनी मामांना अल्टिमेटम दिला. या मुलीला तेही घर सोडावं लागलं. ती आता वेश्या वस्तीत येऊन वेश्या व्यवसाय करते. काय करणार ती दुसरं?

युगांडामधल्या बाईचं एक वाक्य आहे, ‘नवरा काय घरी आणणार आहे याची मल रोज भीती वाटते.’ दुसरी म्हणाली, ‘तो कुठं जाऊन येतो हे मला माहित आहे. तरी त्याला मी (शरीरसंबंधाला) नाही म्हणूच शकत नाही. कारण तसं केलं तर तो आम्हाला घराबाहेर काढील, मग माझ्या लहान लहान मुलांना मी काय खाऊ घालू?’

एड्सचे गांभीर्य एका मित्राला सांगायला गेलो तर तो म्हणाला, ‘उलट बरं होईल, त्या निमित्तानं आपली लोकसंख्या कमी होईल, निसर्गाचा हा समतोल आहे.’ बर्‍याच लोकांची ही भावना आहे. असे म्हणणारे स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबीयांना या प्रश्नापासून वेगळं काढतात: पण त्यांच्या बाबतीत असे झाले तर ते हेच म्हणतील का?

आपल्याकडे काय येऊ घातलेय, ते पाहायचे असेल तर आफ्रिकेचे उदाहरण पाहावे, भारताने जसे या प्रश्नाकडे ‘आमच्याकडे असं होणारच नाही’ असे म्हणून दुर्लक्ष केले, तसेच आफ्रिकेत झाले. तिथे बर्‍याच राष्ट्रांमध्ये हुकूमशाही आहे. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली, की ‘हा अमेरिकनं आफ्रिकन जनतेविरूध्द बदनामी करण्यासाठी रचलेला डाव आहे’ म्हणून त्या काळात कुठलीच पावले उचलली नाहीत आणि जागे झले तेव्हा उशीर झालेला. रवांडा, बुरोडी वगैरे देशांमध्ये दुष्काळ, यादवी युध्द, वांशिक हत्याकांडे यांनी ते देश इतके जर्जर झाले होते आणि रोज इतकी हत्याकांडे घडत होती, की या रोगाच्या आव्हानाकडे कुणी लक्षही दिले नाही. आज तिथे गावे, टोळ्या, विभाग पन्नास टक्‍के, ऐंशी टक्‍के एड्सग्रस्त आहेत.

तिथे राहून नोकरी करून परत आलेले रानडे पती-पत्‍नी भेटले. त्यांनी अनेक देशांत काम केले आहे. रानडे म्हणाले, ‘लोक अक्षरशः बल्ब उडाल्यासारखी जायची. आमचा एक सहकारी सर्दी झली म्हणून कामावर आला नाही. दुपारी कुणीतरी सांगितलं, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. मी हिला म्हणालो, आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याला भेटायला जाऊ, संध्याकाळी बातमीच आली की तो गेला म्हणून. अशी आमच्या आसपासची कितीतरी उदाहरणं आहेत.’ सौ. रानडे म्हणाल्या, ‘त्यांच्या फॅक्टरीचा मॅनेजर होता, तो ब्लॅकच होता. तो स्वतः पॉझिटिव्ह होता. त्याचे त्या सगळ्या परिसरातल्या शेकडो मुलींशी संबंध आले. त्याला काहीच अशक्य नव्हतं ते. कारण राजासारखीच अवस्था त्याची. त्यात तो तर गेलाच, पण परिसरातल्या अनेक मुली आमच्यादेखत गेल्या.’

झांबिया देशात तांब्याच्या खाणी असलेला ‘कॉपर बेल्ट डिस्ट्रिक्ट’ आहे. एड्सने असंख्य कामगार मेल्याने तिथे कामगार नाहीत म्हणून तिथले तांब्याचे उत्पादन ६५ टक्‍के घटले आहे. त्या उत्पन्नावर अवलंबून असलेला तो देश असल्याने तो आर्थिकदृष्ट्या कोलमडायला आला आहे. म्हणून ‘लोकसंख्या कमी होईल’ अशा आनंदात असणार्‍या लोकांनी ध्यानात घ्यावे, की या साथीत जास्तीत जास्त भारतात ते पंचवीस ते पन्नास या वयोगटातले. आणि हाच वर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला वर्ग असतो. यू. एन. डी. पी. नं प्रसिध्द केलेल्या अर्थशास्त्राच्या लेखाचा सारांश असा: एड्सचा धक्‍का अनेक स्तरांना निरनिराळ्या तर्‍हेने जाणवेल. कुशल कारागीर मिळेनासा होईल. कुशल कामगार टंचाईमुळे उत्पादन घटेल. जे शेतकरी आज ‘कॅश क्रॉप’ घेतात, ते मजूरां अभावी साध्या पिकांकडे वळतील. कुशल कामगार आपल्या हाताखाली दुसरे लोक तयार करीत असतात. ते सातत्य तुटेल आणि काही कौशल्य पूर्ण नाशकेही होऊ शकतील. ती कौशल्य शिकवून माणसे तयार करायची झाली, तर खूपच बोजा अर्थव्यवस्थेवर पडेल.

