एस.टी.आय. प्रश्नोत्तरे

Print
एस.टी.आय. किंवा लैंगिक संबंधाच्या संसर्गाने रोग पसरण्याचे अनेक मार्ग आहेत. लैंगिक संबंध ठेवल्याने रोगांचे जंतू/विषाणू वीर्य, योनीतील स्त्राव आणि रक्त यात पसरतात.

थुंकीमुळे देखील हे रोग पसरू शकतात. जर तुमच्या तोंडाजवळ छोटीशी जखम असेल तर त्यामार्गे हे जंतू शरीरात प्रवेश करतात. सुईवर किंवा सिरींजमध्ये असलेले दूषित रक्त हे रोग पसरवितात. ज्यांना या रोगाची लागण झाली आहे अशा गरोदर स्त्रिया हा रोग त्यांच्या बाळास देतात.

हेपाटायटीस बी सोडून या प्रकारच्या इतर कोणत्याही रोगास प्रतिबंध करणारी लस उपलब्ध नाही. लैंगिक संबंधामुळे तुम्हाला जर एकदा रोग झाला तर तो पुन्हा होऊ शकतो. आणि तुम्हाला एकावेळी एकापेक्षा जास्त रोग असू शकतात. बरेचदा रोगावर सहजपणे उपचार करता येऊ शकतात, पण जर दुर्लक्ष केले तर या प्रकारातील सगळे रोग धोकादायक आहेत. काही रोगांसाठी जसे जननेंद्रियावरील मस, जननेंद्रियावरील नागीण किंवा एच.आय.व्ही. यावर काहीही उपचार नाहीत.
खरे जीवन
‘पहिल्याच संभोगाच्या वेळी तुम्हाला संसर्ग हो‍उ शकत नाही किंवा तुम्ही गरोदर राहू शकत नाही, जर खर्‍या अर्थाने संभोग झाला नसेल तर’.
हकीकत
होय पहिल्याच वेळी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, पूर्ण संभोग झाला नसला तरी संसर्गित व्यक्तीच्या जननेंद्रियाशी संपर्क आल्याने देखील रोग होऊ शकतात. शरीरातील स्त्रावामुळे किंवा मुखाने संभोग केल्यास संसर्ग होतो. तुम्ही आणि तुमच्या भागीदाराला निरोधके वापरण्यास सांगावे.
लैंगिक संबंधामुळे होणारे रोग आणि गरोदरपण
गरोदर असलेल्या स्त्रियांना, गरोदर नसलेल्या स्त्रियांसारखेच लैंगिक संबंधामुळे होणारे रोग हो‍उ शकतात. गर्भारपण त्या स्त्रियांना किंवा त्यांच्या गर्भाला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता पुरवत नाही. उलट जर गर्भारपणी असे रोग झाले तर ते त्या स्त्रियासाठी आणि बाळासाठी फार धोक्याचे असते. लैंगिक संबंधामुळे कोणते रोग होऊ शकतात आणि त्यांचे कोणते परिणाम होतात हे स्त्रिला माहिती असले पाहिजे आणि त्या संसर्गापासेन आपले व बाळाचे संरक्षण कसे करायचे हे देखील माहिती असले पाहिजे.