कुशल कमगारांच्या टंचाईमुळे छोटे कारखाने बंद पडतील. देशाची उत्पादनक्षमता कमी होईल आणि त्याचबरोबर एड्सच्या पेशंटवर उपचार करायला हॉस्पिटलवर प्रचंड खर्च करावा लागेल, निराधार एड्सच्या बालकांसाठी संस्था चालवाव्या लागतील. या खर्चाचा भार पडल्यामुळे आपल्या उत्पादनावर आणखी विपरीत परिणाम होईल. भांडवलासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतीक बँक आदींकडून मोठ्या प्रमाणावर कर्जाची उभारणी करावी लागेल. तितक्या प्रमाणात ते देश आर्थिक पारतंत्र्यात लोटले जातील. आताच्या जागतिक पातळीवरच्या फ्री मार्केट इकॉनॉमिकच्या व्यवस्थेत श्रीमंत आणि गरीब देशांमधील दरी आणखीनच रूंदावेल, आणि गरीब देश आणखीनच गरीबीच्या गर्तेत फेकले जातील. जिथे लोक एकत्र येऊन सामूहिक प्रयत्‍न करणार नाहीत तिथे सरकारे डळमळतील, वाद होतील.

वाचताना वाटले केवढी ही शापवाणी. कोण म्हणेल घाबरवून टाकणारे, अतिरंजित चित्र आहे. त्यांनी आफ्रिका पहावी किंवा वाचावी. एवढेच नव्हे, तर सर्व आशियायी देशांची परिस्थिती पाहावी.

फिलिपिन्स, थायलंड वगैरे देश एड्सच्या विळख्यात आधीच सापडले आहेत. बँकॉक हे पर्यटकांना आकर्षित करणारे, देशाला उत्पन्न मिळवून देणारे शहर, पण प्रामुख्याने वेश्याव्यवसायामार्फत पर्यटक आकर्षित व्हायचे. तोच रस्ता आता एड्सचा रस्ता झाला आहे. इतर देशांमधले वाचून कळत होते, पण भारतातली परिस्थिती कळली नव्हती. ती कळायचा योग पिंकूमुळे आला. पिंकूची असोसिएशन ऑफ पीपल विथ एड्स (ए.पी.डब्ल्यू.ए.) नावाची संघटना आहे, तिच्यातर्फे भारतातल्या पॉझिटिव्ह लोकांचे चार दिवसांचे शिबिर त्याने पुण्यात बोलावले. हे तिसरे शिबिर होते. पूर्वी हे बाहेरच्यांना अजिबातच खुले नव्हते. या वर्षी या क्षेत्रात काम करणार्‍यांनाही त्यांनी बोलावले. फोनवर मी पिंकूला शिबिराचा कार्यक्रम विचारत होतो. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाकुणाची लेक्चर्स आहेत ते सांगत होता. म्हणाला, ‘संध्याकाळी एक तास आम्हा (पॉझिटिव्ह) लोकांची ‘इन डोअर मीटिंग’ आहे. त्याला इतरांना येता येणार नाही. थोडक्यात आम्हा लोकांचा तो रडायचा टाइम आहे. पूर्वी आम्ही सर्व शिबिरच ‘इन डोअर’ ठेवायचो. रडरड रडायचो. पण आता रडायला पण ताकद नाही. म्हणून या वेळी दिवसातून एक तासच रडयला ठेवला आहे.’ असे म्हणून हसत सुटला.

नसरापूरला गावाबाहेर ‘अध्यात्मिक केंद्र’ नावाचे स्कॉटिश चर्च आहे. आसपास भरपूर झाडी. मध्ये अगदी साधे, ओबडधोबड. बांधणीचे चर्च आहे. लक्ष्मीबाई टिळक, ना. वा. टिळक, बाबा पद्‍मनजी इत्यादींचे फोटो आहेत. गेल्या गेल्या ‘रजिस्ट्रेशन’ करायला एक देखणा लालबुंद, उंचपुरा, हसतमुख तरूण बसला होता. तो हसला. मला ओळखून त्याने माझे नाव लिहिले. मग मी त्याचे नाव विचारले. जरा वेळाने तो जवळ येऊन म्हणाला, ‘मघा सांगितले ते माझं खरं नाव नाही. माझं खरं नाव अमुक अमुक आहे’ मला आश्वर्य वाटून मी विचारलं, ‘मग दुसरं नाव का सांगितलंस?’
‘कारण मी पॉझिटिव्ह आहे.’
मला धक्‍काच बसला. तो म्हणाला, ‘मुद्दाम मी खरं नाव सांगत नाही. कारण, हे कळलं तर काय होईल त्याची भीती वाटते.’
‘घरी माहित आहे का?’
‘नाही, कुणलाच माहित नाही.’
‘लग्न झालंय!’
‘नाही, आणि करणारही नाही. घरच्यांचा आग्रह चाललाय. स्थळं सांगून येताहेत. पण मी करणार नाही.’


त्याला पाहिल्यावर माझ्या मनात आले, की हा जर पॉझिटिव्ह असेल तर जगातला कुणीही पॉझिटिव्ह असू शकेल. एक काळा, बुटका व तब्येतीने बॉडी बिल्डर असलेला, पॉझिटिव्ह असल्याने कामावरून काढून टाकलेला मुंबईचा कामगार भेटला. मद्रासहून तर आठ-दहा जणांचा ग्रुपच आला होता. त्यातले काही तब्येतीने दणदणीत होते. बायका आणि बरोबरची टोपडी घातलेली लहान मुले (सगळी पॉझिटिव्ह) आलेली होती.

मद्रासहून एका संघटनेचा डॉक्टर आला होता. तो पॉझिटिव्ह नसल्याची तर खात्रीच होती, पण शेवटीच्या दिवशी बोलताना ‘आय ऍम मायसेल्फ पॉझिटिव्ह’ असे वाक्य म्हणताच मला धक्‍काच बसला.

एक काळी, जरा पुरूषी आवाजाची, आक्रमक बोलणारी बाई होती, तिचे नाव नुरी. नंतर तिनेच सांगितले, ती तृतीय पंथी (हिजडा) आहे. तिने सांगितले. लहानपणी आमच्या सारख्या लोकांसमोर दोन पर्याय असतात. ऑपरेशन करून पुरूष व्हायचे किंवा स्त्री व्हायचे. बहुतेकजण स्त्रीच होणे पसंत करतात. त्याने पुढे लघवीचे प्रॉब्लेम सुरू होतात. लघवीचा मार्ग आकसून जातो. मधून मधून डॉक्टरकडे जाऊन तो छोटी शस्त्रक्रिया

करायला नकार देतात. काहीजण जास्त पैसे घेऊन करतात. त्यांना आम्ही म्हणतो, जास्त पैसे कशाला घेता? या पैशामुळे समजा तुमच्याकडे व्हायरस येणार असेल तर ते थांबणार आहे का? नुरीने हिजड्यांचे ‘ऑल इंडिया’ संघटना करायचा प्रयत्‍न केला होता. तीच त्याची प्रेसिडेंट होती.

शिबिर ‘यू. एन. एड्स’ व ‘नॅको’ च्या मदतीने झाले. यू. एन. एडसची प्रोग्रॅम ऑफिसर ही शिडशिडीत, उंच, स्कर्ट, ब्लाऊजमधली गोरी अमेरिकन मुलगी होती. तिने भाषणाला सुरवात करताना ‘आय ऍम पॉझिटिव्ह’ असे सांगताच सर्वानांच धक्‍का बसला. ‘यू. एन. एड्स’चे अशा पॉझिटिव्ह लोकांना अग्रक्रम देऊन आपल्या संघटनेत नोकरी देण्याचे धोरण आहे, असेही तिने सांगितले. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडहूनही पॉझिटिव्ह स्त्रिया आलेल्या होत्या.

‘नॅको’ चे स्थूल शरीराचे, बुटके डॉ. सेनगुप्ता सरकारी धोरण असे आहे वगैरे बोलायला लागताच मद्रासच्या ग्रुपमधला एकजण तावातावाने उठून बोलू लागला. दुसराही त्याच्या मदतीला गेला. मग सगळेच उठून तामीळमध्ये बोलू लागले. सगळा गोंधळ होऊन गेला. ‘टी. बी. सॅनिटोरियम’ असा शब्द येत होता. नंतर समजले, की ते म्हणत होते, मद्रासमधल्या सरकारी डॉक्टरांना संशय येऊन त्यांनी रक्ताची तपासणी करताच तो जर पॉझिटिव्ह निघाला, तर शहराबाहेरच्या टी. बी. सॅनिटोरियममध्ये त्याला नेऊन टाकतात. म्हणजे टी. बी. ज्यांना नाही, अशांना टी. बी. होऊन ते लवकर मरणार, अशी एकूण तक्रार होती. सेनगुप्ता खास सरकारी अधिकारी. म्हणाले, ‘आमचे तिथं मि. बिंदूमाधव (की आणखी कोणी) आहेत त्यांना भेटा. ते तुमची तक्रार दूर करतील.’ त्यांचे नाव काढताच आणखी एकदा तामिळ गोंधळ उडाला. एक म्हणाला, ‘त्यांना आम्ही भेटायला गेलो तर ते म्हणाले, तुम्ही लवकर मरत का नाही?’

‘मी दिल्लीला गेल्यावर आठ दिवसांत ऍक्शन घेतो,’ असे सरकारी उत्तर देऊन सेनगुप्तांनी वेळ मारून नेली.

तेव्हा आपल्या हातात राहता राहिले ते प्रबंधक प्रचाराचे. एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यावर त्याच्यावर उपचार करणे. केवढे अवघड आणि खर्चाचे. त्यापेक्षा लोकांनी साधी काळजी घेतली, तरी ते आपला या जीवघेण्या रोगापसून बचाव करू शकतात, पण प्रचाराची सध्य काय अवस्था आहे ? सरकारी किंव अन्य संघटनांनी काढलेली पत्रके पाहतो. हा रोग अमुक‍अमुक मार्गांनी होऊ शकत नाही. संपला प्रचार सहा ओळीत. लोकांच्या डोक्यात त्याचे गांभीर्य शिरून त्यांच्या वागण्यात ते कसे उतरणार?

मद्रासच्या लोकांशी चार दिवसांत वेळ मिळेल तेव्हा बोललो. ते जे सांगत होते ते थक्‍क करणारे होते. पॉझिटिव्ह निघाल्याचे कळताच नातेवाईकांनी चक्‍क शेतात नेऊन मारून टाकले, अशी दहाबारा तामिळनाडूमधल्या खेड्यांमध्ये घडलेली उदाहरणे त्यांनी सांगितली. मी म्हटले, ‘पण पोलिस तपास वगैरे काही नाही का झाला.?’ ते म्हणाले, ‘एड्स म्हटल्यावर पोलिसही म्हणतात, मारून टाकलं, बरं झालं.’

दवाखाने, सरकारी हॉस्पिटल यांची वागणुक किती माणुसकीशून्य आहे, हे सगळे सांगत होते. हे लोक एड्स पेशंटची विचारपूस करीत सर्व हॉस्पिटले फिरत असतात. परत जातात, तेव्हा आधीचे रोगी तिथे नसतात. त्याचा खुलासा विचारताच नर्स म्हणते, ‘अगेन्स्ट मेडिकल ऍडव्हाइज (वैद्यकीय संमतीविना) तो पेशंट निघून गेला.’ हे भांडतात. म्हणतात, तो पेशंट इतका अशक्त होता, की वैद्यकीय संमतीविना स्वतःच्या पायांनी बाहेर जाईलच कसा?’

‘एड्सचे पेशंट मरतात तेव्हा त्यांना वॉर्डबॉय हात लावायला तयार नसतो. अमच्या ग्रुपला फोन करतात. मग आम्ही येऊन त्यांना उचलतो आणि स्मशानभूमीत नेऊन दफन करतो.’

‘आतापर्यंत किती वेळा असे केलेत?’
ते एकमेकांशी तमिळमध्ये बोलून बोटे मोजू लागले. शेवटी एकजण म्हणाला, कमीत कमी शंभरेक लोकांच दफन आम्ही केलं असेल.’
भारतात आणखी काही वर्षांनी काय होणार हे पाहण्यासाठी आफ्रिका बघावी असे मी म्हणत होतो. इथे तर आमची आताच आफ्रिका झाल्याची चिन्हे दिसत होती.

‘माजिद’ हे नाव सर्वाच्या तोंडून परतपरत ऐकू येत होते. हा माणूस केरळात असतो. आपल्याकडे एड्सचा रोग बरे करणारे आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा करतो. देशभरातल्या पेपर्समध्ये मोठ्यामोठ्या जाहिराती देतो. आठ हजार रूपये सुरवातीचा खर्च आणि नंतर तीनशे रूपये हा परत परत येणारा खर्च. गरीब लोकांनी या पायी घरे विकली. जमिनी विकल्या आणि या लोकांच्या मते, त्याचा काही उपयोग होत नाही, ही फसवणूक आहे. बंगलोरच्या सुप्रसिध्द संशोधन संस्थेत त्या औषधाची तपासणी केली असता, त्यात फक्त स्टेरॉइड्स सापडली. तो लेबलांवर जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू. एच. ओ.) आणि आय. सी. एम. आर. ची मान्यता असल्याचे डटपून छापतो.

‘मग तो यांच्यावर ऍक्शन का घेत नाहीत?’
‘त्या यंत्रणा इतक्या मोठ्या आहेत, की हे त्यांना कळवलं तरी त्यांच्यापर्यंत ते पोचतच ना सगळे जग विशेषतः पॉझिटिव्ह मंडळी आणि त्यांचे मित्र, नातेवाईक औषधाची वाट पहात आहेत. व्हायरस टी सेलमध्ये शिरतो आणि आपली डी. एन. ए. कॉफी काढतो, या प्रक्रियेस मदत करणार्‍या आर. टी. एन. झा‍ईमला अडथळा आणणारे ए. झेडी. टी. नावाचे औषध काही वर्षापूर्वी निघाले. त्यामुळे खूपच आशा उंचावल्या. निदान व्हायरसची वाढ रोखली, तरी पेशंटचे आयुष्य वाढले असे वाटले होते, पण लक्षात आले, सुरवातीला थोडा फायदा होतो, पण नंतर व्हायरस त्याला दाद देईनासे होतात. शिवाय त्या औषधाचे शारीरिक दुष्परिणामही खूप आहेत, त्यामुळे एड्सच्या शेवटच्या टप्प्यात त्याचा उपयोग नसतो.

पण या वर्षी व्हँकूवर परिषदेपूर्वी एक पेपर प्रसिध्द झाला आणि परत एकदा आशेचा किरण दिसू लागला. टी सेलमध्ये आर.एन.ए. च्या कॉप्या काढल्यावर त्याला आवरण मिळून बाहेर पडायला मदत करणारे प्रोटिएन नावाचे जे एंझाइम व्हयरसच्या शरीरात असते, त्याल अडथळा करणारी दोन औषधे निघाली. ‘रिटोनाविर’ आणि ‘इंडिनविर’ अशी त्यांची नावे.

डेविड हो आणि जॉर्ज शॉ य अमेरिकन शास्त्रज्ञांनी १९९५ मध्ये अशी कल्पना मांडली. की ए. झेड. टी. (किंवा - टी. सी. नावाचे तत्सम) आणि ही इंडिनाविर किंवा रिटोनाविर औषधे एकत्रित दिली, तर त्याचा फायदा अनेकपटींनी (जवळपास १०० पट) वाढेल. त्यानंतरच्या काळात ड~प. हो आमि माकोविझ यांनी पेशंट्सवर अशी ‘कॉकटेल’ ट्रीटमेंट दिली आणि त्यांना अगदी आश्चर्यकारक निकाल आले. व्हायरसचे रक्तातील प्रमाण जवळपास शून्य झाले. अंधार्‍या बोगद्यातून खूप काळ चालयावर प्रकाशाचा ठिपका दिसला, असे अनेकांनी त्याचे वर्णन केले.

पण याने शास्त्रीय जग हुरळून गलेली नाही. या प्रयोगाच्या अनेक मर्यादा आहेत. प्रयोगासाठी जे पेशंट निवडले होते. त्यांना नुकतेच व्हायरस मिळाल्याचे नक्‍की माहीत असलेले होते. काही वर्षे ज्यांना लोटली आहेत अशा पेशंटवर अजून याचे परिणाम दिसायचे आहेत. रक्तातील व्हायरसचे प्रमाण पी. सी. आर. टेस्ट द्वारा करून ते शून्यावर आल्याचे दाखवले आहे, पण बर्‍याच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की ही मोजपट्‍टी अपुरी आहे.

रक्तापेक्षा व्हायरस हे लिंफनोड्समध्ये जास्त प्रमाणात असतात. ते तिथूनही नष्ट झाले असे यावरून सिध्द होत नाही. पण ‘हो’ यांच्या प्रयोगाने उभारी आली इतके मात्र खरे.

भारतातल्या पेशंट्सनी किंवा उपचारकांनी तर हुरळून जायचे अगदीच कारण नाही. कारण या औषधाची किंमत वर्षाकाठी चार ते पाच लाख रूपये पडेल. शिवाय देण्यासाठी, पेशंटवर टेस्टस करून लक्ष ठेवण्यासाठी पैसे लागतील ते वेगळेच. आपण आपल्या लक्षावधी - अजून काही दिवसांनी कोट्यावधी - पेशंटसना ही ट्रीटमेंट देऊ शकणार आहोत काय? या ट्रीटमेंटने पेशंट पूर्ण बरा झालेला नाही, तर त्याच्या व्हायरसचे उत्पादन कमी होऊन संख्या आटोक्यात राहिली आहे, याचा अर्थ त्यापुढेही काही वर्षे ती ट्रीटमेंट घेत बसावे लागणार. हे इथल्या अगदीच श्रीमंत असलेल्या माणसालाच शक्य आहे.

एड्सचा प्रचार सुरू झाल्यावर पेशंट्सच्या हक्‍कांचे संरक्षण करणारे ‘एड्स ऍक्टिविस्ट’ ही तयार झाले. त्यांच्या संघटनेचा प्रमुख - जो आता हयात नाही - तो म्हणाला होता,

‘एड्सविरोधी औषध निघायला वेळ लागला तरी चालेल, पण त्याचा शोध गरीब देशात लागावा अशी इच्छा आहे. कारण संपन्न देशात जर शोध लागला तर ती औषधं इतकी महाग असतील, की गरीब देशातील पेशंट्सना ती परवडणारच नाहीत.’

व्हँकूवर परिषदेला जाऊन आलेले ‘नारी’ चे मेहेंदळे आणि परांजपे सांगत होते, ‘एड्स ऍक्टिविस्टनी तिथं बाहेर औषधी कंपन्यांनी लावलेल्या स्टॉल्सपुढे ते नफेबाजी करतात म्हणून उग्र निदर्शनं करून स्टॉल्स मोडून टाकले.’ डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘तिकडे सरकार संशोधन करू शकत नाहीत, म्हणून ते औषधी कंपन्यांना संशोधन करायला प्रवृत्त करतात. इतर औषधांना जेवढी वर्षे ड्रग-ट्रायल्स सक्तीच्या असतात, त्यापेक्षा एड्सच्या बाबतीत कमी वर्षाची अट घालतात. त्या कंपन्या नसल्या तर ही औषधं निघूच शकली नसती, पण आपण या कंपन्यावर दबाव आणून आपल्या देशात ती औषधं स्वस्त विकण्यासाठी भाग पाडू शकू. त्यासाठी पेशंटच्या संघटना, स्वयंसेवी संघटना, सरकार यांनी त्या पातळीवर दबाव गट निर्माण करून त्यांना दाखवून दिलं, की तुमची औषधं विकायची आम्ही परवानगी देतो, तुम्ही स्वस्तात द्या, तुम्हाला एवढं मार्केट इथं आहे, तर त्या कंपन्या स्वस्त करतीलही.’

पण हे कोण करणार? सरकारी अधिकार्‍यांना, मंत्र्यांना दोन-चार परदेशी ट्रिपा अधिकार्‍यांना दिल्या, की ते कंपन्यांना सोयीचे पोपटासारखे बोलू लागतात.


तेव्हा उपचारांचा मार्ग महागडा व लांबचा आहे. देशात आयुर्वेदिक उपचारांचा दावा अनेकजण करतात, पण जोपर्यंत आंतरराष्ट्रीय शास्त्रीय कसोट्या लावून काही संशोधन होत नाही तोपर्यंत जगाला त्याचा उपयोग नाही. मजिदच्या औषधात काही तथ्य असते, तर अमेरिकेतले अतिश्रीमंत रूग्ण खासगी विमाने घेऊन इथे उतरले असते. काही आग्रही आयुर्वेदिक डॉक्टरांची भाषणे ऐकली. त्यांचे म्हणणे, ‘हा रोग इथं होताच, तुम्हाला फक्त आता कळला. या रोगाची जी लक्षाणं तुम्ही सांगता ती सर्व आमच्या आयुर्वेदात सांगितलीच आहेत.’ आता प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर जी लक्षण्व येतात, ती सारखीच असणार, पण त्यामुळे त्यांना एड्स माहीत होता, हे सिध्द होत नाही, पण ती ज्ञानशाखा वेगळ्याच पायावर उभी असल्याने त्यांना या शिस्तीत बसवणेही चुकीचे ठरेल.

तेव्हा आपल्या हातात राहता राहिले ते प्रतिबंधंक प्रचाराचे - एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यावर त्याच्यावर उपचार करणे केवढे अवघड आणि खर्चाचे. त्या पेक्षा लोकांनी साधी काळजी घेतली, तरी ते आपला या जीवघेण्या रोगापासून बचाव करू शकतात, पण प्रचाराची सध्या काय अवस्था आहे? सरकारी किंवा अन्य संघटनांनी काढलेली पत्रके पाहतो.

हा रोग अमुक‍अमुक मार्गांनी होऊ शकत नाही. संपला प्रचार सहा ओळीत. लोकांच्या डोक्यात त्याचे गांभीर्य शिरून त्यांच्या वागण्यात ते कसे उतरणार? हा नीरसपणा आणि एकसुरीपणा हीच बहुतेकांची गत.

कंडोम किंवा निरोधच्या माळा घालून काही कार्यकर्त्यांनी वेश्यावस्तीत मिरवणूक काढून या सगळ्याचे गांभीर्यच घालवून टाकले. प्रसिध्दी मात्र भरपूर मिळाली. एका पथनाट्याट असे दृश्य होते, एक कार्यकर्ता वेश्येकडे जाणार्‍यास कंडोम वापरायला प्रवृत्त करतो. तो कंडोम घेऊन गेल्यावर म्हणतो, चला, आता माझ्यापाशी कंडोम आहे, मला वेश्येकडे जायला हरकत नाही.’ अशा प्रचारातून आपण काय साधतो?

दूरदर्शनसारख्या माध्यमाचा तर आणखीच काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे. शबाना आझमी येते आणि वॉर्डमधल्या (एड्स झालेल्या) बाळाला पोटाशी धरते, अशी एक प्रचार जाहिरात होती. ती चांगली असली, तरी नंतर एक पॉझिटिव्ह मित्र म्हणाला, ‘ती जाहिरात पाहिल्यावर मला वाटलं, हा रोग फक्त मुलांना होतो. आपल्याला काही धोका नाही.’ सगळा प्रचार, कार्य हे वेश्यावस्तीत केंद्रीत झाले आहे. कंडोम वापरायचे की न वापरायचे हे ठरवायचा अधिकार वेश्यांना असतो का? दिल्लीचे एक मित्र राजेश कुमार म्हणाले, ‘आपण कंडोमचा प्रचार आणि प्रसार वेश्यांमध्ये न करता त्यांच्या गिर्‍हाइकांमध्ये केला पाहिजे.’ त्यांची एस. वाय. पी. एम. ही संघटना ट्रकच्या धाब्याधाब्यावर जाऊन तिथे प्रचार, प्रसार करते. धाब्यावर काम करणार्‍या मुलांना पैसे देऊन ट्रक ड्रायव्हर्सना कंडोम पुरवायचे काम करायला सांगते. कंडोमचा वापर आतापर्यंत कुटुंबनियोजनासाठी केला जात असल्याने शरीरसंबंधाच्या शेवटच्या अवस्थेत बहुतेकजन कंडोम चढवतात. तोपर्यंत घर्षणाने एड्सचे व्हायरस इकडून तिकडे गेलेलेही असतात. तेव्हा सुरूवातीपासून कंडोम वापरणे, टोकाला हवेचा फुगा न राहू देणे इ. गोष्टी प्रात्यक्षिकामार्फत दाखवण्याची गरज आहे. तेव्हा एड्सपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम वापरणे, असा प्रचाराचा रोख हवा.

‘एवढं रोगाचं थैमान चालू आहे आणि कुणा राजकीय नेत्याच्या तोंडी किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या तोंडी त्याचं कधी नावही येऊ नये? इथलं करप्शन, हे दुर्लक्ष, ही बेफिकिरी पाहता असं वाटतं, या देशाची जगण्याची इच्छाच संपली आहे.’ या रोगाच्या बाबतीत आपण लवकर जागे झालो असतो, तर आपला खर्च प्रचारावर आणि थोडा उपचारांवर झाला असता. भारतीय संस्कृतीच्या भ्रमात राहून वास्तवाकडे पाहायचे नाकारले. आता प्रचाराचा खर्च आहेच, पण उपचारांचाही खूप वाढला. तरीही जागे झालो नाही. आता हे आई-वडील दोन्ही गेलेल्या आणि एड्ससहित जन्मलेल्या अनाथ मुलांचा प्रश्नही उभा राहिला. आता तर खर्च अनेकपटींनी वाढत जाणार.

तेव्हा उपचारांचा मार्ग महागडा व लांबचा आहे. देशात आयुर्वेदिक उपचारांचा दावा अनेकजण करतात, पण जोपर्यंत आंतरराष्ट्रीय शास्त्रीय कसोट्या लावून काही संशोधन होत नाही तोपर्यंत जगाला त्याचा उपयोग नाही. मजिदच्या औषधात काही तथ्य असते, तर अमेरिकेतले अतिश्रीमंत रूग्ण खासगी विमाने घेऊन इथे उतरले असते. काही आग्रही आयुर्वेदिक डॉक्टरांची भाषणे ऐकली. त्यांचे म्हणणे, ‘हा रोग इथं होताच, तुम्हाला फक्त आता कळला. या रोगाची जी लक्षाणं तुम्ही सांगता ती सर्व आमच्या आयुर्वेदात सांगितलीच आहेत.’ आता प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर जी लक्षण्व येतात, ती सारखीच असणार, पण त्यामुळे त्यांना एड्स माहीत होता, हे सिध्द होत नाही, पण ती ज्ञानशाखा वेगळ्याच पायावर उभी असल्याने त्यांना या शिस्तीत बसवणेही चुकीचे ठरेल.

तेव्हा आपल्या हातात राहता राहिले ते प्रतिबंधंक प्रचाराचे - एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यावर त्याच्यावर उपचार करणे केवढे अवघड आणि खर्चाचे. त्या पेक्षा लोकांनी साधी काळजी घेतली, तरी ते आपला या जीवघेण्या रोगापासून बचाव करू शकतात, पण प्रचाराची सध्या काय अवस्था आहे? सरकारी किंवा अन्य संघटनांनी काढलेली पत्रके पाहतो.

आताच मरणाच्या अवस्थेतले पेशंट आपण पाहू लागलो आहोत, अजून पाच वर्षात तर सर्वच लोक हे दृश्य जागोजाग पाहू लागणार आहेत. आपण आपली आरोग्य यंत्रणा सुधारीत आहे का? त्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज इ. आरोग्य सेवा पुरविणार्‍या मंडळींना जोरदार ट्रेनिंग दिले पाहिजे. प्रत्येक दवाखाना, हॉस्पिटल सुसज्ज केली पाहिजेत. येणारी रोगांची संख्या पाहता त्यांचा विस्तात केला पाहिजे. आफ्रिकेत मोठी हॉस्पिटले करण्यापेक्षा घरोघरी जाऊन आरोग्यसेवा पुरवण्याचे धोरण आहे. पेशंटच्या शेवटच्या अवस्थेत घरच्यांनाही त्याला मॅनेज करणे अवघड असते, तेव्हा हॉस्पिटलेही उपलब्ध असायला हवीत. कुठलाही एड्सचा रोगी रस्त्यावर मरणार नाही, अशी या देशाने प्रतिज्ञा केली पाहिजे.

प्रचारयंत्रणेत प्रत्यक्ष व्हायरस मिळालेल्या लोकांचा समावेश केला आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, तर त्याचा जास्त उपयोग होईल. पण तसे तो उघडपणे सांगू लागला, तर समाजात त्याला वाळीत पडावे लागेल, त्याची नोकरी जाऊ शकते, पण असे लोक हळूहळू पूढे येणार आहेत. पॉझिटिव्ह लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणारी वकिलांची फळी उभी राहिली पाहिजे.

हे सर्व होईल का? की हे सगळे स्वप्नरंजन आहे? डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘एवढं रोगाचं थैमान चालू आहे आणि कुणा राजकीय नेत्याच्या तोंडी किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या तोंडी त्याचं कधी नावही येऊ नये? इथलं करप्शन, हे दुर्लक्ष, ही बेफिकिरी पाहता असं वाटतं, या देशाची जगण्याची इच्छाच संपली आहे.’

मी शहारलो. रोग्याची जगण्याची इच्छा संपते तेव्हा मरण हमखास येते, हा आपला एरवीचा अनुभव. तसे आपले होईल की काय? पण अनेक तरूण डॉक्टर्स, कार्यकर्ते, चांगल्या स्वयंसेवी संघटना डोळ्यासमोर आल्या. ते एकाकी असले, तरी या आव्हानला सामोरे जात आहेत. म्हणजे थोडी तरी धुगधुगती आशा आहे. आपण असेच थंड राहिलो, तर काय होईल?

‘प्रयास’ने प्रसिध्द केलेल्या पुस्तिकेच्या मागच्या कव्हरवरचा फोटो आठवला. युगांडामधला एक बाप आपल्या एड्सने गेलेल्या लहान मुलाची कापडात गुंडाळलेली, दोरीने आवळलेली छोट्या आकाराची ताटी, सायकलच्या मागच्या कॅरिअरला आडवी बांधून एकटाच निघालेला आहे, असे ते दृश्य. त्या फोटोने माझी झोपच उडवली. माझ्या प्रिय देशात, त्यातही पुणे या आवडत्या माझ्या गावात, ज्या रस्त्यावरून मी हजारदा जातो अशा इथल्या लाडक्या रस्त्यावर, असे दृश्य मला पाहावे लागणार आहे का?
असे कसे होऊन चालेल?